ब्रँडिंग
जनसंवादाचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ब्रँडिंगच्या क्षेत्राकडे वळायला हवे, असे मला वाटते.
ग्राहकांच्या सध्याच्या गरजा लक्षात घेण्यासोबतच भविष्यातील आवड, गरजा आणि त्यांचे जीवन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कोणत्याबाबींची आवश्यकता लागेल याचा सर्वसमावेशक विचार ब्रँडिंग मध्ये केला जातो.
मार्केटिंग किंवा ब्रँडिंग कम्युनिकेटर ग्राहक व कंपनी आणि विविध माध्यमे यांच्यामधील महत्वाचा दुवा ठरु शकतो. एखाद्या कंपनीचे मार्केटमधील सध्याचे स्थान आणि भविष्यात या स्थानात होणारी घट वा वाढ याविषयी मार्केटिंग कम्युनिकेटर आपल्या कौशल्य वा ज्ञानाद्वारे कंपनी व्यवस्थापकांना सुयोग्य अशी माहिती देऊन सावधगिरीच्या उपयोजना सुचवू शकतो. या विषयासंदर्भात महत्वाचा अभ्यासक्रम मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) या संस्थेने सुरु केला आहे- स्ट्रॅटेजिक मार्केटिंग (व्युहात्मक विपणन) आणि कम्युनिकेशन या विषयाचे अभ्यासक्रम चालवणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन कम्युनिकेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतात. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.(१)ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, (२)डिजिटल कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३)मार्केटिंग अॅनालिटिक्स (४)मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांना सामोरे जावे लागते.(१)कॉमन ॲडमिशन टेस्ट – कॅट, झेव्हियर ॲप्टिट्यूड टेस्ट – झॅट किंवा जनरल मॅनजमेंट ॲप्टिट्ड टेस्ट – जीमॅट , या तीनपैकी कोणतीही एक चाळणी परीक्षा द्यावी लागेल. (२) मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ॲडमिशन टेस्ट – एमआयसीएटी. (३)समूह चर्चा आणि मुलाखती. अंतिम निवडीसाठी कॅट/झॅट/जीमॅट या परीक्षेतील गुणांना २० टक्के वेटेज, एमआयसीएटी परीक्षेतील गुणांना ३० टक्के वेटेज, समूह चर्चा २० टक्के वेटेज, आणि मुलाखती ३० टक्के वेटेज दिले जाते.
संपर्क – मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) शेला, अहमदाबाद – ३८००५८, दूरध्वनी-०२७१७-३०८२५०, टेलेफॅक्स- ३०८३४९ संकेतस्थळ-www.mica.ac.in, ईमेल-admissionenquiry@micamail
000
दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हर्टायजिंग या संस्थेने-पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टाजयजिंग ॲण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही विषयातील पदवी घेतलेले उमेदवार हा अभ्यासक्रम करु शकतात. कालावधी- दोन वर्षे. संपर्क- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हर्टायजिंग, ई १४ सी सेक्टर-८, नॉयडा-२०१३०१,संपर्कध्वनी- ९८१०२८५६२५, संकेतस्थळ-, niaindia.org, ईमेल-admissions@niaindia.org
000
मुंबई येथील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेने पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन , ५ महापालिका मार्ग, सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई-४००००१,दूरध्वनी-०२२-२२६२१३६६,फॅक्स-२२६५८५४६ संकेतस्थळ-http://xaviercomm.org/ ईमेल-admin@xaviercomm.org