मीडिया आणि कम्युनिकेशन
या क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या पुढील संधी मिळू शकतात– (१) पब्लिक रिलेशन स्पेशॅलिस्ट, (२) मोबाइल मार्केटिंग, (३) मुव्ही मार्केटिंग ॲण्ड डिस्ट्रिब्युशन, (४) सोशल मीडिया स्पेशॅलिस्ट, (५) सर्च इंजिन स्पेशॅलिस्ट, (६) इव्हेंट मॅनेजमेंट, (७) मीडिया मार्केटिंग स्पेशॅलिस्ट,
(८) मार्केटिंग ॲण्ड कम्युनिकेशन स्पेशॅलिस्ट, (९) मीडिया प्लॅनर, (१०) ॲडव्हर्टायजिंग अकाउंट स्पेशॅलिस्ट, (११) गुगल ॲडवर्ल्ड्स स्पेशॅलिस्ट
अभ्यासक्रम-
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट
कालावधी – एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांतर्गत मार्केटिंग कम्युनिकेशन या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. ही पदविका कोलकता विद्यापीठामार्फत दिली जाते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर डिजिटल मार्केटिंग, मीडिया प्लॅनिंग आणि बायिंग, ब्रँड मॅनेजमेंट, रुरल मार्केटिंग, ॲक्टिव्हेशन ॲण्ड प्रमोशन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टायजिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मीडिया मार्केटिंग आणि सेल्स, मार्केटिंग मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळू शकते.
ब्रॉडकास्ट मॅनेजमेंट या विषयातसुध्दा स्पेशलायझेशन करता येते. ही पदविका कोलकता विद्यापीठामार्फत दिली जाते. हा अभ्यासक्रम कोलकता मीडिया इंस्टिट्यूट या संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे.
संपर्क- आयआयएडब्ल्यूबीए मॅनेजमेंट हाऊस, कॉलेज स्क्वेअर-(वेस्ट), कोलकता- ७०००७३, दूरध्वनी- ०३३ – ४०२३७४७४, फॅक्स- २२४१३९७५, संकेतस्थळ-www.iiswbm.edu आणि www.cmi.net
अजिंक्य डी.वाय पाटील स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड मीडिया
या संस्थेने चित्रपट आणि माध्यम क्षेत्रात करिअर करता येणे शक्य व्हावे या दृष्टिने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत–
बीबीए इन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन(अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.कालावधी-तीन वर्षे. बीबीए इन डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया (अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी.
बीबीए इन फिल्म आणि मीडिया ( अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.कालावधी- तीन वर्षे.
एमबीए इन मीडिया आणि कम्युनिकेशन–अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी,कालावधी-दोन वर्षे.
संपर्क– अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, लोहगाव, चारोळी (बुद्रुक), पुणे-४१२११०५, दूरध्वनी-०२०-२७४०९८४२, ७७५६८६९०४६ ई-मेल –info@adypu.edu.in, संकेतस्थळ-adypu.edu.in