(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

फॅशन सांगण्याची कला-फॅशन कम्युनिकेशन

  अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था

()स्कूल ऑफ फॅशन टेक्नालॉजी (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण समिती) – पुणेस्थित या संस्थेने बॅचलर ऑफ डिझाईन इन फॅशन कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात प्रकाश आणि ध्वनी यांचा परिणामकारण आणि प्रभावी उपयोगाचं तंत्र,माध्यमांचं नियोजन आणि इव्हेन्ट मॅनजमेंट, जाहिरात प्रकल्प, क्रिएटिव्ह रायटिंग, उद्योजकतेची तोंडओळख, क्रिएटिव्ह ऍ़डव्हर्टायझिंग, व्हिज्युएल मर्कंडायजिंग, पब्लिकेशन डिझाइन, फॅशन स्टायलिंग फोटोग्रॉफी, गॉफिक डिझाइन ,फॅशन ऍ़ण्ड लक्झरी ब्रॅण्ड मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

अभ्यसक्रमाचा कालावधीचार वर्षे. अर्हताकोणत्याही विषयातील 12वी. हा अभ्यासक्रम एसएनडीटी विद्यापीठ यांच्या सहकायाने सुरु करण्यात आला आहे.

पत्तास्कूल ऑफ फॅशन टेक्नालॉजी,रस्ता १३/१/२, नऱ्हे अंबेगाव, व्हिजन इंग्रजी माध्यम शाळेच्या विरुध्द दिशेला ,पुणे411 0४१,दूरध्वनी020-६६८३३७०० इमेलadmission@softpune.ac.in संकेतस्थळwww.softpune.ac.in

 

 () एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अभ्यासक्रमपुणे येथील या संस्थेने फॅशन कम्युनिकेश  या विषयातील अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हताकोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण. कालावधी चार वर्षं. या अभ्यासक्रमाच्या निवड प्रक्रियेमध्ये डिझाइन ऍ़प्टिट्यूड टेस्ट ,स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत या दोन बाबींचा समावेश आहे. ही चाळणी परीक्षा पुणे,मुंबई,कोलकता,अहमदाबाद, बेंगळुरु,भोपाळ आणि दिल्ली या केंद्रांवर घेण्यात येते. पत्ताएमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन,राजबाग,लोणी कालभोर,हडपसरच्या बाजूला,पुणे412201,दूरध्वनी020-30693600, फॅक्स30693601,मेलadmissions@mit.edu.in,संकेतस्थळwww.mitid.edu.in

()  नॅशनल इन्स्टि्यटूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी या संस्थेने बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावील प्रवेश परीक्षा दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते.यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई,पुणे आणि नागपूर केंद्रांचा समावेश आहे.

परीक्षेचा पॅटर्न

    या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी जनरल ऍ़बिलिटी टेस्ट,क्रिएटिव्ह ऍ़बिलिटी टेस्ट आणि सिच्युएशन टेस्ट असे तीन टप्पे आहेत. जनरल ऍ़बिलिटी टेस्टला 30 टक्के वेटेज,क्रिएटिव्ह ऍ़बिलिटी टेस्टला 50 टक्के वेटेज आणि सिच्युएशन टेस्टला आणि 20 टक्के वेटेज दिले जाते.

    हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई,नवी दिल्ली,चेन्नई,बेंगलरु,हैद्राबाद कानपूर,कोलकोता, येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो. प्रत्येकी 30 उमेदवार याप्रमाणे 150 उमेदवारांना प्रवेश दिला जातो.

    या अभ्यासक्रमामध्ये व्हिज्युअल मर्कंडायजिंग, स्टायलिंग,ग्रॅफिक डिझायनिंग, डिस्प्ले आणि एक्झिबिशेन डिझायनिंग, जाहिरात, जनसंपर्क, फॅशन क्षेत्राशी निगडित सृजनात्मक लिखान, या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

हा अभ्यासक्रम केल्यावर उमेदवारांना विपणन (मार्केटिंग), व्यवस्थापन, स्वतंत्र उद्योग, फॅशन पत्रकारिता, टीव्ही कार्यक्रम निर्मिती, संपादन, फॅशन जाहिराती, फॅशन क्षेत्रातील जनसंपर्क, स्टोअर्स नियोजन, विशेष कार्यक्रमांचे समन्वयन, फॅशन छायाचित्रण या सारख्या क्षेत्रांमध्ये करियर करता येऊ शकते. या क्षेत्रातील आपले कौशल्य जितके खणखणितपणे वापरता येत असेल तितक्याच प्रगतीच्या विविधांगी संधी उपलब्ध होतात.

करीअर संधी

हा अभ्याक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये पुढील करीअर संधी मिळू शकतात-() व्हिज्युअल मर्कंडायजर ,()ग्रॅफिक डिझायनर,() स्टायलिस्ट,()सेट ॲण्ड आर्ट डायरेक्टर,() जर्न्यालिस्ट ॲण्ड फोटो जर्न्यालिस्ट, () ब्रँड मॅनेजर,() फॅशन फोटोग्रॅफर,() फाँट डिझायनर,(१०) इव्हेंट मॅनेजर,(११) कॉपी रायटर ॲण्ड व्हिज्युलायझर (१२)यूआय/यूएक्स डिझायनर्स

प्लेसमेंट-

पुढील कंपन्यांमध्ये हा अभ्यासक्रम केल्यावर प्लेसमेंट मिळू शकते- मार्क ॲण्ड स्पेंसर, मदुरा गार्मेंट्स, शॉपर्स स्टॉप, ख्रिश्चन डॉयर, लाइफस्टाइल, बेनेट्टॉन, टॉमी हिलफिगर, लिबर्टी, फ्री लूक, लोपेज डिझाइन, मॅरी क्लेअर, इमेजेस, वोग, हापर्स बजार, टाइम्स ऑफ इंडिया, एशिअन एज, फेमिना, एफडीसीआय, एमटीव्ही, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ, हेडलाइन्स्‍ टुडे, परफेक्ट रिलेशन्स्, विजक्रॉफ्ट, ओग्लिव्ही ॲण्ड मॅथर, वेस्ट साइड, लिंटास, जेडब्ल्यूटी ,मॅककॅन, उपासना डिझाइन स्टुडिओ, रेमंड्स,बॉम्बे हाय, तनिष्क, समॅसंग, स्वरोव्हस्की, फॉसिल,प्युमा स्पोर्ट्स, लुइस फिलिप्पी, इंडस लिग, यूएक्स डिझाइन लॅब्स

या अभ्यासक्रमात पुढील विषयांचे प्रशिक्षण दिले जाते – () इव्हेंट ॲण्ड ॲडव्हर्टायजिंग –या मुख्य घटकांतर्गत , ()इव्हेंट मॅनेजमेंट,() मीडिआ प्लॅनिंग,() कॅापी रायटिंग ॲण्ड व्हिज्युलायलिंग या विषयांचा समावेश आहे.

() स्पेस डिझायनिंग या मुख्य घटकांतर्गत () सेट ॲण्ड आर्ट डायरेक्शन, ()प्रॉपर्टी डिझायनिंग, ()व्हिज्यूअल मर्कंडायजिंग या विषयांचा समावेश आहे.

) जर्न्यालिझम ॲण्ड फोटोग्रॅफी- या मुख्य घटकांतर्गत () स्टायलिंग () जर्न्यालिझम, () फोटा जर्न्यालिझम , ४) फॅशन फोटोग्रॅफी या विषयांचा समावेश आहे.

) ग्रॅफिक डिझाइन- या मुख्य घटकांतर्गत () ग्रॅफिक डिझायनिंग()फान्ट डिझायनिंग, () बँड मॅनेजमेंट , ४) यूआय /यूएक्स डिझायनिंग या विषयांचा समावेश आहे.

    मुंबई केंद्राचा पत्ताएनआयएफटी कॅम्पस,प्लॉट नंबर 15,सेक्टर नंबर 4,खारघर,  नवी मुबंई410210,दूरध्वनी022-2774700

संकेतस्थळwww.nift.ac.in , ईमेलnift.mumbai@nift.ac.in