(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कौशल्य विकासाचा रोडमॅप

  रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोठी समस्या
लक्षात घेऊन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी कौशल्य विकासावार गेल्या काही वर्षात सर्वाधिक भर दिला आहे.
२०२३ पर्यंत १ कोटी युवकांना कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन स्वत:च्या
पायावर उभे करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने निर्धारित केले आहे. त्यासाठी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना नावाची योजना सुरु करण्यात आली आहे.


देशातील वेगवेगळ्या भागातील विविध प्रकारच्या उद्योगांसाठी जे
कौशल्यप्राप्त मनुष्यबळ लागते त्याची निर्मिती करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते.
कौशल्यप्राप्त अशा युवकांना रोजगाराच्या संधी सहज व सुलभतेने उपलब्ध होऊ शकतात. या
योजनेमध्ये प्रशिक्षण आणि मूल्यमापनाचा खर्च सरकार करणार आहे. हे प्रशिक्षण
अल्पमुदतीचे असेल.

कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम

या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळी कौशल्ये
(सॉफ्ट स्किल)
, उद्योजकता, वित्तीय आणि डिजिटल साक्षरतेचे
प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण १५०  तासापासून ते ३०० तासापर्यंतचे राहू शकते. या
प्रशिक्षणानंतर संबंधित उमेदवाराने प्राप्त केलेल्या कौशल्याचे मूल्यमापन केले
जाईल. त्यानुसार त्याला सुयोग्य अशी प्लेसमेंट मिळावी यासाठी साहाय्य केले जाईल.
त्याशिवाय उमेदवारांमधील उद्योजकीय प्रेरणा आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांना
स्वयंरोजगारासाठीही साहाय्य केले जाऊ शकते. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यापूर्वी
उमेदवाराने एखादे कौशल्य प्राप्त केले असल्यास त्याचेही मूल्यांकन करुन ते
प्रमाणित केले जाईल. त्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कौशल्याची नियमित स्वरुपाची
नोंद होईल व त्यासही प्लेसमेंट मिळणे सुलभ जाऊ शकेल.

अशा उमेदवारांनी कौशल्यप्राप्त
केलेल्या प्रशिक्षणातील त्रुटी वा कमतरता भरुन काढण्यासाठी प्रगत वा जोड
अभ्यासक्रमांद्वारे (ब्रिज कोर्सेस) या कामासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या
संस्थांकडून साहाय्य केले जाईल.

  प्रशिक्षणाची सोय

  या
योजनेमध्येच काही विशिष्ट प्रकल्पांमध्ये प्रशिक्षणाची सोय त्याक्षेत्रात किंवा
शासकीय संस्था
, संघटना, कॉर्पोरेट, औद्योगिक संस्था येथे हे स्पेशल
प्रशिक्षण संबंधितांच्या आवशक्यता व गरजेनुसार दिले जाऊ शकते. या योजनमध्ये लघु
मुदतीच्या प्रशिक्षणासाठी जे नियम केले आहेत
, ते
नियम
, अटी आणि शर्ती या स्पेशल प्रकल्पातील
प्रशिक्षणासाठी शिथील केले जाऊ शकतात. या योजनेच्या यशस्वीतेसाठी कौशल्य आणि
रोजगारमेळावे दर सहा महिन्याला किंवा अधिकाधिक कालावधीसाठी आयोजित केले जातील.
संबंधित घटक वा समुदायांना या मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाईल. अशा
समुदायांकडे असलेल्या कौशल्य वा विशिष्ट व्यवसायातील ज्ञान संबंधिताना मिळावे
यासाठी प्रयत्न केले जातील.

कौशल्य
विकासाची क्षेत्रे

  ही योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
(एनएसडीसी) मार्फत राबवली जाईल. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र
सरकारमार्फत मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य करण्यात येतं. या अंतर्गत राज्य कौशल्य
विकास संस्थेने कृषी
, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर, ऑटामोटिव्ह, सौंदर्यं आणि देखभाल, बांधकाम, फॅब्रिकेशन,
माहिती तंत्रज्ञान व या तंत्रज्ञानावर
आधारित सेवा
, उर्जा, उत्पादन आणि निर्मिती ,वस्त्रप्रावरणे, पर्यटन, अन्न प्रक्रिया ,हस्तकला
आणि गालिचे बांधणी अशा पंधरा क्षेत्रांची निवड केली आहे.

  या
पंधरा क्षेत्रात कौशल्य निर्मितीसाठी युवकांना प्रशिक्षित केले जाते. ही क्षेत्रं
निवडण्याआधी संस्थेने राज्यातील या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या
संधीच्या विस्तृत अभ्यास केला. गेल्या तीन वर्षात या क्षेत्रात राज्यातील व्यवसाय
शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील प्रशिक्षणाचे विश्लेषण करण्यात आले. प्रत्येक
जिल्हयातील या क्षेत्रातील मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा कृती आराखडा जिल्हा
प्रशासनाच्या साहाय्याने तयार केला. या क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या
उद्योजकांशी सल्लामसलत केली. मुंबई येथे झालेल्या मेक इंडिया सप्ताहामध्ये अशा
क्षेत्रात असणाऱ्या उद्योग आणि कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यामुळे
या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गती वाढू शकेल.

  प्लेसमेंटसाठी विशेष आराखडा

  या
योजनेंतर्गत प्रशिक्षत उमेदवारांच्या प्लेसमेंटसाठी एक विशेष आराखडा संस्थेने तयार
केला आहे. त्यानुसार संबंधित उद्योजक
, स्वयंरोजगार
करु इच्छिणाऱ्या प्रशिक्षित उमेदवारास किंमान ७५ टक्क्यापर्यंतचे वेतन देईल. २५०  च्या आसपास रोजगारमेळे आयोजित केले जातील.


कौशल्य विकास प्रशिक्षणास अधिक चालना मिळावा यासाठी केंद्र सरकारने या
योजनेमध्ये देशातील ५००  तंत्रनिकेतनांचे
उन्नतीकरण करण्यासाठी अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जुन्या व
कालबाह्य यंत्रसामग्रीचा बदल
, माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक शिक्षण प्रणालीची सुविधा
, कालसुसंगत नवे पदविका अभ्यासक्रम, यांचा समावेश आहे. या योजनेमध्ये प्रत्येक
तंत्रनिकेतनास दोन कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाईल. या तंत्रनिकेतनांमध्ये
महाराष्ट्रातील  ठाणे
, पुणे, गडचिरोली, रत्नागिरी ,कराड, बीड, लातूर ,मिरज, अहमदनगर, जळगाव, धुळे, जालना, उस्मानाबाद, वाशिम, खामगाव, यवतमाळ, नागपूर, ब्रम्हपुरी, आर्वी, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, जिंतूर, अमरावती ही शासकीय तंत्रनिकेतने, शासकीय
मुद्रण संस्था मुंबई
, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन
यवतमाळ आणि लातूर
, शासकीय हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग
तंत्रज्ञान नागपूर यांचा समावेश आहे. अकोला आणि हिंगोली येथे या योजनेंतर्गत दोन
नवी तंत्रनिकेतने स्थापन केली जातील.

  अशी असेल संधी

  या
संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुढील क्षेत्रात कंसात नमूद प्रशिक्षित
मनुष्यबळाची देशपातळीवर गरज भासणार आहे. (
1) ऑटो
व ऑटो साहित्य घटक –
1 कोटी 5 लाख , सौंदर्य आणि देखभाल 1 कोटी 4 लाख, अन्न प्रकिया 1 कोटी 1 लाख, माध्यमे आणि मनोरंजन 10 लाख, हस्तकला आणि हँडलूम – 1
कोटी
7 लाख कोटी, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू – 60 लाख, घरकाम सेवा – 1
कोटी
दागिने निर्मिती- 80
लाख
, टेलिकम्युनिकेशन – 40 लाख, पर्यटन, आतिथ्य आणि प्रवास – 1 कोटी 30 लाख, फर्निचर आणि सजावट 1 कोटी 12 लाख, इमारत, बांधकाम, जमीनजुमला- 7 कोटी 6 लाख, माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित
सेवा
50 लाख, बांधकाम साहित्य –1
कोटी
, वस्त्रोद्योग आणि वस्त्रप्रावरणे- 2 कोटी, आरोग्य सुविधा- 70
लाख
,सुरक्षा –1 कोटी, कृषी- 21 कोटी, शिक्षण आणि कौशल्य विकास – 1
कोटी
70 लाख, वाहतूक आणि वस्तुपुरवठा – 2
कोटी
80 लाख, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी हार्डवेअर– 80 लाख, औषध निर्मिती आणि जैविक विज्ञान – 30 लाख, बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिस ॲण्ड इंशुरन्स- 40 लाख,  रिटेल- 55 लाख


या
सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात साधारणत: दीड कोटीच्या आसपास प्रशिक्षित
मनुष्यबळाची गरज भासू शकते.

  संपर्क-
कौशल भवन
,  बी टू पुसा रोड, मेट्रो पिलर नंबर- 95, करोल बाग मेट्रो स्टेशन जवळ, नवी दिल्ली – 110005, संकेतस्थळ-www.nsda.gov.in, दूरध्वनी-011- 25788001, फॅक्स- 25788012

  करीअरचा रोडमॅप

  भारत
सरकार आणि राज्य सरकार कौशल्य विकासासाठी जे महत्व देत आहे ते लक्षात घेऊन यापुढे
विद्यार्थ्यांनी आपल्या करीअरचा रोडमॅप ठरवायला हवा. त्या अनुषंगाने विविध
अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण प्राप्त करायला हवे. या क्षेत्रात केवळ कनिष्ठस्तरीयच
नव्हे तर वरिष्ठस्तरीय संधीही मिळू शकतात. त्यामुळे अल्पमुदतीच्या
अभ्यासक्रमांसोबतच पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरीय अभ्यासक्रम करायला हवे.   यंदाच्या मार्ग यश मालिकेत अशा कौशल्य
निर्मिर्तीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध ज्ञान शाखेतील सर्व प्रकारचे अभ्यासक्रम
, प्रवेशप्रक्रिया, संधी यांची अधिकाधिक माहिती दिली जाईल.

००००

नॅशनल इंस्टिट्यूट
फॉर मायक्रो, स्माल ॲण्ड मिडियम एंटरप्राईजेस
(एन-एमएसएमई)
या संस्थेने, एमएबीए-एसएमएई हा वैशिष्ट्यपूर्ण असा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम
सुरु केला आहे. अशा प्रकारचा आपल्या देशातील एकमेव अभ्यासक्रम आहे.

सूक्ष्म- लघु- मध्यम
उद्योजक आणि स्टार्टअप उद्योजकतेसाठी उपयुक्त ठरणारा हा अभ्यासक्रम आहे .हा
अभ्यासक्रम या संस्थेने एसबीएम युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने सुरु केला आहे. दोन
वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षी युनिव्हर्सिटीच्या भूवनेश्वर
कॅम्पसमध्ये तर दुसऱ्या वर्षी नॅशनल इंस्टिट्यूट फॉर मायक्रो, स्माल ॲण्ड मीडियम
एंटप्रायझेस, हैद्राबाद येथे शिकवले जाईल. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे
प्रवेश दिला जाईल.

संपर्क- एन-एमएसएमई, ,
युसूफगुडा, हैदराबाद, संकेतस्थळ –
www.asbm.ac.in आणि शिक्षा विहार,
पोस्ट- एएसबीए युनिव्हर्सिटी, भोला
(चांडका)– ७५४०१२ संकेतस्थळ-www.asbm.ac.in