(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आयआयएम मध्ये १२ वी नंतर एमबीए

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील
इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांमध्ये पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांना सर्व प्रकाराचे
मूलभूत ज्ञान प्रदान करुन त्याचा पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षे
व्यवस्थापन विषयाच्या मुख्य घटकांना शिकवले जाते. या पाचही आयआयएमने तीन वर्षानंतर
इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सोडून जाण्याची सुविधा दिली आहे. तथापि असे न करणेच
श्रेयस्कर. कारण पाचव्या वर्षी या सर्व आयआयएममध्ये प्लेससमेंटसाठी नामांकित
संस्था येतात. शंभर टक्के मुलांना प्लेसमेंट मिळून त्याचे करिअर उत्तमरीत्या
मार्गी लागते.

आयआयएम रोहतक

२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने
पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. पदवी ते पदव्युत्तर पदवी असा या अभ्यासक्रमाचा व्यापक अवकाश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत एमबीए ही पदवी प्रदान केली जाते. एखाद्या विद्यार्थ्यास तीन
वर्षानंतर हा अभ्यासक्रम सोडवासा वाटल्यास, बीबीए – बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. तथापि चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना किमान सीजीपीए
(क्युमुलिटिव्ह
ग्रेड पॉईंट ॲव्हरेज
) ५ मिळवावा लागतो. हा अभ्यासक्रम १५ सत्रांमध्ये शिकवला जातो. प्रत्येक वर्षी तीन सत्रे घेण्यात येतात.

हा अभ्यासक्रम दोन भागात विभाजित करण्यात आला आहे. पहिल्या भागात पायाभूत विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. दुसऱ्या भागात
व्यवस्थापन विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करावी लागते. १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

अर्हता- हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील 60 टक्के गुणांसह 12 वी
उत्तीर्ण विद्यार्थ्यास करता येतो.
अनुसूचित जाती आणि
जमाती संवर्गासाठी गुणांची मर्यादा
55 टक्के. २० जून २०२३ रोजी विद्यार्थ्याचे किमान वय २०
वर्षे असावे.

प्रवेश प्रक्रिया

या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. ही परीक्षा आयआयएम-रोहतकव्दारे घेतली जाते. या परीक्षेत, संख्यात्मक कौशल्य चाचणी, तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य चाचणी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व चाचणी असे तीन विभाग असतात. प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी ४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक भागातील प्रश्न
सोडवण्यासाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. प्रत्येक अचुक उत्तराला ४ दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो. या
चाळणी परीक्षेत विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना आठवड्यात मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य याची चाचपणी केली जाते.

काय शिकाल?

पहिल्या तीन वर्षी पुढील विषयांचा अभ्यास करावा लागतो.
(
इकॉनॉमिक्स () फायनांस () अकाउंटिंग () लॉ, () स्टॅटिस्टिक्स, () मॅथेमॅटिक्स ()  फिलासॉफी
() सायकॉलॉजी () बिझिनेस कम्युनिकेशन (१०) पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (११) सोशिऑलॉजी (१२) सस्टेनिबिलिटी (१३) प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट (१४) मीडिया ॲण्ड जर्न्यालिझम (१५) ॲडव्हर्टायजिंग (१५) बिझिनेस हिस्ट्री (१६) इंफर्मेशन टेक्नॉलॉजी.

चौथ्या आणि पाचव्या वर्षात पुढील विषय शिकावे लागतात() जनरल मॅनेजमेंट () बिझिनेस कम्युनिकेशन () मार्केटिंग मॅनेजमेंट () स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट () मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम () ऑपरेशन मॅनेजमेंट
ॲण्ड क्वाँटिटेटिव्ह टेक्निक () ह्यमन रिर्सोस मॅनेजमेंट ॲण्ड ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर () इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी () फायनांस ॲण्ड अकाउंटिंग,

संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक मॅनेजमेंट सिटी, सदर्न बायपास, एनएच – 10, सुनारिआ रोहतक -124010, दूरध्वनी– 01262 2285४० , संकेतस्थळ www.iimrohtak.ac.in,ईमेल ipmoffice@iimrohtak.ac.in

000

     आयआयएम
इंदोर –

12 वीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण – प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे उत्कृष्ट व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण
व्हावे यादृष्टिने इंदोर आयआयएमच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली
आहे.
या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. पुढील दोन वर्षे त्यांना नियमित स्वरुपाचा एमबीए अभ्यासक्रम शिकवला जातो.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी सामाजिक
(सोशल) इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. चौथ्या आणि
पाचव्या वर्षांच्या मध्ये बिझिनेस इंटर्नशीप पूर्ण करावी लागते.
  व्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते. 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बॅचलर ऑफ आर्ट्स (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. ३ वर्षानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. त्याला बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ही पदवी प्रदान केली जाते.

अशी असते प्रवेश परीक्षा

या अभ्यासक्रमासाठी निवड, () कल
चाचणी
(ॲप्टिट्यूड टेस्ट) आणि () मुलाखत या दोन घटकांवर आधारित केली जाते.

कल चाचणीच्या पेपरमध्ये तीन विभाग (सेक्शन) असतात () संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी)– बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस), () क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी
– लघुउत्तरी प्रश्न
(शॉर्ट ॲन्सर),() भाषा क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी) बहुपर्यायी प्रश्न  (मल्टिपल चॉईस)

प्रत्येक अचुक उत्तरास चार गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो.परीक्षेचा कालावधी 2 तास. प्रत्येक सेक्शनसाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. उमेदवारांना पेपरमध्ये ठरवून दिलेल्या सेक्शनच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावे लागतात. या तिनही भागांसाठी  विशिष्ट असा कटऑफ (किमान गुण) ठरवण्यात येतो. तो कटऑफ प्राप्त करणे आवश्यक आहे. हे किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. (प्रत्येक संवर्गासाठी हे किमान गुण वेगवेगळे राहतात.)

कलचाचणी आणि मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या उमेदवारांची निवड अंतिम यादीसाठी केली जाते. कल चाचणीस ६५ टक्के वेटेज आणि मुलाखतीस ३५ टक्के वेटेज दिले जाते.

 क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीच्या भागात अलजेब्रा, मॉर्डन मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री, डाटा ॲनॅलिसिस, अॅरिथमॅटिक
यावरील प्रश्नांचा समावेश असतो. व्हर्बल ॲबिलिटच्या भागात व्हर्बल रिझनिंग
, रिडिंग कॉम्फ्रिहेन्शन, एरर्स इन युसेज, या घटकांवर प्रश्न विचारले जातात. अंतिम यादित ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशातील  ३४ शहरांमध्ये घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – मुंबई, पुणे आणि नागपूर. या अभ्यासक्रमांना १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.


      
अर्हता
२०२१ आणि २०२२मध्ये कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि २०२३ मध्ये कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांचा निकाल ३१ जुलै २०२३ पर्यंत लागायला हवा.

काय शिकाल?

पहिल्या तीन वर्षात पुढील विषय शिकवले जातात- फंडामेंटल कोर्सेस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स, लिनिअर प्रोग्रॅमिंग,
स्टॅटिस्टिकल मेथड्स, सॅम्पलिंग डिस्ट्रिब्युशन ॲण्ड स्टॅटिस्टिकल इन्फरंस, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स, मायक्रो ॲण्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमी, इंटरनॅशनल ट्रेड,
एनव्हीरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स, इंट्रोडक्शन टू सोशिऑलॉजी, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, पोलिटिकल थिअरी- वर्ल्ड हिस्ट्री, पब्लिक पॉलिसी, रिसर्च मेथडॉलॉजी, लॉ, अकाउंटिंग, बिझिनेस हिस्ट्री, बिझिनेस गव्हर्नन्स ॲण्ड सोसायटी, इंग्रजी – फ्रेंच-स्पॅनिश – जर्मन, प्रेझेंटेशन स्किल्स, डान्स- म्युझिक- ड्रामा-स्पोर्ट्स.

चौथ्या आणि पाचव्या वर्षी पुढील विषय शिकवले
जातात

कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, फायनांस ॲण्ड अकाउंटिंग, ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायंस, इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स ॲण्ड ऑर्गनाझेशनल बिहेव्हियर, ऑपरेशन मॅनेजमेंट ॲण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, स्ट्रॅटेजी, रुरल इर्मशन प्रोग्रॅम, हिमालय आऊट बाउंड
प्रोग्रॅम, इंडस्ट्री व्हिजीट वर्कशॉप

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बॅचलर ऑफ आर्ट्स (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. ३ वर्षानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. त्याला बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ही पदवी प्रदान केली जाते.

 

संपर्क – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर, राऊ -पितमपूर रोड, इंदौर-
453556, दूरध्वनी- 0731-2439689,२४३९७९५
संकेतस्थळ –
www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in