(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 विषयांची निवड

विद्यार्थ्यांसाठी
दहावीचं वर्षं हे महत्वाचं असतं. त्याच्या कुमारविश्वात हळूहळू करिअरची स्वप्न
आप्तस्वकीयांकडून पेरायला सुरुवात होते. मोठी स्वप्न पहा असं सांगितलं जातं.
(अर्थातच अजुनही ही स्वप्ने इंजिनीअरिंग, मेडिकल, सीए यापलिकडे जात नाहीत.) हा दहावीतला कुमार त्या स्वप्नाच्या दिशेकडे बघू लागतो. मार्गदर्शन,
सूचना आणि अनंत सल्ले अशा विविध मार्गांनी त्याला या स्वप्नपूर्तीची दिशा दाखवली
जाते. तो सुध्दा आपल्या मनात जमेल तसे आराखडे तयार करायला लागतो.

१० वी
नंतरचा प्रवास हा खऱ्या अर्थाने करिअरची दिशा ठरवण्यासाठी योग्य असतो. दहावीनंतर
विषयांची निवड करता येते. विषयांची निवड करताना, आपलं स्वप्न काय
? हे सुध्दा लक्षात घ्यावं लागतं. स्वप्न आहे वैमानिक बनायचं आणि विषय
निवडवावे वाटतात ते अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा जीवशास्त्र. पण वैमानिक होण्यासाठी
१२ वीपर्यंत किंवा १२ वीमध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं असतं. समजा
इंजिनीअर व्हायचं आहे,अपण १० वी पर्यंत भौतिकशास्त्र चकवा देत असेल तर १२ वीनंतर
अभियांत्रिकीशाखेला प्रवेश मिळाला तरी भौतिकशास्त्र हा विषय विकेट उडवू शकतो किंवा
इंजिनीअर बनण्याचा मार्ग आणखी खडतर करु शकतो. त्यामुळे आपणास कोणता विषय अधिक
आवडतो, कोणत्या विषयात उत्तम कामगिरी करणं सहजेतेनं जमतं आणि दहावीनंतर जो करिअर
करण्याचा संकल्प केलाय, त्यासाठी कोणत्या विषयांची गरज भासू शकते, याचा साधकबाधक
विचार करायला हवा. उपरोक्त नमूद बाबींमध्ये कोणता विषय बसतो, याची प्रामाणिक
चाचपणी आपण घेऊ शकतो. त्यातून आपल्याला आंनददायी वाटणाऱ्या आणि करिअर करण्यासाठी
उपयुक्त ठरणारा विषय किंवा विषयगट समोर येऊ शकतो.

विषय
गट

काही
वर्षांपूर्वी भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, जीवशास्त्र
आणि रसायनशास्त्र हे विषयांचे दोन गट अत्याधिक महत्वाचे समजले जात. कारण एका
गटाद्वारे अभियांत्रिकी शिक्षणाचा तर दुसऱ्या गटाद्वारे वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग
मोकळा होत असे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांमधील करिअर म्हणजे जीवनाची
इतिकर्तव्यता असंच समजलं जायचं. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत आहे. पालक आणि
विद्यार्थी आता या दोन शाखांव्यतिरिक्त इतर ज्ञानशाखांचाही विचार करु लागले आहेत.
इतर ज्ञानशाखा सहजतेने उपलब्ध झाल्या आहेत. या ज्ञानशाखेतून घेतलेले शिक्षण
चांगल्या दर्जाचे करिअर घडवण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहेत. अर्थशास्त्र किंवा वित्त
अशा क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी गणित विषयाचा उपयोग होतो. गणित विषयात गती
असल्यास अभियांत्रिकी शिवाय अर्थकारण/ वित्त व्यवस्थापन/वित्त नियोजन अशासारख्या
विषयात चांगलं करिअर करता येऊ शकतं. मात्र गणितात गती नसल्यास या विषयांचे आकलन
होणं कठीण जाऊ शकतं.

शिक्षण
मंडळाचे अभ्यासक्रम

सध्या
सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन
( केंद्रीय शिक्षण मंडळ)
आणि राज्य बोर्डाचे अभ्यासक्रम (राज्य शिक्षण
मंडळ
) हे विविध शाखांच्या प्रवेश परीक्षांसाठी उपयुक्त
ठरणारे आहेत. एवढेच नव्हे तर नागरी सेवा परीक्षेच्या प्राथमिक परीक्षेच्या
अभ्यासासाठी बरेच विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या
(सीबीएसइ) १० वी ते १२ वीपर्यंतच्या पुस्तकांचा
अभ्यास करतात. इंडियन काउंसिल फॉर स्कूल सर्टिफिकेट किंवा आयसीएस या बोर्डाचा
अभ्यासक्रम हा सीबीएसइ पेक्षा अधिक विस्तृत असतो. विशेषत: मानव्यशास्त्र आणि भाषा
विषयात प्रावीण्य मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमात
अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांवर भर दिला जातो. इंटरनॅशनल जनरल
सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन किंवा आजीसीएसई हा अभ्यासक्रम केंब्रीज
विद्यापीठाने विकसित केला आहे. हा सुध्दा पारंपरिक शिक्षण मंडळाच्या
अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि विस्तृत असतो. अभ्यासासाठी क्रमिक पुस्तकांपेक्षा
शिक्षकांकडून इतर पुस्तके सुचविली जातात. त्याचे वाचन व आकलन महत्वाचं असतं. या
अभ्यासक्रमात स्वयंअध्ययनावर अधिक भर देण्यात येतो. इंटरनॅशनल बॅक्कालौरेट किंवा
आयबी डिप्लोमा हा स्वित्जर्लंड देशातील जिन्हिवा येथे असलेल्या इंटरनॅशनल
बॅक्कारोरेट संस्थेमार्फत चालवला जातो. हा अभ्यासक्रम ११ वी १२ वीसाठी करता येतो. हा
संस्थेचा अभ्यासक्रम सुध्दा पारंपरिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा अधिक
विस्तृत आणि विद्यार्थ्यांची सखोल अभ्यास करण्यासाठी मानसिक व बौध्दिक तयारी
करणारा असतो. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर
४००० शब्दांपर्यंतचा सखोल आणि संशोधनात्मक निबंध लिहावा लागतो. तो विद्यापीठीय
संशोधन पेपरच्या आसपास जाणारा असतो. हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी अमेरिकेतील
पदवीस्तरीय अभ्यासक्रमांना इतर बोर्डातील विद्यार्थ्यांपेक्षा सहजतेने प्रवेश
मिळवू शकत असल्याचं दिसून आलं आहे. पण कोणत्या बोर्डाचा अभ्यासक्रम करायचा याचा
निर्णय विद्यार्थी व पालकांनी आपली आर्थिक स्थिती अवतीभवतीची परिस्थिती, विद्यार्थ्याची
बौध्दिक क्षमता, परिश्रम करण्याची तयारी आदी घटकांना लक्षात घेऊन करायला हवी. त्यानुरुप
आवडणारे विषय आणि करिअर घडविणाऱ्या विषयांचा समक्यपणे विचार केल्यास स्वपपूर्तीची
दिशा मिळू शकते. त्या दिशने वाटचाल केल्यास मनात ठरवलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहचणे
सुलभ व सहजरीत्या होऊ शकते.

करिअरचे
काही पर्याय

() भौतिकशास्त्र- गणित-रसायनशास्त्र
हे विषय १२ वीला असल्यास विद्यार्थ्यांना
() अभियांत्रिकी, () एव्हिएशन –
विमान वाहतूक
, () फॅशन टेक्नॉलॉजी – तंत्रज्ञान, () हवाई दल आणि नौदल, () मर्चंट नेव्ही – व्यापारी किंवा व्याणिज्यिक नौकानयन, () भारतीय वन सेवा () गणित हा विषय घेतला असल्यास, () माहिती तंत्रज्ञान – आयटी,(कृत्रिम
बुध्दीमत्ता/डीप लर्निंग/नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग/मशिन लर्निंग
) () वित्त, () वास्तुकला, ()
अर्थशास्त्र/वित्त
(ॲनॅलिटिक्स) या
शाखांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते.
() भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या
विषय घटकांना घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर करता येतात–
() वैद्यकीय, () आक्युपेकशनल थेरपी, () फिजिओथेरपी, () जैवरसायनशास्त्र, ()
डायटेशिअन-आहारशास्त्र, () कलाशाखा किंवा वाणिज्यशाखा
किंवा विज्ञानशाखेतील सर्व विषय घेतल्या विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळू शकतात-
() मार्केटिंग- विपणन, () जनसंपर्क, () जाहिरात, () पत्रकारिता, () विधि, () मानसशास्त्र, () मनुष्यबळ विकास, ()
क्रीडा, () अभिकल्प – डिझाइन, (१०) हॉटेल
मॅनेजमेंट
, (११) समाज कार्य, (१२) शिक्षण/अध्यापन, (१३) केंद्रिय नागरी सेवा, (१४)
राज्य सेवा,
(१५) बँका व इतर वित्तीय
संस्थांमधील विविध संवर्ग.

००००

लिबरल आर्ट

गेल्या
काही वर्षात ही एक नवी ज्ञानशाखाही विकसित होत आहे. या शाखेत प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्याला मूळ विषयासोबत त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करणे शक्य होऊ
शकते. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी भौतिकशास्त्र विषयासोबत पेंटिंगचाही अभ्यास करु
शकतो.

पुणे स्थित
सिम्बॉयसीस स्कूल ऑफ लिबरल आर्टस
या संस्थेत लिबरल आर्टसचे अभ्यासक्रम सुरु
केले आहेत.

या
संस्थेत बीए
(ऑनर्स) आणि
बीएस्सी
(ऑनर्स) इन
लिबरल आर्ट्स हे अभ्यासक्रम करता येतात. स्पेशलायझेशन मधील मुख्य
(मेजर)
विषयानुरुप पदवी प्रदान केली जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे असा आहे. हा
अभ्यासक्रम आठ सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे.

मुख्य (मेजर) स्पेशलायझेशनचे
काही विषय –
() अर्थशास्त्र, () इंग्रजी, () तत्वज्ञान, () कॉम्प्युटर
स्टडीज
, ()
समाजशास्त्र
, () इतिहास, () मानववंशशास्त्र, () बिझिनेस
स्टडीज
, () मीडिया
स्टडीज
, (१०) मानसशास्त्र, (११) गणित
आणि सांख्यिकी
, (१२) आंतरराष्ट्रीय
संबंध
, (१३) राज्यशास्त्र
आणि सार्वजिनक धोरण
, (१४) समाज
शास्त्र

मायनर
स्पेशलायझेशनचे विषय –
() फिल्म
स्टडीज
, () जीवशास्त्र, () भौतिकशास्त्र, () नृत्य,संगित,रंगमच,
() शांतता
आणि संघर्षाचा अभ्यास
, () वुमेन
ॲण्ड जेंडर स्टडीज
,

संपर्क- तिसरा
माळा, नवीन सिम्बॉयसीस कॅम्पस, सिम्बॉयसीस रोड, विमान नगर,पुणे- ४११०१४, संकेतस्थळ-
ssla.edu.in, ईमेल-admission@ssla.edu.in

गांधीनगर स्थित पंडित दिनदयाल एनर्जी युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ
लिबरल स्टडीज
ने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

() बीबीए (ऑनर्स इन) () मार्केटिंग,() ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, () फायनांस, () बी.कॉम (ऑनर्स इन) ()फायनांस ॲण्ड अकाउंट्स () बँकिग
ॲण्ड इंश्युरन्स
() मॅनेजमेंट ॲण्ड
मार्केटिंग
() आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड
इंटरनॅशनल ट्रेड,
() बीए (ऑनर्स इन) ()इंग्लिश, () गव्हर्नन्स ॲण्ड
पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन,
() सायकॉलॉजी,
() मास कम्युनिकेशन, (),इकॉनॉमिक्स, () इंटरनॅशनल ट्रेड. संपर्क-www.sls.pdpu.ac.in, ईमेल-
slsadmission@pdpu.ac.in