संगणकाचे प्रगत अभ्यासक्रम:
सीडॅक सुरु केलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना
नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये आठव्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले
आहे.याचा अर्थ हे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे आणि
रोजगार व स्वयंरोजगार क्षम आहेत.त्यामुळेच हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना
संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्लेसमेंट प्रक्रियेत उत्तमोत्त संधी मिळत
असतात.
प्लेसमेंट-सीडॅकमध्ये ३००हून
अधिक कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात.
प्लेसमेंटसाठी सर्व
विद्यार्थ्यांना नॅशनल लेव्हल कॉमन कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम-राष्ट्रीय सामायिक
कॅम्पस निवड कार्यक्रम व्दारे साहाय्य केलं जातं.
ही प्रक्रिया महिनाभर सुरु
राहते.यामध्ये देशभरातील सर्व कॅम्पसमधील सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सहभागी
होऊ शकतात.सीडॅकतर्फे अधिकाधिक कंपन्यांना आकर्षित केलं जातं.प्लेसमेंट प्रक्रिया
दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात राबवली जाते.सरासरी वार्षिक वेतन हे ४.५ ते
८ लाख रुपये या श्रेणित असतं.१० टक्के कंपन्या १० ते १३ लाख वार्षिक वेतन
देतात.इतर १० टक्के कंपन्या ८ ते १० लाख रुपये वार्षिक वेतन देतात.
ओरॅकल,जावा,युनिक्स,आयफोन,ॲनड्रॉइड,क्लाऊड कॉम्प्युटिंग,लिनक्स,बोर्ड
डिझाइन,इन्फॉर्मेशन सेक्युरिटी,एम्बेडेड टेक्नॉलॉजी,बिग डाटा इत्यादी तंत्र
कुशलतेला प्राधान्य दिलं जातं.प्लेसमेंट मध्ये निवडीसाठी विविध घटकांचा विचार केला
जातो.यामध्ये सीडॅकच्या परीक्षेतील गुण,दहावी-बारावी पदवीमधील गुणांचा विशेषत्वाने
विचार केला जातो.
प्रकियेमध्ये पुढील कंपन्या
सहभागी होतात. एबीबी,ए फोर टेक्नॉलॉजी,ॲक्सेस,ॲकलट्री,अदिती टेक्नॉलॉजी,ॲडव्हेंट
सॉफ्टवेअर,ॲफ्लेक,एआयजी,एअरबस,अल्गोरिथम,अलोहा टेक्नॉलॉजी,ॲमडॉस,ॲमिगा
डेव्हलमेंट,ॲन्टारिक्स,अपेक्स व्हेंडिंग इंफो,ॲनुरा,ॲपमिक्स टेक्नॉलॉजी,ॲपतारा,आर्किटेक्ट
एसएपी सोल्युशन,ॲटॉस ओरिजिन,ऑगस्टोल,ऑटो टेक,ॲक्सिस बँक,अजिंगो,ॲजटेक
पॅसिफिक,बालाजी इंटर इंफो,बार्कले,बेंच मार्क,बायोइनॅबल,बिटवाइज ग्लोबल,ब्ल्यू
लेन,बीएमसी,बॉश,ब्रियॅनव्हीसा,कॅनन,केपजेमिनी,कॅपसिलॉन,सीडॅक,कॉरिडस,सिस्को,कॉमॅस्साइट्स,क्रेडेंटेक,सीआरएल,सीएसएसए
इंफो मीडिया ,कसपिऑन,कुम्युलस सिस्टिम,सायबेस,डाटाफिक्स,डेकॉस,डेलॉप्ट,डिझायर
सॉफ्टवेअर,डिजिटल ग्रुप,डायरेक्टी,डीव्हायटिस,डायव्हम,डीएनएस,दुसाने इंफोटेक
अभ्यासक्रम-
हे
अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतात- या अभ्यासक्रमांचा कालावधी सहा
महिन्यांचा आहे.
यातील काही अभ्यासक्रम हे
ऑनलाईन वा ऑफला
अर्हता-बीई/बीटेक(इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर
सायंस/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रिकल किंवा एमएस्सी-
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायंस/इलेक्ट्रॉनिक्स)इन
पध्दतीने करता येतात.
पोस्ट ग्रॅज्यूएट
डिप्लोमा कोर्स इन(१)बिग डाटा
ॲनालिटिक्स, (२)आर्टिफिशिअल
इंटेलिजन्स, (३)बायोमेडिकल
इंस्ट्रुमेंटेशन, (४) मोबाइल
कॉम्प्युटिंग, (५)हाय परफॉर्मन्स, (६)व्हीएलएसआय, (७)इंटरनेट ऑफ थिंग्ज, (८)सॉफ्टवेअर
डेव्हलपमेंट, (९)इन्फॉर्मेशन डाटा, (१०)सायबर सेक्युरिटी ॲण्ड इथिकल हॅकिंग, (११)एम्बेडेड सिस्टिम डिझाइन, (१२)ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, (१३)आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, (१४)सिस्टिम
सॉफ्टवेअर डिझाइन.
या अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर सीडॅक-कॉमन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते.
प्रशिक्षण केंद्रे-
हे अभ्यासक्रम बेंगळुरु, भूवनेश्वर, चेन्नई, गौहाटी, हैदराबाद, इंदोर, कराड, चेन्नई,
कोची, कोलकता, मोहाली, मुंबई(ॲकॅडेमी ऑफ इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी,५वा माळा,यशंवंतराव चव्हाण केंद्र,नरिमन पॉईंट,जगन्नाथराव भोसले
मार्ग,मुंबई ४०००२१,दूरध्वनी- ०२२-२२८१७९७६,सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ
कॉम्प्युटिंग,गुलमोहर क्रॉस रोड क्रमांक ९ जुहू,मुंबई
४०००४९,दूरध्वनी-०२२-२६२०१६०४), नाशिक, पुणे, सिलचर आणि
थिरुवनंतपूरम येथे आहेत.
संपर्क-ईमेल-actssupport@cdac.in
सुरेश
वांदिले