(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

राजा…

लोकलट्रेन स्थानकाच्या आसपास अनेक प्रकारची दुकानं आहेत.या दुकांमध्ये काही उपहारगृह
तर काही टेक-अवे अशी घरी घेऊन जाऊ शकणाऱ्या पदार्थांची दुकानं आहेत. या दुकानातील
काही खाद्पदार्थ अधून-मधून बाहेर टाकलं जातं.ते त्याच परिसरात राहणाऱ्या एका मांजरीच्या
आणि कुत्र्याच्या लक्षात आलं.त्यामुळे ते दोघेही त्या दुकानांच्या आसपास राहू
लागले.बाहेर टाकले जाणारे अन्नपदार्थ बरेच असल्याने दोघांनांही ते पुरेसे
होते.त्यामुळे त्या दोघांमध्ये फार कुरुबुरी होत नसत.
हे दोघेही या दुकानांच्या
आसपास सतत घुटमळत असल्यानं दुकानादारांना यांचा हळूहळू लळा लागला.त्यामुळे त्यांना
आता ताजे ताजे अन्नपदार्थही मिळू लागले.

दोघांचं
तसं छान चाललं होतं.या दोघांमध्ये मांजरताई स्मार्ट आणि चलाखह होती.तिला
कुत्रेदादा फारसा आवडत नसे.हा मध्ये-मध्ये कलमडतो कशाला
? असं तिला सारखं वाटायचं.आपण एकटचं असतो तर इथं आपलंच राज्य राहिलं
असतं.असं मांजरताई मनातल्या मनात म्हणे. कुत्रेदादास असं काही वाटत नसे. खरं तर तो
याचा विचारही करत नसे. त्याला मांजरताईची अजिबातच अडचण वाटायची नाही. एखादे दिवशी
एखादा पदार्थ उरला तर तो मांजरताईला आवर्जून देई.पण मांजरताई मात्र असं कधीच
करायची नाही.ती आप्पलपोटी होती.कुत्रेदादा या ठिकाणाहून कसा पळून जाईल याचाच ती
विचार करत राही.

त्यामुळे
तिला कुत्रेदादासोबत मनापासून मैत्री करता आली नाही.मांजरताईला आवडत नसावं म्हणून
कुत्रेदादानेही तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न सोडून दिला.फक्त
नमस्कार-चमत्कार,हाय-हॅलो करण्यापुरतेच संबंध राहिले.

याचा
मांजरताईला आनंदच होता.बरे झाले बुवा मैत्री करण्याच्या आपण फंदात पडलो नाही. असं
ती स्वत:ला समजावयची आणि खुष व्हायची.

कुत्रेदादास
इथून कसं हाकलायचं याच विचारात ती कायम गुंतलेली असायची. विचार करता करता एके
दिवशी तिला सुचलं की एका दुकानाजवळ एक झाडं आहे.त्या झाडावर या कुत्रेदादास
चढण्याचा आग्रह करु आणि वर गेलो की त्याला खाली ढकलून देऊ.म्हणजे मग याचे पाय
मोडतील.याला मग अनाथालायात जावं लागेल. वा वा वा
sss काय
झक्कास आयडीया
!ती स्वत:लाच म्हणाली.

आता
प्रश्न निर्माण झाला की,कुत्रेदादास कसं झाडावर चढण्यासाठी प्रवृत्त करायचं
?

एके
दिवशी झाडाजवळच्या दुकानादाराने खायचे पदार्थ दोघांसाठीही बाहेर ठेवले.मांजरताईने
त्यातले काही पदार्थ उचलले आणि ती धुम झाडावर चढली.कुत्रेदादाने फार काही तिकडे
लक्ष दिलं नाही.

असेच तीन चार दिवस
गेले.कुत्रेदादा, जरासुध्दा आपण झाडावर कां चढतो
? यात रस
दाखवत नाही हे बघून मांजरताईची चिडचिड वाढली.

पाचव्या दिवशी मात्र
तिच्याच्याने राहवेना..

तिने कुत्रेदादास अखेर
विचारलच,

अरे,मी
एखादा पदार्थ घेऊन या झाडावर चढते,याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का
?

मला काय
वाटणार बुवा
?पाय तुझे.तुला चढायला आवडत…यात काय
विचारण्यासारखं
?

तुला
माझं कौतुक नाही वाटत
!किती झर्रदिशी मी झाडावर चढू शकते.
तुला हेवासुध्दा वाटायला हवा, की इवलीशी पिटुकली मांजर झपकन झाडावर चढू शकते आणि
आपण अगडबंब असूनही चढू शकत नाही.मांजरताईने कुत्रेदादास चिडवत म्हणालं.

कुत्रेदादास
या चिडवण्याचं काहीच वाटलं नाही.तो म्हणाला,अगं मला कशासाठी हेवा वाटणार तुझा
?तुला चढण्याचा आनंद मिळत असेल छानच आहे की!दुसऱ्याच्या
आनंदाचा हेवा करायचा नसतो असं माझ्या आईनं शिकवलय बरं का
?त्यामुळे
तू तुझा आनंद कितीही वेळा घे,मला त्यात अजिबातच रस नाही.

अरे,पण
वर झाडावर एक गंमत आहे म्हणून तर मी पदार्थ घेऊन झरदिशी वर जाते
! तुहीवर चढलास तर तुलाही ती गंमत दिसेल ना!

नाही बाँ!मला नाही बघायचीच झाडावरची गंमत!तुझी तुलाच
लखलाभ.कुत्रेदादा म्हणाला.

हा
कशानेच बधत नाही हे बघून मांजरताईस राग आला.त्या रागारागातच ती झाडावर झपदिशी
झेपावली.यावेळी तिची उडी चुकली आणि ती धप्पदिशी खाली पडली.तिला खरचटलं,पायाला
लागलं.डोळयात कचरा गेल्याने समोरचं दिसायला जड जात होतं.

ती खाली
पडल्याने दुकानदार लगेच धावला.त्याने आपल्या नोकरास मांजरताईस प्राण्यांच्या
दवाखान्यात नेऊन जायला सांगितलं.

हे बघून
मांजरताई रडायला लागली.

अगं,तू
रडतेस कशाला
?बरी होऊन ये आणि पुन्हा तुझा आवडीचा खेळ खेळ. कुत्रेदादा
तिला प्रेमाने म्हणाला.पण तिची काही कुत्रेदादाच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत
झाली नाही.दुसऱ्यांचं अहित चिंतलं की आपणच संकटात सापडतो हा धडा मांजरताईला मिळाला
होता.पुढे अनेक दिवस मांजरताईस दवाखान्यातच राहवं लागलं.त्यामुळे काहीही न करता
कुत्रेदादाच त्या ठिकाणाचा राजा झाला.

सुरेश
वांदिले