(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नोबेल पुरस्काराचे रहस्य

   दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास,किंगकाँग यांनी विचारलं.

   इंद्रपुरीत दररोज सुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लितअसणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत असा प्रश्न किंगकाँग यांनापडला.दारासिंग यांनी किंगकाँग यांच्याकडे बघितले आणि ते धाय मोकलून रडू लागले.

   रुस्तमहिंद असे रडणे बरे नव्हे हो.तुज काय झाले ते मज कळू तरी दे.

   हुंदके देत दारासिंग उत्तरले,किंगकाँगा,तू निरक्षर राहिलास ते बरेच झाले.मी शिकलो म्हणूनमला वाचता येतं आणि त्या वाचनाने आज सक्काळी सक्काळी मज वेदना दिल्या.त्याचे हे दु:आहे.

   झाले तरी काय,सांग बघू,मी निरक्षर असलो तरी निरक्षिर विवेकासाठी साक्षर असणं गरजेचंनाही असं शेक्सपिअरने म्हंटले आहे.अश्रू ढाळायचे थांबव नि तू सक्काळी काय वाचले ते सांग.

   ते वाचून मज मोठाच धक्का बसला.

   प्रस्तावना पुरे..

   किंगकाँगा,मी पाच लाख लिटर्सपेक्षा दूध प्यालो असेल ना आतापावेतो.

   तो इसमे कोणसी बडीबात है,हिंदुस्थान के पहिलवान सालोसे यही करते आये है.कुणाच्यातरी गैरसमजुतीला तुम्ही पहेलवान बळी पडलात.

   तसे नाही .दूध प्याल्यानेच बॉडीशॉडी तयार होते.

   असे भीमाने म्हंटल्याचे तुझ्या कानावर गेले का.व्यासमुनिंनी त्यांच्या महाभारतात साऱ्याच गोष्टीलिहून ठेवल्या.हे लिहिलं का?मी तर वाचू शकत नाही.पण एकदा ब्रुसलीने मला महाभारतवाचून दाखवले होते.त्यामुळे मला माहीत आहे.दूध प्याल्याने बॉडीशॉडी होते,ही अफवाच. हिंदुस्थान हा अफवांचा देश आहे असे मी म्हंटले तर तुला राग येऊ नकोस दारा.

दूध प्याल्याने बॉडीशॉडी तयार होते असे कुठे म्हणतो मी. मग,

   पाच लाख लिटर्स दूध पिऊनही मला नोबल पुरस्कार मिळाला नाही ना.

   कोणत्या कुस्ती प्रकारातला हा पुरस्कार आहे,दारा.मी तर कधी ऐकलच नव्हतं.

    हा कुस्तिचा पुरस्कार नाही.हा पुस्तकांचा पुरस्कार आहे.जगातल्या उत्कृष्ट पुस्तकांसाठी दिलाजातो.

   त्याच्याशी तुझा काय संबंध.पहेलवानाची बुध्दी घुटन्यात.मेंदूत थोडीच असते,

    किंगकाँगा तुझं म्हणणं उत्तमच आहे,पण मी प्यालेले पाच लाख लिटर्स दूध वाया नाही कागेले.

   ते कसे..

   आज सक्काळी मी नवं संशोधन वाचलं,ज्या व्यक्ती खूप दूध पितात त्यांना नोबेल पुरस्कारमिळतात.असं हे संशोधन सांगतं..

   असे होय.

   म्हणून मला रडू येत आहे..

   असा तू रडू नकोस.तू ते संशोधन पूर्ण वाचले का.

   होय तर..

   मग त्यात कोणते दूध पिल्याने नोबेल पुरस्कार मिळतो असे म्हंटले आहे.किंगकाँग यांनीविचारले.दारासिंग यांनी इंद्रपुरी ट्रिब्युन खिशातून बाहेर काढला.बातमी वाचून काढली.किंगकाँगयांचे म्हणणे खरेच होते. दूध कुणाचे हे काही नमूदच नव्हते.

   तू म्हणालास ते खरेच आहे.गायीचे,म्हशीचे,शेळीचे,मेंढीचे,कुत्र्याचे,सापाचे की गाढवाचे.दूधकुणाचे,हे लिहिलेच नाहीत.

   असं असतं या गोऱ्यांच संशोधन.चकवा देतात. एवढी थंडी असते तिकडे.थंडित काय पितात,

   ब्रँडी.

   किंवा मग तिची बहिन शॅम्पेन,तिची काकू व्हिस्की,तिची मावशी व्होडका,तिची मामीवाइन.हो की नाही.

   खरेच की.

   यात दूध आले कुठून.

   इंद्रपुरीकडे प्रस्थान करेस्तोव विन्स्टन चर्चिल,काय प्राशन करीत होते..

   ब्रँडी,शॅम्पेन,व्हिस्की,व्होडका,वाईन.

   करेक्ट..त्यांना काय मिळालं.

   नोबेल पुरस्कार..

   खरं की रे..जे दूध पितात त्यांना रुस्तम हिंद पुरस्कार मिळतो नि जेब्रँडी,शॅम्पेन,व्हिस्की,व्होडका,वाईन पितात त्यांना नोबल पुरस्कार मिळतात,असं हे गणित आहे तर..

   तू सक्काळी वाचलेल्या संशोधनाचा बिटवीन लाइन अर्थ असाच आहे,दोस्ता..किंगकाँगम्हणाले.