(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पाचवं स्पिरिट

मुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं. विशेषत: मोठा घातपात – अपघाताचा प्रसंगघडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी. (म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरेवगैरे…) खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे. पण स्पिरीटची ही सरळमिसळ गमतीदायकच.

   मुंबईकराचं तिसरं स्पिरीट हे बेस्टमध्ये आणि लोकलमध्ये दिसतं. वर्किंग डेजला मुंबईकर वेगळयाचस्पिरिटमध्ये बेस्ट किंवा लोकल पकडण्यासाठी सुसाट /सैराट असतो. हे स्पिरिट डेव्हिलीश वृत्तीचं असतं. महाभारतीय अर्जुनाला ज्याप्रमाणे स्वयंवराच्यावेळी केवळ मासोळीचा डोळा दिसत होता, त्याचप्रमाणे थांब्यावरयेणारी बेस्ट आणि फलाटावर येणाऱ्या लोकलमध्ये-प्रचंड गर्दी असली, इतर प्रवासी लोंबकळत असले तरीकाहीही करुन घुसणे आणि जागा पटकावणं एव्हढचं हे डेव्हिल स्पिरीट जाणतं.

   बेस्ट आणि लोकलच्या आतमध्ये आधीच बसून आलेल्यांचे स्पिरिट हे चौथ्या प्रकाराचे. त्यांचा भावआणि आव हा नेपोलियन बोनापार्टसारखा किंवा राणी व्हिक्टोरियांसारखा म्हणजेच जगजेत्त्या सारखा. किंचितसंउभं राहायला मिळालेल्यांच्या नजरेत कधी आपण नेपोलियन वा व्हिक्टोरिआ होऊ याची घाई दिसते. त्यांचीभिरभिरती नजर ही घुबडासारखी 360 च्या अंशाने चौफेर फिरत राहते. काहींना बसण्याची संधी मिळते तेव्हाप्रत्यक्षातील नेपोलियन वा व्हिक्टोरिआला एखादे राज्य जिंकताना झाला नसेल इतका अत्यानंद त्यांना झालेलाअसतो.

   या सगळयांमध्ये पाचवे स्पिरिट अदृष्यरीत्या आपला प्रभाव पाडून असतं. सध्या बहुतेक सर्वजण गळयात,पाठीमागे ,पोटासमोर किंवा हातात बऱ्यापैकी जाड अशी बॅग घेऊनच घरातून निघतो. पूर्वीही निघतअसेल. पण त्या बॅगांची जाडी दिवसेंदिवस अमूक-तमूक शेटजींच्या पोटासारखीच वाढत चाललीय. जादूच्यापोतडीसारखं हे असतं. छत्री, पाण्याची बॉटल, लॅपटॉप, एखादे जाडजूड पुस्तक, एक- दोन वृत्तपत्रे असाहा जामानिमा आणि बरच काही या पोतडीत असतं.

   बेस्ट किंवा लोकलच्या डब्यांमध्ये अमूक अमूक संख्येनं प्रवासी बसू शकतात, घुसू शकतात, उभे राहूशकतात, लोंबकळू शकतात. याचा भागाकार आणि गुणाकार प्रशासकीय पातळीवर  झाला असलाचपाहिजे. पण आहेस्ते आहेस्ते वाढत गेलेल्या प्रवाशांच्या या पोतडीच्या आकारावर मंथन झालेलं दिसत नाही. बेस्ट मध्ये 50 प्रवासी असतील तर त्यांच्या पोतडया आणखी 10 -12 जणांची जागा खातात की राव. बेस्ट आणि लोकल डब्याचा आकार आणि उकार मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेला नाही. काही बसेस याआक्रसल्या. वळणवं सोपं जावं म्हणून छोट्याही झाल्या. गर्दी ही अशी वाढली आणि वाढता वाढता वाढेअशा पोतड्यांची भर पडली.

    लोकलच्या डब्यात या पोतडया ठेवायला व्यवथा असली तरी ती किती पोतड्यांना पुरेशी ठरणार? म्हणजेच एका डब्यात 200 प्रवासी असतील तर पोतडया आणखी 25 – 35-45 प्रवाशांच्या जागेवरअवैधरीत्या आपले बस्तान बसवतात. मोकळ्या जागेत झोपडया कधी वसतात हे जसे कधीच कळत नाही,त्ासच हेही आपल्या डोक्यावरुन जातं.

   पोतड्या सांभाळत उभं राहणं, हिमालय किंवा विंध्यपर्वतावर ऋषीमुनींच्या एका पायावर उभं राहूनतपश्चर्या करण्यापेक्षाही कठीण कर्म असतं. या कर्माला, आसनस्थ नेपोलियन बोनापार्ट नामक कर्ता-पुरुषकिंवा राणी व्हिक्टोरिआ नामक कर्मणी-प्रयोग आणखी बिकट करतात. कारण त्यांच्या हाताला, खांद्यालाकिंवा चुकून डोक्याला पोतडी लागणार नाही याची काळजी वाहावी लागते.एका हाताने वरची दांडी धरण्याचीकाळजी नि दुसरी ही. ही कसरत करत असताना बस किंवा लोकलच्या हलण्याडुलण्यामुळे पोतडीचा धक्काआसनस्थ नेपोलियन किंवा व्हिक्टोरिआला लागतोच. बस कां हलली? ड्रायव्हरने ब्रेक कां जोराने दाबला? खड्डा मध्ये कां आला?असा जाब विचारण्याची तसदी आसनस्थ मान्यवर क्चचित घेतात. हे आसनस्थ हिजहायनेस किंवा हर हायनेस अशावेळी उभ्या असलेल्या प्रवाशांकडे तुच्छतेने बघतात. त्यांच्या डोळयातले भाव हेअव्ययीप्रयोगाच्या पलिकडचे असतात. पोतडी घेतलेला उभा प्रवासी  आपल्याच नशिबी कां, दुसरीकडे कांनाही असे भाव त्यांच्या नजरेत येतात.. सकाळी निघताना किमान आजचं भविष्य टीव्हीवर बघितलं असतं तरबर झालं असतं, असही त्यांना वाटण्याची शक्यता असते. उभ्या असणाऱ्याने दुसरा हात सोडून स्वत:च्याडोक्यावर पोतडी ठेवावी आणि डोंबाऱ्याच्या खेळातील मुलीसारखं बॅलन्स सांभाळावं असंही, हर आणि हीजहायनेसला वाटतं.उभ्या असलेल्या पामरांना त्यांच्या शाळेत आणि घरी एटिकेटस आणि मॅनर्स शिकवण्यातआलेले नाहीत,असं आसनस्थ मान्यवरांना वाटतं.(हर आणि हिज यांच्या रिसपेक्टिव्ह शिव्यांसह )कहाँ कहाँसेआते है, हा फिल्मी डॉयलॉग त्यांच्या मेंदूत उमटण्याचीही शक्यता असते.

   त्या गर्दीत,एटिकेट मॅनर्स पाळत डोंबाऱ्याच्या मुलासारखं बॅलन्स सांभाळणं हे उभ्या पामरला कसं बरशक्य होणार? त्यामुळे उभा असलेला आणि थोडं व्यवस्थित उभे राहण्यासाठी धडपडणारा प्रवासीआपल्याजवळील पोतडीचा नि आपला काहीच संबंधच नाही अस समजून किल्ला लढवत राहतो. आसनस्थमान्यवर हे या उभ्या पामराकडे बघून किंचित दातओठ खातात. त्यातील भाव हे खाऊ की गिळू असेअसतात.आपल्या ढोपराने ढकलतात. काही मान्यवर ,दिखता नही क्या पासून सुरु होणाऱ्या शिव्याचंमौक्तिकं बाहेर काढतात. तिरकस आणि तुच्छतेनं बघू लागतात. हे बघणं असतं म्हारक्या म्हशीसारखं. फक्तनसतात ती दोन शिंग. म्हारकी म्हस तिरक्या नजरेनं बघत कधी समोरच्याला ढूस लगावेल हे सांगता येतनाही. तसच हे बेस्ट आणि लोकलच्या डब्यातलं अदृष्य स्वरुपातलं (पाचवं) म्हैस स्पिरिट…