(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मच्छर सर,काय केलत हे तुम्ही ?

  बा, मच्छरा,असं वागणं म्हणजेच कुणाच्याही घरी त्यास न सांगता जाणं शोभतं कां हो तुम्हास. तुम्हास सुश्मितासेन ताईंचीच सदनिका अशी बरी कशी दिसली जाण्यासाठी? त्या माजी जगत सुंदरी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याघरी त्यांना न विचारताच गेलात ना ! कुणी कुणाच्या घरी जावं किंवा जावू नये याचा शासकीय अध्यादेश अजूननिघाला नाही. त्यामुळे लोकशाहीवादी देशातील आमच्यासारखेच तुम्ही असल्यानं तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरगदा आणणारा हा सवाल विचारणं तुम्हास आवडायचा नाही, याची कल्पना आहे. पण मच्छरसिंगजी ही, सुस्मितासेन सदनिका व्हिजिट तुम्ही गुप्त ठेवायची नको होती का ? त्यांच्या सदनिकेतलं तुमचं अवचित जाणं जगजाहीरझालं नि बिच्चाऱ्या सुस्मिताजींना कित्ती कित्ती म्हणून त्रास झाला. त्यांच्या घरी रणवीर गेला असता, रणधीर गेलाअसता, भाऊ कदम गेला असता, कपील शर्मा घेतला असता तरी कुण्णास काही वाटलं नसतं. पण मच्छररावतुम्ही गेलात नि गडबडच झाली.

  सुस्मिताजींच्या सदनिकेत मच्छर, याने की बहुत कुछ गडबड है. बहुत कुछ गडबड अशी बडबड कुणी केलीनसली तरी, आमच्यातल्या काही लोकांनी डोळेच वटारले ना सुस्मिताजींवर. जणू काही त्यांनीच तुम्हास त्यांच्यासदनिकेत सविनय येण्याचे सहर्ष निमंत्रण दिलं.

  श्रीयूत मच्छर हे कुठेही जाऊ शकतात, राहू शकतात, या डायनोसारच्या काळापासूनच्या महा – शास्वत  सत्यावरशंका घेण्यासारखं हे त्यांचं वागणं होतं.. एखादे वेळेस रांझाचं हिरवरचं शास्वत प्रेम हे अशास्वत ठरु शकतं. लैलाचं मजनूवरचं असच प्रेम असत्य ठरु शकतं.पण तुमचं कुठेही केव्हाही जाण्याबद्दलचं, दुयौधन कौरवे, चंद्रगुप्तमौर्य, औरंगजेब मोगले, हिटलर आर्यपुत्रे-बर्लिनकर यांच्या काळात सुध्दा खणखणित आणि दणदणित असलेलंवास्तव हे सांप्रतकाली असत्य ठरुच शकत नाही. सूर्याचा प्रकाश जितका सत्य. अमावसेच्या रात्रीचा गडद अंधारजितका सत्य तितकच तुमचं कुठेही जाणं हे शंभरनंबरी सत्य. हे जर आमच्यातल्या काहींना कळत नसेल त्याततुमचा दोष नाही.

  पण सुस्मिताजींच्या घरी मच्छर सापडले म्हणजे जणू काही शंभरवर्षापासून वांटेड असलेले दहशतवादीचसापडले अशा पध्दतीनं या वृत्तास जी आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी मिळाली त्याने सुस्मिताजींच्या नाजूक ह्रदयास आणिसाजूक मनास किती दु:ख झालं असेल याची कुणी चिंता केली नाही. त्या जगतसुंदरी कोणे एके काळी जरीहोऊन गेल्या असल्या तरी महाराणी मुमताजमहल 90 या वर्षीही शहेनशाह शहाजहान यास 16 वर्षाच्याचाफेकळीच वाटल्या असत्या. तसच सुस्मिताजी या सुध्दा कायमस्वरुपी जगतसुंदरीच असल्याचं तुम्हास वाटूनतुम्ही त्यांच्या सौंदर्याचा दर्शनलाभ घेण्यासाठी जाऊ शकता. हे तुम्ही उच्चरावानं सांगायचं नाही का तुम्हीझटदिशी, तेव्हाच. तुम्ही तसं केलं असतं तर एक मच्छर दिवानगी भी कर सकता है, हे कळलं असतं ना या दिलनसलेल्या लोकांना.

  मच्छर सर, तुम्ही गेलात चांगल्या अर्थानं,पण लोकांना त्यात अनर्थ दिसला. हे किती वाईट. लोक हे वाईटावरचटपले असतात. मच्छर भौ. पण त्याने डरायचं नाही की घाबरायचे नाही. असं आम्ही तुम्हास सांगणं हे सिंहानंहरिणीस भिऊ नये असं सांगण्यासारखं असलं तरी तरी कधी कधी असं सांगून अंतरंगात दडलेल्या तेजस्वी हिरोसजागृत करावं लागतं ना. याचा अर्थ तुम्हास  कळला नसेल तरी काही हरकत नाही. आपणास सगळचं कळलपाहिजे याचा अट्टाहास कशाला करायचा? एक मच्छर आदमी को नपुंसक बना सकता है, या वाक्याचा तरीनेमका अर्थ कुणाला आजपर्यंत कळला ? तरी या वाक्यावर टाळ्या पडायच्या काही थांबत नाहीत.

  मच्छर दादा, तुम्ही सुस्मिताजींना मोठया स्वच्छ आणि निर्मळ मनानं भेटायला गेलात, आपल्या दिलाची बातसुनवायला गेलात,पण झालं भलतच. लिओनार्दी व्हिन्ची या चित्रकारास दात काढून हसणारी मोनालिसाकाढायची होती, पण तो हलक -फुलकं स्मित देणारी मोनालीसा काढून बसला. असं भलतसलत होऊन जातकधीमधी. पण त्यामुळे लिओनार्दी व्हिंचीचं ना वाकडं झालं ना मोनालिसाचं हेकडं. या इतिहासात डोकावूनबघायला आमच्यातल्या काहींनी फुरसत काढायला नको का. पण नाही. इतिहासात रस नाही त्यामुळे भुगोलयांना ठाऊक नाही. त्यामुळे बिचाऱ्या सुस्मिताजींसारख्या माजी का होईना जगतसुंदरीला नाहक त्रास.

  मच्छर लॉर्ड, हा त्रास तुमच्यामुळे त्यांना झालाय हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्याकडे जाण्याऐवजी आयसीसच्याअड्यावर गेला असतात तर किती  ग्रेट कार्य झालं असतं. एक मच्छर कुछ भी कर सकता है, या कथनावरशिक्कामोर्तब करण्याची संधी तुम्हास मिळाली असती. तुम्हारे पास अगर एके फोर्टी सेव्हन बंदूक है, तो हमारे पाससुपर डेग्यूधारक मच्छर है, असं आम्ही अभिमानानं सांगू शकलो असतो. भागो मच्छर आया अशी स्थिती निर्माणकरण्यात तुम्ही यशस्वी झाला असता. पण तुम्हास ते सुचलं नाही. असं सांगणारा तुम्हास कुणी गाईड – फिलॉसाफर मिळाला नाही. त्यामुळे तुमचे पंख चुकले. आयसीस क्षेत्रात जाण्याऐवजी तुम्ही सुस्मिताजी राहतातत्या क्षेत्रात जाऊन बसला. ही थिअरी जरा समजावून सांगा जगास, म्हणजे सुस्मिताजींचा तुम्हास पाळीव मांजरीकिंवा पोपटासारखा पाळण्याचा, तुमचं संगोपनं, संवर्धन किंवा लाड करण्याचा आरोप सहन करावा लागणारनाही. करणार ना तुम्ही हे. विचार करा मच्छर सर.

  तुमचा हा विचार पक्का होईपर्यंत आम्ही तुमच्या वतीने सुस्मिताबेनला सॉरी म्हणून ठेवतो..