(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग

    तुमचा लाडका कुमार टॉम किंवा कुमार डॉगी अथवा कुमारी टॉमी किंवा कुमारी डॉगी अथवा श्रीयूतमोत्या किंवा श्रीमती मोतीबाई अथवा आपले नेहमीचे हॅड हॅड, छू छू यांच्याकडे तुम्ही कधी 100 टक्केकाळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन सांगा..त्यांची शपथ घेणं अडचणीचं वगैरे वाटतअसेल तर मग आसाराम बापूश्रींची शपथ घेऊन सांगा. त्यांचीही शपथ घेणं सांप्रतकाली महा-अडचणीचंवाटत असेल तर सलमान खान यांची शपथ घेऊन सांगा..विविध पर्याय आहेत तुमच्याकडे. मात्र हा पर्यायस्वीकारतांना खरं तेच सांगा कारण खोट बोललेलं श्रीयूत ओबामासाहेबांच्या डॉगीपासून आपल्याकडच्या मोत्याआणि गल्लो-गल्लीतल्या छू छू पर्यंत कुणालाही अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही. याबाबतीतत्यांचं नरो वा कुंजरो नाहीच. महाभारतकालीन धर्मराजाच्या प्रियतम मोतीने धर्मराजास बजावलं होतं की तुम्हीसत्यवचनी असलात तरी नरो वा कुंजरो असं कधीतरी करण्याची शक्यता मज वाटते आहे. असं करणं खोटंबोलणं नसलं तरी ते पूर्णसत्य आणि अर्धसत्य यामधील राहील. आपणास बुवा असं अधलं-मधलं चालायचंनाही. समजा तुम्ही तसं कधीकाळी केलातच तर बघा, स्वर्गात जाताना तुमची साथसंगत या पृथ्वीतलावरचमी सोडून देईन. धर्मराजाने त्यांच्या प्रियतम मोतीचा हा प्रेमाचा सल्ला हसण्यावरी नेला. पुढे व्हायचं तेचझालं. अश्वत्थामानामे गजराज गचकला की या सेम नावाचा माणूस धाराशायी पडला हे द्रोणाचार्यांनासांगताना नरो वा कुंजरो असं धर्मराज सत्य आणि अर्धसत्य यातील संभाषण करते झाले. प्रियतम मोती यासत्यांचं हे वागणं पसंत पडलं नाही. सर्वांना आता हे ठाऊक आहेच की स्वर्गारोहणाच्या वेळी या प्रियतममोतीने धर्मराजांची साथसंगत पृथ्वीतलावरच सोडून दिली. डॉगीज वा मोतीजना असत्य संभाषण आवडत नाहीयाचा यापेक्षा दुसरा मोठा पुरावा कोणता बरे? शिवाय महाभारतकालीन मोती हे आपला निषेध अशासौम्यपध्दतीनं तरी व्यक्त करत पण सध्याच्या इसीसप्रभावित काळात ते तसच वागतील याची शास्वती श्री श्रीरवी शंकरसुध्दा देऊ शकणार नाहीत. तुम्ही असत्य वदलात तर कदाचित तुमचा कुमार/कुमारी डॉगीकोणत्याही क्षणी तुमची नरडी नाही पण बर्म्युडा नक्कीच फाडू शकेल..तेव्ही बी सावध…

    0000

    आता मुद्याकडे वळू. तुम्ही तुमच्या डॉगीकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघितलेलं नाही हे तुम्हास मान्यअसल्यानं तुम्ही तशी शपथ घ्यायला कचरलात ना. हे मान्य करा.. हे मान्य करण्याचं महत्वाचं कारणआपण काही कोर्टात उभे नाही. कोर्टात कचरुन चालत नाही. तसं झालं तर हातातल्या शपथपुस्तक वाधार्मिकग्रंथाचे अगरबत्तीत रुपांतर व्हायचे.(कदाचित वटवाघूळही होऊ शकते. पण यास सध्यातरी कोणताहीपुरावा नाही, कारण कुणीही अद्याप कचरल्याचा ज्ञात इतिहास नाही.) पण कोर्टाबाहेर मात्र आपण कचरुशकतो. त्याचं कारण कोर्टाच्या आत जसं संरक्षित वातावरण असतं तसं कोर्टाच्या बाहेर नसतं आणि कोईकिसिका वाली पण नसतो. त्यामुळे तुमच्या डॉगीकडे तुम्ही 100 टक्के काळजीपूर्वक बघता काय,याविषयीशपथेवर सांगण्यासाठी तुम्ही कचरणारच. यात वावगं सुध्दा काहीही नाही. कधीकाळी फास्ट बॉलरची बॅटिंगफेस करायला मैदानात येणारे आपले ग्रेट-ग्रेट बॅटसमन कचरायचेत की नाही. हे तथ्य वा सत्य आपणमान्यही केलं होतंच की..

    आजच्या फास्ट ऍ़ण्ड फ्युरिअस काळात आपण आपल्या सौभ्याग्यवतीकडेसुध्दा महिनोमहिने नीट बघतनाही. कधीतरी वायव्य दिशेतून बघतो किंवा फक्त नैऋत्यपूर्व दिशेतून. अष्टदिशांनी बघायची संधी वेळेअभावीआपणास काढता येणं दिवसेंदिवस कठिणच होत चालल्याचं दिसतं. आपल्या स्वत:च्या फ्लॅटमध्ये प्रमुखदेवबाप्पांची प्लेस आणि त्यात तीनचार देवांच्या मूर्ती-छायाचित्रे असतील तर उजवीकडे कोणती मूर्ती आणिडावीकडे कोणती हे चटदिशी आपणास सांगता यायचं नाही. चालायचच, कारण आपण फास्ट आणिफ्युरियस युगाचे प्रतिनिधी ना. त्यामुळे कुमार किंवा कुमारी डॉगी/मोती किंवा मोतीबाईंकडे पूर्णांशानं बघणंकाही मस्ट नाही. त्याचं वाईट वाटून घेऊ नका. फक्त ते सत्य स्वीकारा.

    तर एका शास्त्रशुध्द निरीक्षणानुसार आपलं डॉगींकडे बघणं हे 59.57 टक्क्यांपासून सुरु होतं आणि89 ते 89.99 टक्क्यांपर्यंत संपतं. हे शास्त्रशुध्द निरीक्षण अर्थातच ग्रेट ब्रिटनमधून आल्यानं आपला शंभरटक्के विश्वास बसायला हरकत नसावी. इथिओपिआतून वा गेला बाजार श्रीलंकेतून हे निरीक्षण आलं असतंतर आपण  दुधात पडलेली माशी वा झुरळ जसं झटकून टाकतो ना तसे झटकून टाकलं असतं.

    आपणास आपल्या सौभाग्यवतींकडे बघायला सुध्दा वेळ नाही हे अर्ध वा अर्थपूर्ण सत्य असलं तरीआपण बरेचदा, म्हणजे दोन वर्षापूर्वी दीपिका पदुकोन ते कतरीना कैफ यांचे फोटो इंटरनेट ते फिल्मीमॅगेजिन्समध्य फेस टू फुट न्याहाळण्यसाठी वेळ काढतच होतो. हे आपलं हिरवं असलेलं उघड रहस्य आहेच. (निकालना पडता यार?नाही तर जिंदगी अळणी होऊन जायची.असं तुमचं या हिरव्या रहस्याच्या पाठिमागचंगुलाबी उत्तर. कधीकधीच व्यक्त होणारं पण सत्य असलेलं.) असो, बरेचदा आपण जॉनी डीप नावाचेहॉलीवूड नटवर्य ज्या कोणत्यातरी देशातील कुमारी किंवा सौभाग्यवती यांच्या अध्यातमध्यात असणाऱ्या ज्याऍ़म्बर हर्ड हिच्या प्रेमात पडून तिच्यानावे एका बेटाचं नाव ठेवतात, ती कशी दिसतेय, हे बघण्यासाठी गुगलप्रवास करायला वेळ काढतोच की ? (शी इज सो क्युट,आपणास पण जाम भिडते यार. हे सुध्दा तुमचंउत्तर बरोबरच आहे की. आणि ते तस्सेच असायला हवं. श्रीयूत जॉनी डीपलाच ह्रदय आहे होय, आपणसुध्दा त्याच माळेचे मणी आहोत ना. पुरुष ह्रदय हे सेम टू सेमच असणार. या ह्रदयास आवडणारीगुलाबाची फुलेही सेम टू सेमच असणार..) याचा अर्थ आपण फास्ट ऍ़ण्ड फ्युरियस काळाचे प्रतिनिधीअसलो तरी आपण सोईप्रमाणे कु.दीपिका किंवा मिस टू मिसेस या प्रवासात असलेल्या किंवा झालेल्याऍ़म्बरसाठी आपली टाइमलाइन काहीक्षण थिजवतोच ना. गेल्या वर्ष- दिडवर्षभरापासून आपण सौ.सनीलिऑन या जिथे आणि जशा दिसेल तसे न्याहळण्याची मौजमजा करतोच की..तेव्हा आपण स्वत:लाहलवलं तर थोडातरी टाइम काढू शकतो. ही बाब यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय सिध्द होते. त्यामुळेकुमारी/कुमार टॉमीकडेही 100 टक्के काळजीपूर्वक बघण्यासाठी असाच टाइम काढण्यासाठी एखादेवेळी प्रयत्नकरावा. प्रयत्नांती परमेश्वर वगैरे मिळतात हे अद्याप कोणत्याही बापूंनी सिध्द न केल्यानं त्यावर ठाम मतव्यक्त करता येत नाही. पण प्रयत्नांती वेळ काढणं शक्य असल्याचं हे कोणत्याही बाबाजींनी सांगण्याऐवजीआपणही सांगू शकतो.

    000

    हे असं केल्यामुळे तुमच्यासाठी सोईसोईनुसार मनी म्हणजेच पैसा असेला टाइम, वेस्ट होणारनाही..याची शंभर टक्के खात्री बाळगा. असं ठामपणे सांगण्याचं कारण आणि एवढी लांबलचक प्रस्तावनादेण्याचं कारण जरा सिरियस आहे. घाबरु नका. लगेच तुम्हास किंवा तुमच्या डॉगीजना आयसीयूमध्ये भरतीकरुन सलाइन लावण्याची गरज नाही. आता थेट मुद्याचेच सांगतो. तुम्ही, तुमच्या मिसेस, तुमचा चिंरजीवआणि चिंरजिवी बरेचदा स्ट्रेसमध्ये असता, (स्ट्रेस मध्ये) जाता किंवा (स्ट्रेसमध्ये) असण्याचं किंवा (स्ट्रेसमध्ये) जाण्याचं लघु-शंकास्पद-नाट्य करता की नाही..तुम्ही म्हणाल हे सफेद झुठ. हा बिनबुडाचा आणिबिनशेंडिचा आणि बेजाबबदार आरोप आहे महाशय. असा कृपया आपण आरोप करु नये अशी आमचीविनंती आहे. पण हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लाइफ इज स्ट्रेसफुलऍ़ण्ड लाइफ विदाऊट स्ट्रेस इज नो लाइफ असं जॉर्ज बनार्ड शॉ यांचं सुप्रसिध्द असं वचन आठवा बघू. हेवचन त्यांनी सांगतिलच शिवाय ते सिध्द करण्यासाठी मर्निल मन्ररो आणि श्रीयुत हिटलर यांची उदाहरणंपुराव्यासाठी दिली. ते जाऊ द्या, हा इतिहास झाला. उगाच इतिहास उगाळायला नको. पण एटापल्लीभूषण जॉनराव इरपाते (द्वितीय) यांनीही गेल्याच वर्षी नेमके हेच आणि अस्सेच सांगून ठेवलेय ना. त्यासाठीत्यांनी बिल क्लिंटन, प्रिंस चार्लस आणि करिष्मा कपूर यांची उदाहरणं स्पष्टीकरणास पाचशे पृष्ठांच्या ग्रंथातदिलेली आहेत. त्याचं काय? आता हू इज  धिस जॉनराव इरतापे (द्वितीय) हा फालतू प्रश्न विचारु नका. कारण जॉनराव इरतापे (फर्स्ट) यांच्या तसबिरीला प्रणाम केल्याशिवाय जॉर्ज बनार्ड शॉ हे कोणत्याहीकार्याचा शुभारंभ करत नव्हते ही बाब विकिपीडीयात नमूद आहे. इरतापे (फर्स्ट)च्या कुटुंबकबिल्यातीलसांप्रतकालीन फळ म्हणजे इरतापे (द्वितीय). याचा अर्थ जॉनराव इरतापे (फर्स्ट) हे जॉर्ज बर्नाड यांनागुरुस्थानी होते. गुरुची विद्या शिष्याकडे शंभर टक्के येईलच असं नाही. पण मुलाकडे मात्र ती येतेच. त्यामुळे बर्नाड शॉ यांच्या इरतापे (फर्स्ट) या गुरुच्या पुत्राचं म्हणजेच इरतापे (द्वितीय)चं महत्व हे सुध्दा गुरुइतकच आहे व राहील.

    असो, तर अर्वाचीन काळापासून ते टिपू सुलतानाच्या काळापर्यंत आणि लॉर्ड कर्झन यांच्या काळापासूनते शाहीद कपूर-मनीष पॉल आणि रामराव शामराव वनकुद्रे (राहणार चिंचोली खुर्द, तालुका पोस्ट चिखली, जिल्हा बुलढाणा, पिन 440034) यांच्या काळापर्यंत ज्याच्या डोक्यावर ताण नाही असा मनुष्यप्राणी चारहीखंडात औषधालाही शोधून सापडणार नाही. असा सापडला तर त्यास 10 अब्ज डॉलर्सचं पारितोषिकदेण्याची घोषणा सत्य नाडेला यांनी केल्याचं आम्ही ऐकून आहोत. प्लिज चेक द फॅक्ट्स इन गुगल..

    सांगायचा मुद्या असा की स्ट्रेसशिवाय मनुष्य म्हणजे चुंबनदृष्याशिवाय हॉलिवूडचे सिनेमे. साऱ्यांनाच स्ट्रेसअसतो. काहिंचा सूर्यप्रकाशासारखा दिसतो. तर काहिंचा अमावशाच्यावेळी जंगलात अंधार असतो तसाअसतो. शिवाय आपला स्ट्रेस दाखवायला आपण काही सालारजंग म्युझियम अथवा राणीची बाग थोडेचआहोत. आपला स्ट्रेस आपल्या मेंदूत बंदिस्त.. तुम्ही अगदी अचूक आणि बरोबर विचार करताहात. तरमुद्या हाच की, तुम्ही तुमच्या ताणाला लपवून ठेवा किंवा त्याचं कौतुक करा, हा तुमच्या व्यक्तिगत प्रश्न. पण स्व-ताणाच्या कौतुकात राहत असतानाच वेळात वेळ काढून तुमच्या डॉगी वा टॉमीकडे 100 टक्केकाळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो वा ती सुध्दा स्ट्रेसमध्ये आहे अथवा तो किंवा तिलाक्षणोक्षणी स्ट्रेसशी सामना करावा लागतो.

    यावर तुम्ही आमच्यावर खेकसाल किंवा फिदीफिदी हसाल आणि खेकसून वा हसून म्हणाल, कुत्तेकोकैसा आया स्ट्रेस-फ्रेस. साल्याला काय करावं लागतं. खातो – पितो, इकडे तिकडे मजेत सू- शी करतो, मालकांशी लाडी गोडी करतो, लाड करुन घेतो, नजर चुराके लाइनीफियनी मारतो एवढच कार्य आणिकर्तृत्व नाही का त्याचं. कसला आलाय स्ट्रेस-फ्रेस साल्याला…(शिवी तोंडातल्या तोंडात..)

    अरेरे, तुम्ही फक्त असाच आणि असाच विचार करतात, असं जरी कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछू- हाडहाड यांना चुकून-माकून कळलं तर त्यांच्यावर भयंकर मोठा ताण येईल. कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछू- यांना शंभर टक्के वाटत असतं, की आपला मालक (?) आपल्यावर निर्भेळ, निर्मळ, निर्वाज्य, निरपेक्ष, पारदर्शक, शाश्वत, ऐश्वर्या-अभिषेकसारखे प्रेमब्रिम करतो. पण छे, प्रत्यक्षात तसं ते नाहीय. मालकाच्या मनाच्या खंदकात आपल्याबद्यल वेगळच थिंकिंग आहे. कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछू यांचाहा विचार अगदीच खरा ठरत नाही का? कारण तसं नसतं तर, त्यांनाही स्ट्रेस-फ्रेस असतो असं एव्हानातुम्हाला कळलं असतच की नाही.

    जाऊ द्या. जे झालं ते झालं. कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछू- सुध्दा स्ट्रेसमध्ये असतो, हेआता संशोधनांती सिध्द झालय. हे पवित्र आणि पुण्याचं काम ग्रेट ब्रिटन देशी, लंडननिवासी शास्त्रज्ञ कॅरेनवाइल्ड यांनी केलय. कॅरेनराव हे पेट बिहेविरिस्ट आहेत. म्हणजेच कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछूचेस्वभावगूण, वागणूक यांच्या अभ्यासाला त्यांनी स्वत:ला वाहून टाकलंय. ते गेली बरीच वर्षे, ब्रिटनमधीलकुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछूचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासांती, टॉमीजना सुध्दा स्ट्रेस येतो, हेत्यांना दिसून आलय.

    ज्या टॉमीजवर संशोधन करण्यात आले ते जरी ब्रिटीश असले तरी ते इंडियन टॉमिजपेक्षा ते वेगळेनाहीत. त्यांनाही आपल्याकडील टॉमिजसारखेच चार पाय आणि दोन डोळे आहेत. मुख्य म्हणजे सरळसुरळनळीत टाकूनही कधीच सरळ न होणारी वाकडी शेपूट दोघांचीही सेम आहे. ब्रिटिश टॉमीज भुंकतात आणिइंडियन टॉमिज बार्क करतात तेव्हा येणारा आवाज हा भौ भौच असतो. (किंचित फरक असलाच तोउच्चारणामध्ये राहू शकतो. ब्रिटिश टॉमीचें भुंकणे इंग्लिश टोनमध्ये आणि इंडियन कुत्र्यांचे बार्किंग देशीटोनमध्ये.बस्स.) ब्रिटिश टॉमिज हे केवळ दूध-आणि ब्राऊन ब्रेडच खातात नि इंडियन टॉमिज केवळ हाडूकचचघळतात असही नाही. या दोन्ही टॉमिज किंवा जगातील सगळ्याच देशातील टॉमिजना दोन्ही गोष्टीसमानरीत्या आवडतातच. पृथ्वीतलावरील समस्त डॉगीजना एकदाचं ब्रेड नाही आवडणार. पण यच्चयावत सर्वटॉमीजना हाडूक आवडतच आवडतं. हाडूक पाहून ज्या डॉगिची जिभ लांब होत नाही आणि तोंडातून लाळगळत नाही तो डॉगीच्च नाही हे खुशाल समजावं.

    जगातील सगळेच मिस्टर टॉमिज हे मिस टॉमिजशी प्रणयरंग उधळतांना मी ब्रिटनचा, मी व्हाईटहाऊसमधचा, मी शाखरुख खानचा, मी टॉम क्रुझजचा, मी इस्तुंबलचा, मी विजय मल्ल्यांचा, मीभाम्रागडचा, मी नाना पाटेकरचा, मी सानीया मिर्झाचा असा विचार करीत नाहीत. या प्रणयरंगांची उधळणसर्वत्र सेम-टू-सेम म्हणजेच कॉर्बन कॉपीच असते. त्यामुळेच ब्रिटिश टॉमिजना स्ट्रेस येतो याचा स्पष्ट अर्थइंडियन कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछसही येतो, हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही व त्यावरपुर्नसंशोधनही करण्याची आवशक्यता नाही. आता हा असा शोध प्रसिध्द झाल्यानं सर्व कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछ यांच्याकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघणं हे आपलं कर्तव्य ठरतच. सौ.सन्नी लिऑनसाठीआपण आपल्या व्यस्ततेतून वेळ काढू शकतो तर डॉगीजसाठी काढणं अशक्य ते काय? नव्हे तसा निश्चयचआपण पुढच्या क्षणभरात करायला हवा.

    तुमच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला असेल की सर्व कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछयांच्याकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघून त्यांचा स्ट्रेस कळलाच तर पुढे काय करायचं? तो स्ट्रेस दूर कसाकरायचा? याची काळजी तुम्हास नको. त्याचा ताणही नको. कारण तो येऊ नये म्हणूनच कॅरेनराव हे केवळटॉमिजना स्ट्रेसमधून जावं लागतं, असं संशोधन करुन थांबले नाहीत, तर हा स्ट्रेस कमी करण्याचा उपायहीत्यांनी सुचवलाय.

    टॉमिज जेव्हा रात्री झोपण्याची तयारी करतात, तेव्हा त्यांना गूज-गोष्टी सांगितल्या तर त्यांच्यावरीलस्ट्रेस हा खूप खूप कमी होतो, असं कॅरेनरावांना संशोधनात आढळून आलय. त्यामुळे त्यांनी मग टॉमिजसाठीबेडटाइम स्टोरीज तयार केल्या. आपल्याकडच्या परिकथा किंवा चांदोबा वा चंपक कथेसारख्या. या कथांमुळेटॉमिजचा स्ट्रेस कमी होतो. त्यांना हलकं हलकं वाटायला लागतं. आपण आपल्या दोन वर्षांच्या छकुल्याशीज्या प्रेमानं बोलतो ना तसं समजून या गोष्टी टॉमिजना सांगायच्या. बस्स एव्हढा साधा उपाय आहे सर्वकुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछ यांच्यावरील ताण दूर करण्याचा.

    ग्लोबलायझेशनचा जमाना असल्यानं कॅरेनरावांनी टॉमिजसाठी लिहिलेल्या गोष्टी नजिकच्या काळातआपल्याकडे येतील तेव्हा येतील. पण आपल्याकडे अशा गोष्टींची कमतरता नाही. पंचतंत्र, इसापनीती, अकबर-बिरबल, तेनालीराम, तारक मेहता का उल्टा चष्मा, गुटर गुँ, छोटा-भीम, माय फ्रेंड गणेश, जोधाअकबर अशा अनंत गोष्टींचं शाश्वत भांडार याभूमित आहे. त्याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंग आहेच की.

    आपण आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी जातोच ना या वर्गांना. आर्ट ऑफ लिव्हिंग हे आपलं इंडियनम्हणजे नेटिव्ह म्हणजेच गाईच्या शुध्द दुधापासून तयार केलेल्या प्युअर तुपासारखं संशोधन. ते आपल्याकुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछस सुट होईल..पण त्यासाठी आधी तुम्ही टॉमिजकडे 100 टक्केकाळजीपूर्वक बघायला हवं. तेव्हाच तुम्हास कळेल ना की ते स्ट्रेसमध्ये आहेत म्हणून. कुमार/कुमारी डॉगी/टॉमी/मोती/छूछ आणि तुम्ही जेव्हा ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्गांना एकत्र जाल, तेव्हा डॉग इज द बेस्टकॅम्पिनियन ऑफ मॅन ऍ़ण्ड वूमेन, हे सुप्रसिध्द वचनही आपोआपच सिध्द होईल..आणि दोघांचाही स्ट्रेस-फ्रेस कमी होईल.

    या दिवाळीत हा संकल्प करायला काय हरकत आहे.?