
वेगळे पर्याय
(१) मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामध्ये बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)-एमबीए, हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. त्याला सरासरीने ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या ८५ टक्के जागा महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर वेगवेगळया उद्योग ,व्यवसाय आणि कंपन्या यामध्ये व्यवस्थापकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या संधी मिळू शकतात. संपर्क- mu.ac.in/thane-sub-campus
(२) सिम्बॉयसीस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचा बीबीए (बॅचलर ऑफ बिझीनेस ॲडमीनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांपैकी एक समजला जातो. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदविका दिली जाते. तिसऱ्या वर्षानंतर पदवी आणि चौथ्या वर्षानंतर ऑनर्स पदवी प्रदान केली जाते. या प्रत्येक टप्प्यांवर विद्यार्थ्याला अभ्यासक्रम सोडण्याची सूट आहे. तो तीन वर्षानंतर या अभ्यासक्रमाला पुन:प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमामध्ये (१) मार्केटिंग, (२) आंत्रप्रिन्युरशीप, (३) एनव्हीराँन्मेंट मॅनेजमेंट, (४) इंटरनॅशनल बिझिनेस, (५) अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (६) ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क-https://www.scmspune.ac.in/
(३) व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिल्म, कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट्स या संस्थेने माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात रोजगारक्षम असे बरेच अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थेच्या स्कूल ऑफ डिझाइनने बॅचलर ऑफ डिझाइन इन व्हिज्युअल कम्युनिकेशन, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर (१) जाहिरात, (२) कला दिग्दर्शन,(३) द्रुक श्राव्य, (४) ब्रँडिग,आयडेंटी आणि पॅकेजिंग, (५) इन्फॉर्मेशन डिझाइन, (६) मोशन ग्रॅफिक्स, (७) टायपोग्रॅफी, (८) वेब आणि इंटरॲक्शन डिझाइन या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम राजीव गांधी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेशी अधिस्वीकृत आहे. संपर्क -https://whistlingwoods.co.in/wwi-design/
(४) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्टस येथे बीए इन मल्टीमीडिया ॲण्ड मास कम्युनिकेशन आणि बॅचलर ऑफ मास मीडिया हे अभ्यासक्रम करता येतात. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. हे अभ्यासक्रम केल्यावर माध्यमांमध्ये वेगवेगळया प्रकारच्या करिअर संधी मिळू शकतात. संपर्क- https://www.mithibai.ac.in
(५) के.सी.कॉलेज मुंबई येथे बॅचलर ऑफ व्होकशन इन स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचाआहे. तो कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेशआहे-(१) मूलभूत संवादसंप्रेषण/कम्युनिकेशन, (२) पोषण, (३) व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे, (४) मनोरंजन व्यवसायाची ओळख, (५) क्रीडा व्यवस्थापन, (६) क्रीडा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन, (७) व्यवसाय व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग,(८) एकात्मिक विपणन संवाद संप्रेषण ,(९) मनोरंजन विपणन/मार्केटिंग, (१०) आशय व्यवस्थापन, (११) जाहिरात ॲण्ड ब्रँड व्यवस्थापन, (१२) क्रीडा इव्हेंट व्यवस्थापन, (१३) क्रीडा जनसंपर्क, (१४) डिजिटल मार्केटिंग, (१५) माध्यम नियोजन, (१६) पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१८) ग्रॅफिक डिझाइन आणि ॲनिमेशन, (१९) व्यवसाय नियोजन, (२०) सांख्यिकी व्यवस्थापन, (२१) क्रीडा विपणन, (२२) माध्यम निर्मिती-टीव्ही, रेडियो, चित्रपट, (२३) प्रचार व्यवस्थापन, (२४) क्रीडा सेलिब्रिटी व्यवस्थापन, (२५) व्यवसाय/ बाजार/ मार्केट संशोधन, (२६) क्रीडा मानसशास्त्र, (२७) चित्रपटांचे प्रवाह आणि तंत्रज्ञान, (२८) टीव्ही निर्मिती-बातम्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम, (२९) क्रीडा प्रायोजकत्व, (३०) कार्यान्वयन व्यवस्थापन, (३१) समस्या व्यवस्थापन (३२) छायाचित्रण आणि व्हीडिओ प्रॉडक्शन, (३३) रेडिओ निर्मिती, (३४) समाज माध्यमे आणि ब्रँडिंग, (३५) ओव्हर द टॉप (ओटीटी) आणि नव्या युगातील इतर डिजिटल माध्यमे, (३६) मनोरंजन जगातील प्रतिभा व्यवस्थापन, (३७) इलेक्ट्रॉनिक क्रीडा, (३८) डिजिटल जाहिराती, (३९) संघर्ष आणि समझौता.
क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्राचा वाढलेला अवकाश लक्षात घेता हा अभ्यासक्रम दोन्ही क्षेत्रात उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध करुन देऊ शकतो. संपर्क- https://kccollege.edu.in