(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कॉर्पोरेटमध्ये यश कसं मिळवाल?

कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्याची गरज भासते. असं कौशल्य सतत हस्तगत  करावं लागतं. तरच या जगात यशाचं शीखर गाठता येतं. त्याचबरोबर उद्योग व्यवसायाच्या नेतृत्वाची जबाबदारीही मिळू शकते. याचं आजच्या काळातील महत्वाचं उदाहरण म्हणजे टाटा सन्सचे चेअरमन श्री.एन.  चंद्रेशखरन.

कॉर्पोरेट अथवा उद्योगाच्या सर्वोच्च स्थानी पोहचण्यासाठी उपयुक्त ठरु शकतील असे कौशल्यर्मितीचे उच्च श्रेणीचे अभ्यासक्रम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या,ए- बी-सी-एल” म्हणजेज अहमदाबाद, बेंगळुरु, कोलकता व लखनौ कॅम्पसेस सातत्यानं चालवित असतात.

असाच एक अभ्यासक्रम,” कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज फॉर कॉर्पोरेट लिडर्स”, हा अभ्यासक्रम आयआयएम कोलकताने सुरु केला आहे. कॉर्पोरेट मधील मनुष्यबळासाठी तो चांगलाच उपयुक्त ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

या अभ्यासक्रमात (१) तज्ज्ञांचं व्याख्यान, (२) विविध प्रकरण/घटनांचा अभ्यास(केस स्टडीज), (३) कार्यशाळा, (४) ऑनलाईन सादरीकरण व (५) विस्तृत व्यक्तीगत विश्लेषन या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात कॉर्पोरेटमध्ये महत्वाची जबाबादारी सांभाळण्याची क्षमता असणाऱ्यांना, नेतृत्व करण्यासाठी आवश्यक अशा  संवाद संप्रेषण व्युहनीतीचं कौशल्य हस्तगत करुन देणं, हा मूख्य हेतू हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागे आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी (१) वर्तणुकीचे अर्थशास्त्र, (२) कृत्रिम प्रज्ञा व गेमिफिकेशनसह डिजिटल तंत्रावर हुकूमत, (३) कथा-कथन, (४) कौशल्यसंच व बाजारासह विश्लेषण, (५) सार्वजनिक संभाषण, माहिती  अथवा डेटा सादरीकरणासह प्रभावी संवाद संप्रेषण, ही कौशल्यं  हस्तगत करण्याची संधी हा अभ्यासक्रम देतो. कॉर्पोरेटने यशासाठी समोर ठेवलेला “दृष्टीकोन”  व  “कार्यसिध्दी”  तडीस नेण्यासाठी हे कौशल्य अत्यंत उपयुक्त ठरु शकतं.

अभ्यासक्रमाची दिशा

या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असून तो आठवड्याच्या शेवटच्या ‍ दिवशी ऑनलाईन  करता येतो. अभ्यासक्रमाच्या प्रारंभी तीन दिवस  व अभ्यासक्रमाच्या शेवटी चार दिवस अशा दोन भेटी कॅम्पसला द्याव्या लागतात. शेवटच्या भेटीच्या वेळेस प्रमाणपत्राचं वितरण केलं जातं. साथीच्या रोगाच्या अनुषंगाने शासनाचे काही नियम आल्यास मात्र संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाईनच करावा लागू शकतो. तसेच प्रमाणपत्रही ऑनलाईन दिलं जातं.

 काय  शीकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

  • संवादकौशल्य /संवाद संप्रेषणाच्या व्युहनीती सोबत आघाडी. प्रभावी प्रतिवादाव्दारे विक्रीवाढीची पार्श्वभूमी तयार करणे, (२) सार्वजनिक संभाषण-समकालीन सार्वजनिक कथा-कथनाची रुपरेषा, (३) कॉर्पोरेट बॉससाठी डिजिटल कम्युनिकेशनची उपयुक्तता, (४) आंतर सांस्कृतिक व्यवसाय संवादसंप्रेषण, (५) डेटाचे सादरीकरण, (६) संघर्षाचे निवारण व वाटाघाटी, (७) डिजिटल युगात आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारे कथन, (८) दृष्यात्मक संवाद संप्रेषणाचे प्रवाह-संवाद संप्रेषणाचे विश्लेषण, (९) कृत्रिम प्रज्ञेसह संवादसंप्रेषण, गेमिफिकेशन(अध्ययन/अध्यापनासाठी असणारे डि‍जिटल खेळ),

संपर्क- (१)https://iimcalcutta.vcrvcnow.in/EPCSCL-05/student-reg/registration_lms.php

(२)https://www.iimcal.ac.in/ldp/executive-programme-communication-strategies-for-corporate-leaders

(३) ईमेल– somak.ray@vcnow.in
(४)भ्रमणध्वनी ७००३१७१७०३-

0000 

आयआएएम बेंगळुरुचे अभ्यासक्रम

कॉर्पोरेट मधील मनुष्यबळास उपयुक्त ठरु शकतील असे दोन ते सहा दिवस कालावधीचे अभ्यासक्रम आयआयएम बेंगळुरुने  सुरु केले आहेत.

यामध्ये उद्योग /व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या पुढील विषयांचा समावेश आहे-(१) व्युहनीती, (२) नावीन्यता, (३) नेतृत्व कौशल्य, (४) माहिती किंवा डेटा विश्लेषण, (५) उद्योजकता, (६) तंत्रज्ञान, (७) विपणन, (८) कार्यान्वयन

या लघु अभ्यासक्रमांमुळे संबधीत  विषयाकडे बघण्याची नवा दृष्टी मिळते. या विषयातील नवीनतम प्रवाह, संशोधन ,उपयुक्तता याविषयी आयआयएमचे तज्ज्ञ व  यश्वशी उद्योजकांकडून मार्गदर्शन केलं जातं. नव्या संकल्पनांचा शोध कसा घ्यावा? याविषयी सांगितलं जातं. या अभ्यासक्रमानंतर आयआयएम बेंगळुरुच्या कुटुंबाचे  तुम्ही भाग बनता. याचे काही फायदे भविष्यात मिळू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिलं जातं.

काही अभ्यासक्रम

फेब्रुवारी/मार्च २०२४मधील काही लघु मुदतीचे अभ्यासक्रम- (१) व्टेंटीफर्स्ट सेंच्युरी जॅपनीज मॅनेजमेंट: ॲडॉप्टींग  बेस्ट  ‍ प्रॅक्टीसेस,   ‌कालावधी-१८ मार्च ते २२ मार्च २०२२

(२) माईंडफूलनेस फॉर इफेक्टीव  लिडरशीप, कालावधी-२६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२४, (३) क्रिएटिंग हाय परफॉर्मन्स ऑर्गनायझेशन, कालावधी- १८ मार्च ते २२ मार्च २०२४, (४) डिजिटल मार्केटिंग फॉर ‍ बिझीनेस ग्रोथ, कालावधी- २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२४, (५) मशीन लर्निंग वुईथ ‍ बीझीनेस ॲप्लीकेशन, कालावधी-१९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४   (६) ॲक्लेरिटिंग यूवर  लिडरशीप जर्नी ॲज अ कोच, कालावधी-१४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२४

संपर्क- https://eep.iimb.ac.in/short-duration-programmes/

सुरेश  वांदिले