आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ डॉक्टरांचा समावेश होत नाही. ते आघाडीवरील सेनापती आहेत. पण कोणत्याही सेनापतीच्या साहाय्यास सैनिकसुध्दा हवे असतात. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढील वेगवेगळया ज्ञानशाखातील प्रशिक्षित उमेदवारांची गरज असते.
(१) नर्सिंग -सध्या चांगल्या प्रशिक्षित नर्सेसची गरज आणि उपलब्धता यात बरीच तफावत आहे. त्यामुळे नर्सिंगमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी देशविदेशात मिळू शकतात. या करिअरचा गाभा सेवा हाच असला तरी, ही एक स्वत:साठी व कुटुंबियांसाठी उत्तम आयुष्य जगण्यासाठी संधी सुध्दा देत असते. चांगले वेतन/ मानधन मिळणारे हे क्षेत्र आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नर्सेसची गरज कधीच कमी होणारी नाही. रुग्णालयांची संख्या वाढत जाणारी आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रशिक्षित नर्सेसची गरज अधिकाधिक भासणार आहे. अमेरिकेने २५ हजार नर्सेसची भरती करणार असल्याची घोषणा गेल्या वर्षीच केली होती. आता मोठया संख्येने पर्सनलाईज्ड म्हणजे व्यक्तिगत स्तरावरही नर्सेसची सेवा घेण्याकडे कल वाढत चाचला आहे. अशा नर्सेसना चांगले सेवा-शुल्क दिले जाते. या क्षेत्रातही पदव्युत्तर पदवी आणि सूक्ष्म स्पेशलायझेशनची सुविधा आहेत. त्यामुळे आणखी संधी मिळू शकतात.
इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही म्हणून नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा पर्याय ठेऊ नये. विद्यार्थींनींनी ठामपणे या ज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घ्यावा. पालकांनी त्यासाठी मुलिंना प्रोत्साहन द्यावे. यंदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींना पुढील चार ते पाच वर्षात महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही चांगल्या संधी मिळू शकतात.
बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स)
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) च्या दिल्ली, जोधपूर, पाटणा, भोपाळ, भूवनेश्वर, रायपूर आणि ऋषिकेश या सहा कॅम्पस सोबतच २०२१ च्या शैक्षणिक सत्रापासून नागपूर आणि देवघर येथेही बी.एस्सी नर्सिंग (ऑनर्स) अभ्यासक्रम करता येतो. या सर्व एम्समध्ये एकूण ६७१ जागा चाळणी परीक्षेव्दारे भरल्या जातात. भारत सरकारच्या नियमानुसार वेगवेगळया संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमाला केवळ महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात, खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यांना सरासरीने किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.
संपर्क– असोशिएट डिन, एआयआयएमएस, नवी दिल्ली- ११०६०८, संकेतस्थळ-www.aiims.edu. ईमेल
parr.aiims.bscmsc@gmail.com
बी.एस्सी (नर्सिंग)हा अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातील बहुतेक सर्व शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहे. शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. 12 वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना या अभ्याक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ – नाशिकस्थित या संस्थेमार्फत नर्सिंग विषयाशी संबंधित पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय व काही खाजगी महाविद्यालयांमध्ये करता येतात. (1) बीएस्सी इन नर्सिंग,(2) बेसिक बीएसस्सी इन नर्सिंग (3) फेलोशिप कोर्स इन आर्थोपेडिक ऍ़ण्ड रिहॅबिलिटेशन इन नर्सिंग, (4)फेलोशिप कोर्स इन ऑपरेशन रुम नर्सिंग , (5) पोस्ट सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग , (6) सर्टिफिकेट इन बीएस्सी इन नर्सिंग , (7) सर्टिफिकेट इन रिनल नर्सिंग,(8) एमएस्सी इन नर्सिंग
(२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ– करोना प्रकोप सुरु होण्यापूर्वी एक किंवा दोन प्रयोगशाळा राज्यात होत्या. आता ६०० च्या आसपास ही संख्या पोहचली आहे. वर्षभरातला हा विस्तार मोठा आहे. इतक्या प्रयोगशाळा म्हणजेच तितक्याच प्रमाणात मनुष्यबळाची गरज वाढली आहे. वैद्कांना अधिक उत्तमपध्दतीने निदान करण्यासाठी किंवा अचुकतेपर्यंत जाणारा औषधौपचार सुचवण्यासाठी प्रयोगशाळेतील वैद्यकीय अहवाल हे उपयुक्त ठरतात. वेगवेगळया वैद्यकीय समस्यांसाठी वैद्यकांकडून चाळणीचा सल्ला दिला जातो. ही संख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणात प्रयोशाळा व तंत्रज्ञांची गरज वाढतीच राहणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम करुन कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते.
काही संस्था
(१) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स – बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी, संपर्क- संकेतस्थळ- sihspune.org, ईमेल- admin@sihspune.org (२) मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,संपर्क संकेतस्थळ- manipal.edu,ईमेल- admissions@manipal.edu, (३) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, संपर्क संकेतस्थळ – jipmer.edu.in, (४) एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स-बीएस्सी इन लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,संकेतस्थळ- mgmuhs.com,ईमेल-registrar@mgmuhs.com,(५) डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर- सर्टिफिकेट कोर्स इन ॲडव्हान्स्ड मायक्रोबॉयलॉजी लेबॉरेटरी टेक्निक,संपर्क संकेतस्थळ-dpu.edu.in,ईमेल-info.medical@dpu.edu.in,(६)भारती विद्यापीठ- डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,संपर्क संकेतस्थळ-mcpune.bharatividyapeeth.edu,ईमेल-bvumedicalpune@gmail.com, (७) अम्रिता सेंटर फॉर अलाइड हेल्थ सायंसेस-बी.एस्सी इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,संपर्क संकेतस्थळ- संकेतस्थळ- aims.amrita.edu, ईमेल- ugadmissions@aims.amrita.edu,(८) के.जे.सोमय्या मेडिकल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर,पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी,संपर्क संकेतस्थळ-https://kjsmc.somaiya.edu/ ईमेल- somaiyamedical@somaiya.edu,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
या विद्यापीठाने आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामध्ये बी.एस्सी इन पॅरॉमेडिकल टेक्नॉलॉजी इन (१) एंडोस्कोपी, (२) फॉरेंसिक मेडिकल सायन्स, (३) हिस्टोपॅथॉलॉजी, (४) न्युरॉलॉजी, (५) ऑपरेशन थिएटर, (६) ऑप्टिमेट्री, (७) परफ्युजन, (८) प्लॅस्टर, (९) रेडिओग्रॅफी, (१०) रेडियोथेरपी, (११) ट्रान्सफ्युजन मेडिसीन . (१२) ॲनेस्थिसीया, (१३) ब्लड ट्रान्सफ्युजन, (१४) कॉर्डिऑलॉजी, (१५) क्लिनिकल सायलॉजिस्ट, (१६) कम्युनिटी मेडिसीन , (१७) इर्मजन्सी मेडिसीन
या विषयांच्या नावावरुन नजर फिरवल्यास, वेगवेगळया आरोग्यविषयक बाबींसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात येते. हे अभ्यासक्रम कौशल्य विकसित करणारे आहेत. त्यामुळे विषयाचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगतता मिळवल्यास अशा उमेदवारांना करिअरच्या संधी मिळू शकतात. १२ वी विज्ञान शाखेतील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतात.
संपर्क– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हासरुल, वणी दिंडोरी रोड – नाशिक, -४२२००४, दूरध्वनी- ०२५३- २५३९१००, २५३९१११, संकेतस्थळ-https://www.muhs.ac.in/contact_us.aspx,ईमेल-academic1@muhs.ac.in
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)
एम्सच्या दिल्ली कॅम्पस मध्ये बी.एस्सी इन मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी (कालावधी ३ चार वर्षे), डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट (कालावधी साडेतीन वर्षे), डेंटल हायजिन (कालावधी साडेतीन वर्षे), ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी (कालावधी साडेतीन वर्षे), ऑप्टिमेट्री (कालावधी ४ चार वर्षे) हे अभ्यासक्रम करता येतात.
एम्स भुवनेश्वर येथे बीएस्सी इन (१) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (२) ऑपरेशन थिएटर ॲण्ड ॲनेस्थिसिऑलॉजी टेक्नॉलॉजी, (३) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी, (४) मेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्रॅफी हे अभ्यासक्रम करता येतात. या चारही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे.
एम्स ऋषिकेशमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात. (अ) कालावधी चार वर्षे/ बी.एस्सी इन (१) ॲनेस्थिसीया टेक्नॉलॉजी, (२) परफ्युजन टेक्नॉलॉजी, (३) न्युक्लियर मेडिसीन टेक्नॉलॉजी, (४) बॅचलर ऑफ ऑप्टेमेट्री. (ब) कालावधी साडे चार वर्षे- बी.एस्सी इन (१) स्लीप लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, (२) रेस्पिरेटरी थेरपी, (३) डेंटल हायजिन, (४) डेंटल रुम ऑपरेटिंग असिस्टंट
(क) कालावधी तीन वर्षे/ बी.एस्सी इन (१) युरॉलॉजी टेक्नॉलॉजी, (२) रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, (३) न्युरो मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी, (४) आर्थोपेडिक्स टेक्नॉलॉजी, (५) मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी, हे अभ्यासक्रम करता येतात.
नागपूर एम्स येथे बी.एस्सी इन लॅब टेक्नॉलॉजी आणि बी.एस्सी इन मेडिसिन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम करता येतात. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.
अर्हता– (१) बी.एस्सी (ऑनर्स) नर्सिंग/ बी.एस्सी-मेडिकल टेक्नॉलॉजी-रेडिओग्रॅफी/ डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट/ ऑप्टेमेट्री – १२ वी विज्ञानशाखेची परीक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ गणित आणि इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण. (डेंटल हायजिन/ डेंटल ऑपरेटिंग रुम असिस्टंट/ ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करणे आवश्यक.)
सुरेश वांदिले