अभियांत्रिकीतील संधी- ४
युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज– या संस्थेची स्थापना 2003 साली करण्यात आली. स्थापनेपासूनच या संस्थेने औद्योगिक जगताला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीचे अभ्यासक्रम सुरु केले. सध्याच्या काळात महत्वाचे ठरु पाहणारे बिग डेटा ॲनालिटिक्स, क्लॉउड कॉम्प्युटिंग, मशिन लर्निंग ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन डिझाइन,मशिन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, ग्रॅफिक आणि गेमिंग, एरोस्पेस अभियांत्रिकी या सारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात आघाडी घेतली.
स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम –
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) ब्लॉकचेन,(2) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, (3) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, (4) कॉम्प्युटेशनल सस्टेनॅबिलिटी,
बी.टेक इन (1) एरोस्पेस इंजिनीअरिंग, (2) एरोस्पेस इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन एव्हिऑनिक्स, (3) केमिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रिफायनिंग ॲण्ड पेट्रोकेमिकल्स, (4) ॲप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन गॅस स्ट्रिम, (5) सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, (६) फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग, (7) मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग,
प्लेसमेंट
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार २०० च्यावर वेगवेगळया कंपन्या प्लेसमेंट प्रकियेत सहभागी होतात. यामध्ये एल ॲण्ड टी, ओएनजीसी, हुंदई मोटरग्रुप, रॉयल इनफिल्ड, टॉरेंटपॉवर, अम्बुजा सिमेंट, अशोक लेलँडअशा काहीकंपन्यांचा समावेशआहे. गेल्यावर्षी विविधशाखांमधील ८००च्या आसपास विद्यार्थ्यांना कॅम्पसप्लेसमेंटमध्ये निवडण्यात आले. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिकअभियंते आहेत.
संपर्क– (१) एनर्जी एकर्सकॅम्पस, पोस्ट ऑफिस बिधोलीव्हाया प्रेमनगर, देहरादून–२४८००७, (२) नॉलेज एकर्सकॅम्पस, पोस्ट ऑफिस कांधोली व्हाया प्रेमनगर , देहरादून–२४८००७, दूरध्वनी-०१३५-२७७०१३७ , २७७६०५४ फॅक्स-२७७६०९५ , संकेतस्थळ- upes.ac.in, ईमेल- enrollments@upes.ac.in
निवड प्रकिया
या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी दोन पध्दतींचा अवलंब केला जातो. (1) देशभरातील विविध ठिकाणी ऑनलाइन इंजिनीअरिंग ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा देण्याची सोय करण्यात येते.
अर्हता- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 10 वी आणि 12 वीत सरासरीने किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक. तसेच 12 वीत भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्र, या विषयात 50टक्के गुण मिळायला हवे. (2) जेइइ(मेन) परीक्षेत मिळालेले गुण. ही परीक्षा दिलेले जे उमेदवार संस्थेच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यावर आधारित जागांच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जातो.
अर्थसाहाय्य
विद्यार्थ्यांच्या आर्थिक साहाय्यासाठी संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांच्यासोबत करार केला आहे. शैक्षणिक कर्जामध्ये शैक्षणिक, वसतिगृह व इतर शुल्कांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलींना शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सुट दिली जाते. दहावी आणि 12 वीमध्ये 80टक्के गुण आणि भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये 80 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती प्रत्येक शाखेतील पहिल्या 10 टक्के विद्यार्थ्यांना दिली जाते.
नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम
संस्थेच्या, स्कूल ऑफ लॉ मार्फत, बी.टेक (ऑनर्स) इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन (1) सायबर लॉ (2)इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राइट्स हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. कालावधी प्रत्येकी सहा वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये सायबर विश्वाशी निगडित कायदेशीर बाबी आणि संगणक शास्त्राचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमाला इंजिनीअरिंग ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो.
अर्हता- 10 वी आणि 12 वीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळायला हवेत.
०००