(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 अभियांत्रिकीतील संधी -३ 

() बिट्स इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी  ॲण्ड सायन्स, पिलाणी – या संस्थेचा यंदाच्या रँकिंगमध्ये 9 वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात या संस्थेचा दबदबा आहे . ब-याच आयआयटीपेक्षाही या संस्थेतील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देतात. या संस्थेचे पिलाणी, गोवा, हैदराबाद आणि दुबई येथे कॅम्पस आहेत. संस्थेमार्फत बी.ई.(ऑनर्स) हा अभ्यासक्रम चालवला जातो.

पिलाणी कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन , केमिकल  आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई. करता येते. गोवा कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन केमिकल  आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई करता येते. हैदराबाद कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चुरिंग, सिव्हिल ,इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल  आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई करता येते. दुबई कॅम्पसमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांमध्ये बी.ई करता येते.

संस्थेने इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. बारावी विज्ञान शाखेत 75 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. पिलाणी, गोवा आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये फिजिक्स, बायॉलॉजिकल सायन्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या शाखांमध्ये हा अभ्यासक्रम करता येतो. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून तो सत्रनिहाय म्हणजे सेमेस्टर पध्दतीने शिकवला जातो.

बी.ई.(ऑनर्स) आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात येते. ही कॉम्प्युटराइज्ड ऑनलाइन परीक्षा असून आयआयटी-जेइइ(परीक्षे)साठी उत्तम तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सुलभ जाऊ शकते.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या 30 टक्के विद्यार्थ्यांना सत्रनिहाय 25 ते 100 टक्के अशी शैक्षणिक शुल्कात सूट दिली जाते. ही सूट विद्यार्थ्यांची प्रत्येक सत्रातील शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन दिली जाते. पुढच्या सत्रात अशीच कामगिरी कायम राहिली तरच ही सुट पुढे चालू राहू शकते. महाराष्ट्राच्या 12 वी बोर्डाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा साकल्याने अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा कठीण जात नाही.

या संस्थेचा अभ्यासक्रम करणाऱ्या विविध शाखांमधील 600 च्या आसपास विद्यार्थ्यांना दरवर्षी प्लेसमेंट सेलच्या मार्फत चांगली संधी मिळते.

संपर्क– बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलाणी-333031, दूरध्वनी-01596-255221,ईमेल-director@pilani.bits-pilani.ac.in,

,

संकेतस्थळ- https://www.bits-pilani.ac.in/

०००

 

()अम्रिता विश्वविद्यापीठम

कोईम्बतूर येथील अम्रिता विश्वविद्यापीठम यासंस्थेने विविध ज्ञानशाखांच्या दर्जेदार शिक्षण प्रशिक्षणामंध्ये सातत्य ठेवल्याने यंदा या संस्थेस एनआयआरएफमध्ये 14 वा क्रमांक मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला इंस्टिट्यूट ऑफ एमिनन्सहा दर्जा दिला आहे.

या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत अम्रिता स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे कोईम्बतूर, अमरावती (आंध्रप्रदेश),अम्रितापुरी, बेंगळुरु, चेन्नई येथे कॅम्पस आहेत. या संस्थेतील विविध शाखांच्या प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन(मेन)  आणि अम्रिता एन्ट्रन्स एक्झामिनेशन मधील गुण ग्राह्य धरले जातात.

या संस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक अभ्यासक्रम करता येतात. केमिकल इंजिनीअरिंग (कॅम्पस- कोईम्बतूर), एरोस्पेस इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), सिव्हिल इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर आणि चेन्नई), कॉम्प्युटर ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर,बेंगळुरु,चेन्नई आणि अम्रितापुरी), कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कॅम्पस-कोईम्बतूर, बेंगळुरु आणि अम्रितापुरी), इलेक्ट्रिकल ॲण्ड कॉम्प्युटर इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर आणि अम्रितापुरी), इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर,बेंगळुरु आणि अम्रितापुरी), इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर आणि बेंगळुरु), मेकॅनिकल इंजिनीअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर, चेन्नई, बेंगळुरु आणि अम्रितापुरी).याशिवाय केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये 12वीनंतर इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम कोईम्बतूर कॅम्पसमध्ये करता येतात.

संपर्क-अम्रिता विश्वविद्यापीठम,अम्रितापुरी कॅम्पस, अम्रितापुरी,क्लॅप्पाना पोस्ट ऑफिस कोल्लम केरळ- 690525, दूरध्वनी-0476-2801280,फॅक्स-2896178, ईमेलbtech@amrita.edu,

संकेतस्थळ- https://www.amrita.edu/

 या संस्थेतील 90 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांगल्या संधी मिळाल्या आहेत.

000

 

 

() धिरुभाई अंबाणी इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड इंफर्मेशन टेक्नॉलॉजी -संस्थेतील अभ्यासक्रमांना जेइइ(मेन) या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या संस्थेकडे प्लेसमेंटसाठी नामवंत कंपन्या येतात. संस्थेमार्फत बी.टेक. इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड काम्प्युटिंग, बी.टेक इन इन्फर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, बी.टेक इन इन्फर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ऑनर्स) वुइथ मायनर इन कॉम्प्युटेशन सायन्स , हे तीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

संपर्क- डीएआयआयसीटी, इंद्रोदा सर्कल, गांधीनगर- 382007, दूरध्वनी-079-68261700, फॅक्स-68261710, संकेतस्थळ- daiict.ac.in, ईमेल-info@daiict.ac.in

000

) इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी

यासंस्थेला एनआयआरएफ रँकिंगमध्ये २३ वा क्रमांक मिळाला आहे. माहिती तंत्रज्ञान विषयातील शिक्षण,प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील, ही हैदराबाद येथे कार्यरत असणारी महत्वाची संस्था आहे. १९९८ साली या संस्थेची स्थापना सार्वजनिक-खाजगी-सहकार्य या तत्वावर करण्यात आली. आंध्र सरकार आणि देशातील काही महत्वाची औद्योगिक घराणी यांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. अशा पध्दतीने स्थापन झालेली ही देशातील पहिली स्वायत्त संस्था होय. उच्च दर्जाचे संशोधन व शिक्षण देण्याचा उद्देश ही संस्था स्थापन करण्यामागे आहे.

अभ्यासक्रम. – बी.टेक इन () कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग

बी.टेक  ॲण्ड मास्टर ऑफ सायन्स इन () कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग बाय रिसर्च. () इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग बाय रिसर्च. () बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग () कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस बाय रिसर्च. () कॉम्प्युटेशनल लिंग्यिुस्टिक्स बाय रिसर्च. () कॉम्प्युटिंग ॲण्ड ह्युमन सायन्स बाय रिसर्च.

उपरोक्त पाचही अभ्यासक्रम प्रत्येकी पाच वर्षे कालावधीचे असून ते ड्युएल डिग्री या नावाने ओळखले जातात.

निवड प्रकियापुढील तीन प्रकारे प्रवेश दिला जातो. ()बी.टेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेइइ(मेन)परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. ()बी.टेक-ड्यूएल डिग्री अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत अंडरग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा घेतली जाते. १२ वी विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र याविषयात ६० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. महाराष्ट्रातील केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद. () केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उड्डाण योजनेत निवडल्या गेलेल्या विद्यार्थीनींना बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा देता येते.

अर्थसाहाय्य– – ()प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेट बँक ऑफ इंडिया, कोणत्याही सुरक्षेशिवाय २० लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज देते. अर्जदाराच्या कुटुंबियांकडे आधीचे कर्ज असले तरी हे शैक्षणिक कर्ज दिले जाते. () संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक निधीकोष तयार केला असून त्याद्वारे गरजू विद्यार्थ्यांना, आता घ्या – नंतर परत करा,या तत्वावर मदत केली जाते. ()कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून पूर्ण सूट दिली जाते.

प्लेसमेंट

या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संस्थांमध्ये प्लेसमेंटची संधी मिळाली आहे. संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये फेसबूक, ॲपल, ॲमेझॉन, टेस्को, गुगल, वालमार्ट, उबर, ॲडॉब, ब्लूमबर्ग, टीसीएस यासारख्या कंपन्या सहभागी होतात.

या संस्थेचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता मोठी आहे. येथे संशोधन कार्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

 संपर्क – यूजी ॲडमिशन्स, आयआयआयटी, गाचीबावली हैदराबाद – ५०००३२, टेलेफॅक्स- ४०-६६५३१२५०,ईमेल- ugadmissions@iiit.ac.in संकेतस्थळ- iiit.ac.in

सुरेश वांदिले