मार्केटिंग आणि ब्रँडिंग
ग्राहकांच्या सध्यकालीन गरजा लक्षात घेण्यासोबतच भविष्यकालीन आवड, गरजा आणि त्यांचे जीवन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कोणत्याबाबींची आवश्यकता लागेल याचा सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा कोणताही उद्योग वा व्यवसाय कालबाह्य ठरण्याची शक्यता नाकरात येत नाही. त्यामुळे व्यवसायवृध्दीसाठी नवी व्युहनीती करणाऱ्या तज्ज्ञांना महत्व प्राप्त होत आहेत.हे तज्ज्ञ व्यवसायवृध्दीचे तंत्र आणि संकल्पना वापरण्याचे कौशल्य प्राप्त केलेले असतात. कंपनी, उद्योग आणि व्यवसायाचे मार्केटमधील स्थान अधिक बळकट करणे, नफ्यामध्ये वृध्दी करणे आणि कालसुसंगता टिकवणे या कार्यात प्रमुख भूमिका बजावत असतात.
व्यवस्थापन आणि विपणन या विषयांमध्ये तज्ज्ञता प्राप्त केलेले उमेदवार या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करु शकतात. मार्केटिंग तज्ज्ञास वस्तू आणि उत्पादनांची गुणवत्ता व दर्जा उच्च प्रतिचा राहील याकडे कंपनीचे सातत्याने लक्ष वेधावे लागते.कमी गुणवत्ता आणि दर्जाच्या उत्पादनांची विक्री ही उत्तम व प्रभावी मार्केटिंग कम्युनिकेशनवर अल्पावधितच अयशस्वी ठरु शकते. गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंपनीचे ब्रँडिंग करणे शक्य होत नाही. अशा कंपन्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त करु शकत नाही.
मार्केटिंग कम्युनिकेटर ग्राहक व कंपनी आणि विविध माध्यमे यांच्यामधील महत्वाचा व प्रभावी दुवा ठरु शकतो. एखाद्या कंपनीचे मार्केटमधील सध्याचे स्थान आणि भविष्यात या स्थानात होणारी घट वा वाढ याविषयी मार्केटिंग कम्युनिकेटर आपल्या कौशल्य वा ज्ञानाद्वारे कंपनी व्यवस्थापकांना सुयोग्य अशी माहिती देऊन सावधगिरीच्या उपयोजना सूचित करु शकतात.
काही अभ्यासक्रम व संस्था
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) – स्ट्रॅटेजिक मार्केटिंग (व्युहात्मक विपणन) आणि कम्युनिकेशन या विषयाचे अभ्यासक्रम चालवणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (कम्युनिकेशन) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतात. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.(१)ॲडव्हर्टायजिंग ॲण्ड ब्रँड मॅनेजमेंट, (२)डिजिटल कम्युनिकेशन मॅनेजमेंट, (३)मार्केटिंग अॅनालिटिक्स (४)मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट.
या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांना सामोरे जावे लागते.(१)कॉमन ॲडमिशन टेस्ट – कॅट, झेव्हियर ॲप्टिट्यूड टेस्ट – झॅट किंवा जनरल मॅनजमेंट ॲप्टिट्ड टेस्ट – जीमॅट , या तीनपैकी कोणतीही एक चाळणी परीक्षा द्यावी लागेल. (२) मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन ॲडमिशन टेस्ट – एमआयसीएटी. (३)समूह चर्चा आणि मुलाखती. अंतिम निवडीसाठी कॅट/झॅट/जीमॅट या परीक्षेतील गुणांना २० टक्के वेटेज, एमआयसीएटी परीक्षेतील गुणांना ३० टक्के वेटेज, समूह चर्चा २० टक्के वेटेज, आणि मुलाखती ३० टक्के वेटेज दिले जाते.
पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रम इन क्रॅफ्टिंग क्रिएटिव्ह कम्युनिकेशन – या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमामध्ये (1) कॅम्पेन प्लॅनिंग, (2) डिजिटल मार्केटिंग कम्युनिकेशन, (3) आर्ट डायरेक्शन, (4) ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट, (5) फिल्म ॲण्ड म्युझिक ॲप्रिशिएशन, (6) फोटोग्रॅफी, (7) कस्टमर सेंट्रिक कम्युनिकेशन, (8) सॉफ्ट स्किल्स, (9) रेडियो ॲण्ड म्युझिक, (10) फिल्म मेकिंग ॲण्ड ॲनिमेशन, (11) इंट्रोडक्शन टू आर्ट, (12) कॉपीरायटिंग, (13) न्यू मीडिया ॲण्ड एक्सपिरिंशियल मार्केटिंग, (14) आयडिया जनरेशन टेक्निक आदी विषय घटकांचा समावेश आहे.
जाहिरात, ब्रँडिग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्युहनीती, डिजिटल मार्केटिंग या सारख्या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या व्यक्तीस आपली प्रतिभा आणि सृजनशीलता अत्यंत प्रभावीरीत्या व आधुनिक पध्दतीने वापरता यावी साठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.
ऑनलाईन अभ्यासक्रम- या संस्थेमार्फत पुढील ऑनलाईन अभ्यासक्रम करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हे अभ्यासक्रम ब्रँडिंग, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्यवसायवृध्दीसाठी ठरविण्यात येणाऱ्या सृजनशील व्युहनीती, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
(१) ॲडव्हान्स्ड डिजिटल ट्रांसफॉर्मेशन प्रोग्रम, (२) ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन,(३) ब्रँड मॅनेजमेंट स्टॅटेजीज, (४) डिजिटल ब्रँडिंग ॲण्ड ॲडव्हर्टायजिंग, (५) बिझिनेस मॅनेजमेंट, (६) डिजिटल मार्केटिंग, (७)डिजिटल मार्केटिंग ॲण्ड कम्युनिकेशन (८) मॅनेजिंग ब्रँड ॲण्ड कम्युनिकेशन, (९) मार्केट रिसर्च ॲण्ड ॲनॅलीसीस, (१०) मीडिया एंटरटेनमेंट ॲण्ड मार्केटिंग (११) पब्लिक रिलेशन ॲण्ड कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिज, (१२) स्टॅटेस्टिक्स ॲण्ड अनॅलिटिक्स फॉर मार्केटिंग इनसाईट, (१३) स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन.
या ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी पुढील संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. (१) टॅलेन्ट एज-ईमेल- enquiry.dtd@talentedge.in, संकेतस्थळ-admissions.assistance@talentedge.com, दूरध्वनी-८३७ ६०००६००, (२) अपग्रेड – ईमेल-admissions@upgrad.com (३) आयव्होरी एज्युकेशन- ईमेल- admission@ivoryeducation.in,दूरध्वनी- ८८६०४३८९९० (४)इरुडाईट्स- ईमेल- mica@eruditus.com,दूरध्वनी-७२०८८८९९९०
संपर्क – मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन (MICA) शेला, अहमदाबाद – ३८००५८, दूरध्वनी-०२७१७-३०८२५०, टेलेफॅक्स- ३०८३४९ संकेतस्थळ-www.mica.ac.in, ईमेल-admissionenquiry@micamail
000