औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम हे रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतील अशा हेतुनेच सुरु करण्यात आले आहेत. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे हे अभ्यासक्रम विद्यार्थींनींना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वास प्राप्त करुन देण्यासाठी साहाय्यभूत ठरु शकतात.
प्रवरानगर आयटीआय
प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण शैक्षणिक संस्थेने फक्त महिलांसाठी आयटीआय- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या केंद्रांतर्गत (१) कॉम्प्युटर ऑपरेटिंग प्रोग्रॅमिंग असिस्टंट हा एक वर्षं आणि (२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक हा दोन वर्षे कालावधीचा अभ्सासक्रम चालविला जातो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थींनिंना या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
संपर्क- प्राचार्य, महिलांचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र- आयटीआय, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी, तालुका- राहता,अहमदनगर- ४१३७१३, टेलेफॅक्स -०२४२२-२७३४९७, संकेतस्थळ- http://www.pravara.in
०००
औंध-आयटीआय
पुणे परिसरातील औंध येथे १९९२ साली केवळ महिलांसाठीच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात पुढील अभ्यासक्रम करता येतात- (१) कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड मेंटनन्स, (२) इनफर्मेशन कम्युनिकेशअन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटनन्स, (३) टेक्निकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स, (४) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स, (५) इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, (६) कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, (७) फ्रुट ॲण्ड व्हिजिटेबल प्रोसेसर, (८) बेसिक कॉस्मेटॉलॉजी, (९) ड्रेस मेकिंग. अर्हता- १० वी उत्तीर्ण विद्यार्थींना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. संपर्क- प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींचे), परिहार चौक, औंध- पुणे- ४१२००७, दूरध्वनी- ०२०-२५८८२७७६, संकेतस्थळ- itigpune.ucoz.org,ईमेल- principalgirlsiti@yahoo.com
०००
दादर मुंबई-आयटीआय
महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र- दादर मुंबई येथील अभ्यासक्रम- (१) बेसिक कॉस्मेटॉलॉजी, (२) कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, (३) ड्रेस मेकिंग, (४) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,(५) इंफर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम्स मेंटनन्स, (६) इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, (७) पेंटर, (८) सेक्रेटरिअल प्रॅक्टिस,
संपर्क- महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र- ३७४,वीर सावरकर,मार्ग,दादर-पश्चिम,मुंबई,दूरध्वनी- ०२२-२४३६८५८१
०००
ठाणे आयटीआय
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र-ठाणे,येथील अभ्यासक्रम-
(१) बेसिक कॉस्मेटॉलॉजी, (२) कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, (४) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (५) इंफर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम्स मेंटनन्स, (६) इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, (८) सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, (९) इलेक्ट्रिशिअन, (१०) फॅशन टेक्नॉलॉजी, (११) स्युईंग टेक्नॉलॉजी
संपर्क- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (मुलींचे), द्वारा शासकीय तांत्रिक हायस्कूल कोपरी, कॉलनी पश्चिम,ठाणे,दूरध्वनी- ०२२-२५३२५११२
०००
रत्नागिरी आयटीआय
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र(मुलींचे) रत्नागिरी येथील अभ्यासक्रम- (१) बेसिक कॉस्मेटॉलॉजी, (२) कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, (३) ड्रेस मेकिंग, (४) इंफर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम्स मेंटनन्स , (५) फ्रुट ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, (७) स्युईंग टेक्नॉलॉजी
संपर्क- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (मुलींचे), नाचणे रोड, रत्नागिरी, दूरध्वनी- ०२३५२- २७०५९५
०००
००००