(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

12वीनंतर  वाणिज्य शाखेतील करिअर संधी

बारावीनंतर  व्यवसाय , व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास ,विक्री, विपणन अशा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील आणि त्यातही वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करुन देऊ शकणारे काही अभ्यासक्रम गेल्या काही वर्षात सुरु झाले आहेत. यामध्ये बी.कॉम इन फायनांशिअल मार्केट्स (बीएफएम), बी.कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स (बीएएफ), बॅचलर ऑफ  मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बी.कॉम इन बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स (बीबीआय), बी.कॉम-एलएलबी अशा अभ्यासक्रमांचा उल्लेख करावा लागेल.

  आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनास आवश्यक असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयाचा या अभ्यासक्रमांध्ये समावेश करण्यात आल्याने, संबंधित उमेदवाराचे रोजगारमूल्य वाढले आहे.

(1) बी.कॉम इन फायनांशिअल मार्केट्स आणि  बी.कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स –

   वित्तीय क्षेत्रातच करिअर करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमध्ये संपत्ती निर्मिती, वित्तीय व्यवस्थापनाचे विविध पैलू, शेअर मार्केटमधील विविध पैलू, संपत्ती निर्मितीत म्युच्यूअल फंडाची उपयुक्तता, गुंतवणूक आणि बचतीमधील फरक आदी बाबी शिकता येतात. अकाउंटिंग, कर आणि त्याचे विविध प्रकार, करआकारणी अशा बाबींचे मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू शकते. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वित्तीय आणि गुंतवणूक विश्लेषक म्हणून करिअर घडवण्याची संधी मिळू शकते. फायनांस आणि बँकिंग क्षेत्रातही करिअर करता येऊ शकते.

  (2) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

  मनुष्यबळ विकास आणि सर्वसाधारण स्वरुपाचे व्यवस्थापन यामध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनची निवड करता येते. या अभ्यासक्रमांतर्गत व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ठरु शकणारे संवादकौशल्य, नेतृत्वकौशल्य, समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे कौशल्य, व्यवसायवृध्दीसाठी नावीन्यपूर्ण आराखड्यांचा विकास आदी बाबींचे ज्ञान प्राप्त करता येते.

(3) बी.कॉम-

  अकाउंटन्सी, वित्तीय नियोजन, सांख्यिकी , अर्थशास्त्र ,विपणन, वित्तीय सेवा, व्यापाराची मूलभूत तत्वे यासारख्या घटकांमध्ये बी.कॉम शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो. अशा विद्यार्थ्यांना पुढे कंपनी सेक्रेटरी, सनदी लेखापाल याक्षेत्राकडे वळणे सुलभ होऊ जाते. अकाउंटन्सीमध्ये प्रावीण्य मिळवल्यास खाजगी क्षेत्रात अनेक संधी मिळतात. ग्राहकास गतिमान,अचूक आणि दर्जेदार सेवा देऊ शकणाऱ्या अकाउंटन्ट्सची वाणना दिसून येते. विद्यार्थ्यांनी या शाखेकडे वळताना स्वत:चा या विषयांकडे असणारा कल , आवड आणि गती या बाबींचा विचार करायला हवा.

  ही पदवी घतेललेल्या उमेदवारांना मार्केट रिसर्च, लेखा परीक्षण, बँकिंग, टॅक्स कंसलटन्सी या क्षेत्रांमध्ये करिअर करता येऊ शकते. आवड आणि गती लक्षात घेऊन बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला अकाउंटन्सी किंवा फायनान्स या विषयांचे स्पेशलायझेशन स्वीकारल्यास पुढे करिअरची दिशा निश्चित होते. हे विद्यार्थी पुढे सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटटंन्ट (सीएमए) किंवा चार्टर्ड फायनांशिअल ॲनालिस्ट- (सीएफए) हे अभ्यासक्रम करुन स्वत:च्या करिअरला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात. यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हे विद्यार्थी, मास्टर इन इंटरनॅशनल बिझिनेस मॅनेजमेंट, एमबीए इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस हे अभ्यासक्रम करुन वरच्या श्रेणितील पदे मिळवू शकतात.

12वीनंतर सर्व शाखांसाठी करिअर संधी

 

(4) बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स

  इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकर आदी क्षेत्रात  हा अभ्यासक्रम केल्यावर करिअर संधी मिळू शकतात.

  (5) बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन(बीबीए)

  कार्पोरेट कार्यालये, बँकिंग ,फायनान्स कंपन्या, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपन्यामध्ये  हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी मिळू शकते. स्वत:चा व्यवसाय सुध्दा करता येऊ शकतो.

  (6) बॅचलर ऑफ  मॅनेजमेंट स्टडीज(बीएमएस)

  व्यवसाय वृध्दी सल्लासेवा, मनुष्यबळ विकास, विपणन संशोधन आदी क्षेत्रात  हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर घडवता येऊ शकते.

  (7) बी कॉम- एलएलबी

  वाणिज्य विषयाशी संबंधित विविध कायदेशीर बाजूंचे ज्ञान या अभ्यासक्रमात संपादित करता येते. त्यामुळे अशा विषयाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात हा पदवीधारक उमेदवार त्यांच्या ग्राहकास चांगली सेवा देऊ शकतो. हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर विक्री आणि अकबारी कर , सेवा कर, आयकर क्षेत्र, कार्पोरेट आणि व्यावसायिक कंपन्या, बँका, वित्तीय व संपत्ती निर्मिती कंपन्या यासाठी सेवा-सल्लागार म्हणूनही करिअर करता येऊ शकते.

000

 

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन फायनांशिअल मॅनेजेमेंट.

हा अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनांशिअल मॅनेजेमेंट या संस्थेने सुरु केला आहे.या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने केली आहे. कालावधी एक वर्षं.हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना१०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे.अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी.

करिअर संधी- () इव्हेंस्टमेंट बँकर ,()रिस्क मॅनेजमेंट ॲडव्हायजर, ()फायनांशिअल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजर, () सर्व्हिलंस/कम्प्लॉयन्स/रेग्युलेशन मॅनेजर,()फायनांशिअल अॅनालिस्ट, ()कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग,मर्ज आणि ॲक्विझिशन,()फंडामेंटल ॲण्ड टेक्निकल अॅनालिस्ट,()इक्विटी आणि डेट मार्केट ब्रोकिंग,() फंड्स/पोर्टिफोलिओ मॅनेजर.

संपर्क– सेक्टर ४८,पाली रोड, जवळ,फरिदाबाद-१२१००१,हरयाणा,दूरध्वनी- ०१२९-२४६५२५८,२४१८८७९,फॅक्स-२४१८८६७ संकेतस्थळ-www.nifm.ac.in,ईमेल-pgdmfm202022@ nifm.ac.in