(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

रिअल इस्टेटमधील संधी

भारतात सध्या पायाभूतसुविधा विकासकामांना वेग आला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे महत्वाचे काम हे क्षेत्र करित आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षात भारतात साधारणत: 500 मिलियन डॉलर्स याक्षेत्रावर खर्च केला जाऊ शकतो. यातील 70 टक्के खर्च उर्जा, रस्ते आणि नागरी पायाभूत सुविधा, पुल, रेल्वे, विमानतळे, पाणी पुरवठा, जलसिंचन, धरण, बंदरे आदी बाबींवर अपेक्षित आहे. 2022 पर्यंत 19 हजार किलोमीटर द्रुतगती मार्ग बांधले जाऊ  शकतात.

   कृषीक्षेत्रानंतर बांधकाम हे रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या संधी निर्माण करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची वार्षिक चक्रवाढ 11.1 टक्के अशी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती लक्षणीय हातभार लावत आहेत. या क्षेत्रात खाजगी आणि शासकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाची धोरणे या क्षेत्रास अधिकाधिक साहाय्यभूत ठरणारी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात.

   काही संस्था

(1) आरआयसीएस-स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट

   ॲमिटी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत आरआयसीएस- स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन (1) कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट, अर्हता- 60 टक्के गुणांसह कोणत्याही  शाखेतील 12 वी परीक्षा उत्तीर्ण. निवड प्रक्रिया- 12 वीमध्ये मिळालेले गुण, इंग्रजी भाषा चाळणी परीक्षा आणि मुलाखत, (2) रिअल इस्टेट ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट / अर्हता- 60 टक्के गुणांसह  कोणत्याही  शाखेतील 12 वी परीक्षा उत्तीर्ण. निवड प्रक्रिया- 12 वीमध्ये मिळालेले गुण, इंग्रजी भाषा चाळणी परीक्षा आणि मुलाखत (12 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो.)

संपर्क- (1) आरआयसीएस ( रॉयल इंस्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स),स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हिरॉन्मेन्ट, ब्लॉक- एफ-2, फिफ्थ फ्लोअर, ॲमिटी युनिव्हर्सिटी-सेक्टर-125 , नॉयडा-201313, दूरध्वनी- 0120-6673000 (2)  

आरआयसीएस स्कूल ऑफ बिल्ट, ३०३, थर्ड फ्लोअर, ॲमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, भातान, पोस्ट सोमठाणे, पनवेल-410206,संपर्क-भ्रमणध्वनी-७०४५७८०१२६, ईमेल- ricssbe@rics.org किंवा admissions@mum.amity.edu

 संकेतस्थळ- www.ricssbe.org आणि amity.edu/mumbai

(2) युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्टडीज-

   अभ्यासक्रम- बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. कालावधी- चार वर्षे.अर्हता-50 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12 वी उत्तीर्ण. संपर्क पोस्ट ऑफिस बिधोली, व्हाया प्रेमनगर ,देहरादून-248007, दूरध्वनी-0135-2770137, ईमेल-enrollments@upes.ac.in

 संकेतस्थळ- upes.ac.in,

०००

  सिम्बॉयसीस स्किल्स ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटी-

   अभ्यासक्रम – बी.टेक इन कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. कालावधी – चार वर्षे. अर्हता- 12वी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा रसायनशास्त्र यापैकी कोणताही एक विषय घेऊन सरासरीने 45 टक्के गुण मिळायला हवेत. निवड- जेइइ (मेन) किंवा एम.एच-सीइटीचे गुण निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.

 

 संपर्क- किवाळे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग,पुणे- 412101,दूरध्वनी- 020-27187768, ईमेल- admissions@ssou.ac.in, संकेतस्थळ- http://www.ssou.ac.in

000

  हिंदुस्थान इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स-

   अभ्यासक्रम –  (1) बी.टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट (2) बी.टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. संपर्क- 40,जीएसटी रोड,सेंट थॉमस माऊंट चेन्नई- 600016, दूरध्वनी- 044-22342155, ईमेल- info@ hindustanuniv.ac.in

,संकेतस्थळ-www.hindustanuniv.ac.in

०००

आयआयटी मद्रास-

अभ्यासक्रम- (1) बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ एम.टेक स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चरल इंजिनिअरिंग (2) बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ एम.टेक स्पेशलायझेशन इन बिल्डिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट,  संपर्क- आयआयटी,चेन्नई-600036, संकेतस्थळ- www.iitm.ac.in

०००

श्री गुरु गोविंद सिघ ट्रायसेनटेनरी युनिव्हर्सिटी

   अभ्यासक्रम- बी.टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. कालावधी-चार वर्षे. अर्हता- 12वी विज्ञानशाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण.

संपर्क- चंदू-बुधेरा, गुरुग्राम-बदली रोड, गुरुग्राम-122505, दूरध्वनी-0124-2278183, ईमेल-info@sgtuniversity.org ,संकेतस्थळ-sgtuniversity.ac.in,

०००

सेंटर फॉर एन्व्हिरॉन्मेन्टल प्लॅनिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी (सीइपीटी)युनिव्हर्सिटी 

   यांस्थेने अभिकल्प, नियोजन, बांधकाम आणि व्यवस्थापन या विषयांशी निगडित अभ्यासक्रम सुरु केले आहेत. अभ्यासक्रम – (1) बॅचलर ऑफ कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, कालावधी- चार वर्षे, अर्हता- 12वी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याविषयांसह 50 टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमातीं संवर्गातील विद्यार्थी- 45 टक्के गुण (2) बॅचलर ऑफ प्लॅनिंग, कालावधी- चार वर्षे,अर्हता- कोणत्याही शाखेतील 12 वी परीक्षेत 50 टक्के गुण मिळणे आवश्यक.  अनुसूचित जाती जमातीं संवर्गातील विद्यार्थी- 45 टक्के गुण

   संपर्क– सीइपीटी युनिव्हर्सिटी, कस्तुरभाई, लालभाई कॅम्पस, युनिव्हर्सिटी रोड नवरंगपुरा, अहमदाबाद- 380009, दूरध्वनी- 079- 26302470, फॅक्स-२६३०२०७५,

, ईमेल-admissions@cept.ac.in

,संकेतस्थळ- www.ceptadmissions.in

०००

 नॅशनल काउंसिल फॉर सिमेंट ॲण्ड बिल्डिंग मटेरिअल्स-  

·            या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिमेंट टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग विभागांतर्गत ही संस्था कार्यरत आहे. सिमेंट आणि बांधकाम उद्योगाशी निगडित संशोधन, विकास,तंत्रज्ञान, सल्ला आणि प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अर्हता- बी.ई/बी.टेक इन केमिकल इंजिनिअरिंग. संपर्क- द हेड, सेंटर फॉर कंटिन्यूइंग एज्युकेशन सर्व्हिसेस,नॅशनल काउंसिल फॉर सिमेंट ॲण्ड बिल्डिंग मटेरिअल्स, 34 किलोमीटर स्टोन, दिल्ली-मथुरा रोड, बालागढ- 121004, दूरध्वनी-0129-4192222,टेलेफॅक्स-२२४२०५१

·          ईमेल-cceb@ ncbindia.com

·         ,संकेतस्थळ- http://www.ncbindia.com

·         ०००
एमआयटी आर्ट,डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी-

   अभ्यासक्रम- एमबीए इन प्रोजेक्ट ॲण्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे.अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- राजबाग, लोणी- काळभोर, पुणे, संकेतस्थळ- www.mituniversity.edu.in, ईमेल-admissions@ mituniversity.edu.in ,संपर्कध्वनी-९०२१०८०१५७

०००

आज करिअर कंसेप्ट(https://www.facebook.com/Career-concept-100260352041907) मध्ये – रिअल इस्टेटच्या जगात – सध्या आपल्या देशात आणि जगात इतरत्र रिअल इस्टेट (जमिनीचे व्यवहार/ गृहसंकुलाची निर्मिती, सदनिकांची खरेदी-विक्री इत्यादी) उद्योग झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी २०२२ पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात १९० बिलियन डॉलर्स गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवलीय. दिवसागणिक या क्षेत्रात विविध प्रकराचे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

सध्या या क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची कमतरता ४ कोटीच्या आसपास असल्याचे उद्योजकांचे निरीक्षण आहे. २०२२ पर्यंत ७५ लाख कौशल्ययुक्त मनुष्यबळास रोजगराच्या संधी मिळू शकतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे नागरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्र आणि राज्यशासन भर देत आहे. पुढील काळात शासनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागाने २५ लाख घरे, १०० स्मार्ट शहरे उभारली जाण्याची शक्यता आहे. मोठ्या खाजगी कंपन्या गृहसंकुलाच्या व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात उतरल्या आहेत. या कंपन्यांना कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज आहे. रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ॲक्ट) सारखा कायदा ग्राहकांच्या हितासाठी आल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक व्यावसायिकरीत्या आणि पारदर्शकरीत्या काम करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात विपणन,विक्री , सेल्स, वित्त, प्रशासन, जनसंपर्क अशा विविध संधी मिळू शकतात.

व्यवस्थापन आणि विपणन

रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेट मार्केटिंग व सेल्स हे अभ्यासक्रम याअनुषंगाने उपयुक्त ठरु शकतात. या अभ्यासक्रमात या क्षेत्राची विस्तृत माहिती, कायदेशीर बाबी, कागदपत्रांची जुळवाजुळव, विविध परवाने, बांधकाम प्रक्रिया, विक्री, इतर तांत्रिक बाबी शिकवल्या जातात.

रियल इस्टेट क्षेत्रासाठी गृहवित्त आणि सूक्ष्म वित्तची गरज भासते. त्यामुळे या क्षेत्रासाठी मनुष्यबळ लागते. स्थापत्य अभियंत्यांना रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये संधी उपलब्ध होते. वास्तुकला अभियंते, लेखा पदवीधर, विधि पदवीधरांनी हा अभ्यासक्रम केल्यावर त्यांच्या कौशल्यात वृध्दी होऊ शकते. रेरा अधिनियमानुसार कम्प्लॉयन्स ऑफिसर, कस्टमर रिलेशनशीप ऑफिसर, प्रोजेक्ट मॅनेजर यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

मनुष्यबळाची गरज

 

() स्पेशलाइज्ड मनुष्यबळ- यामध्ये व्हॅल्युअर, क्वालिटी सर्व्हेअर, फॅसिलिटी मॅनेजर, प्रॉपटी मॅनेजर, सस्टनेबल डेव्हलपमेंट एक्सपर्ट यांचा समावेश होतो.

() प्रमुख मनुष्यबळ – यामध्ये इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि प्लॅनर यांचा समावेश होतो.

() इतर साहाय्यक मनुष्यबळ- यामध्ये व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, सनदी लेखापाल, विपणन अधिकारी, विक्री अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, वित्तीय नियंत्रक किंवा विश्लेषक, वकील, रेरा कम्प्लॉयन्स ऑफिसर, ग्राहक संपर्क आधिकारी इत्यादींचा समावेश होतो.

आवश्यक गुण

() उत्तम मौखिक संवाद कौशल्य, () व्यावसायिक शिष्टाचार, () सादरीकरण कौशल्य, () नेतृत्व कौशल्य, () निर्णय क्षमता, () संसाधनांची हाताळणी, () व्यवस्थापन माहिती प्रणाली, () वाटाघाटीची तंत्रे, () विश्लेषण कौशल्य, (१०) ग्राहक हाताळणी कौशल्य,(११) दस्तऐवजीकरण आणि अहवाल लेखन,(१२) विवाद/ संघर्ष व्यवस्थापन, (१३) कार्यालय व्यवस्थापन

या उद्योगात, सल्ला मार्गदर्शन, ब्रोकरेज अशा सेवाही लागतात. नव्या अधिनियमानुसार ब्रोकरेज क्षेत्र हे अधिक सुव्यस्थित होणार आहे. यात व्यावसायिकता येईल व पारदर्शक कार्यप्रणाली विकसित होईल. त्यामुळे या क्षेत्रात नव्या करिअर संधी निर्माण होतील.

रिअल इस्टेट या अनुषंगाने अभ्यासक्रम/प्रशिक्षण चालविणाऱ्या काही संस्था-

रिअल इस्टेट मॅनेजमेंट इंस्टिट्यूट– या संस्थेमार्फत रिअल इस्टेट बिझिनेस मॅनेजमेंट ॲण्ड हाउुसिंग फायनांस हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये रिअल इस्टेट व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध संकल्पना शिकवल्या जातात. कौशल्यवृध्दीसाठी साहाय्य केले जाते. इंटरनेट मार्केटिंगची कौशल्ये शिकवली जातात. करार प्रक्रियेची माहिती दिली जाते. रिअल इस्टेट आणि गृहनिर्माणासाठी लागणाऱ्या वित्तीय बाबी, कर्ज प्रक्रिया, कायदेशीर बाबी यांची माहिती दिली जाते. कर आकारणीचे स्वरुप शिकवले जाते. बांधकामाच्या प्रारंभापासून ते ग्राहकास सदनिकेची विक्री करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रकियेचे संनियंत्रण कसे करावे याची माहिती दिली जाते. प्रकल्प व्यवस्थापनाच्या मुलभूत बाबी शिकवल्या जातात. ग्राहकांशी उत्तम संबंध कसे निर्माण करावे यासाठी टिप्स दिल्या जातात. नेतृत्व गुण विकसित केले जातात. उपलब्ध संसाधनांचा उत्तम  व प्रभावी उपयोग कसा करावा, याचे तंत्र शिकवले जाते. कामगार कायद्याची माहिती करुन दिली जाते. कामगार व कर्मचाऱ्यांच्या कामाचे विश्लेषण करणे, चांगल्या कामगार,कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, आदी बाबीही शिकवल्या जातात.

या अभ्यासक्रमात लेआऊट आणि किमतीचे निर्धारण, जमीन-जुमल्याची आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर बाबी शिकवल्या जातात. विक्री आणि विपणनाची मुलभूत तंत्रे, व्यवसाय कसा सुरु करावा याची तंत्रे शिकवली जातात. जाहिरा ती आणि ब्रँडिंग, विक्रीचे नियोजन, व्यवसाय वाढीचे नियोजन, इंटरनेट मार्केटिंग आणि संकल्पना सोशल मीडियाचा वापर, ब्लॉग लेखन आणि संकेतस्थळाची निर्मिती, गृहकर्ज प्रक्रिया, आयकर निर्धारण व नियोजन, भाडेतत्व आणि गहाण ठेवण्याची प्रक्रिया, जमिनीचे व्यवहार, पुनर्विकास, प्रकल्पाचे आयुष्यमान, करार प्रकिया, मनुष्यबळ व्यवस्थापन,रोजगार निर्मिती आणि विश्लेषण, कामगार व कर्मचाऱ्यांची निवड आणि नियुक्ती, कामगारांच्या कामाचे विश्लेषण या घटकांची माहिती करुन दिली जाते.

हा अभ्यासक्रम चार महिन्यांचा असून त्यात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. १२वी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील व्यक्ती हा अभ्यासक्रम करु शकतो.

संपर्क – रिअल इस्टेट मॅनेजमेंट इंस्टिट्यूट, ५ एव्हरग्रीन इंडस्ट्रिअल इस्टेट, शक्ती मिल गल्ली, महालक्ष्मी, मुंबई-४०००११, संपर्क- १८००२२७३६४ ,ईमेल-info@remi.edu.in, संकेतस्थळ- http://www.remi.edu.in

०००

०००

इंस्टिट्यूट ऑफ लिडरशीप-

   अभ्यासक्रम- बीबीए इन रिअल इस्टेट मॅनेजमेंट,कालावधी- तीन वर्षे, अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, द कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन आणि रिअॅलटर्स ॲण्ड इस्टेट कन्सलटंट्स असोशिएशन या संस्थांशी, मौलाना अबूल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने सामंजस्य करार केला आहे. याच युनिव्हर्सिटीमार्फत ही पदवी दिली जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर रिअल इस्टेट डेव्हलपर, हाऊसिंग ऑफिसर, इव्हेंस्टमेंट कंसलटंट अशा करिअर संधी मिळू शकतात.

   संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ लिडरशीप (आयलीड), ११३,जे माथेस्वारटोला रोड, निअर ॲक्सिस बँक, ऑफ पार्क रिजेंसी हॉटेल, कोलकता- ७०००४६, दूरध्वनी-०३०-४०१८२०००आणि ६३१२२२२२

 ईमेल-info@ ilead.net.in, संकेतस्थळ-www.ilead.net.in

००००

 

०००

इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम

शासकीय तंत्रनिकेतन मुंबई या संस्थेने गृहसंकुलाच्या व्यवस्थापन प्रणालीशी संबधित सर्टिफिकेट कोर्स इन इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

या अभ्यासक्रमात इमारतीच्या देखभाल व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचे व त्यासाठी उपयोगात आणणाऱ्या उपकरणांच्या हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सीसीटीव्ही प्रणाली, प्रवेश नियंत्रण प्रणाली, अग्नी सुरक्षा प्रणाली , हिटिंग-व्हेंटिलेशन ॲण्ड एअर कंडिशन प्रणाली यांचा समावेश आहे. कालावधी- ६ आठवडे. अर्हता- दहावी उत्तीर्ण,

संपर्क– शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, बांद्रे पूर्व- मुंबई-४०००५१, दूरध्वनी- ०२२- २६४७४५८७, फॅक्स- २६४७२५५२, ईमेल-principal@ gpmumbai.ac.in,

 संकेतस्थळ- http://www.gpmumbai.ac.in

००००