(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

डिजिटल गेम (2)

गेल्या आठवड्यात गेमिंग उद्योगाबाबत अर्थविषयक नियतकालिकांमध्ये बातमी प्रकाशित झाली. या बातमीनुसार भारतात करोना विषाणुमळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात डिजिटल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्सची लोकप्रियता प्रचंड वाढली. गेल्या वर्षी या उद्योगामध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली. पबजी या गेमवरील बंदीमुळे ही वाढ काही काळ थांबली पण टाळेबंदीच्या काळात ई-स्पोर्टमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तिंच्या संख्येत 90टक्के वाढ झाली. जवळपास दीड कोटी प्रेक्षकांचा वेगवेगळया 17 प्रसारण माध्यमांव्दारे  (ब्रोडकॉस्टिंग प्लॅटफॉर्म) यात सहभाग नोंदवला गेला.  फिकी (फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ) च्या वार्षिक अहवालानुसार 2020 मध्ये ऑनलाइन गेमिंग उद्योगाची उलाढाल 7700 कोटी रुपयांपर्यंत पोहचली. हे डिजिटल गेम खेळणाऱ्यांची संख्या 2022 पर्यंत 440 मिलियन पर्यंत पोहचण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय.

नजारा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिश मित्तरसेन यांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षामध्ये सर्व प्रकारच्या मनोरंजन व्यवसायाच्या एकत्रित व्यवसयापेक्षा 10 पट अधिक या क्षेत्राचा विस्तार होऊ शकतो. सध्या या व्यवसायाकडे वळणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. मात्र भविष्यातील संधी लक्षात घेऊन या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य हस्तगत केल्यास विपुल संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2022 च्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये ई-स्पोर्टची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितिने याच महिन्यात जागतिक ईस्पोर्ट् स्पर्धेची घोषणा केली आहे. ही स्पर्धा आलिंपिक व्हर्च्युअल सिरीज या नावाने ओळखली जाईल.

भारत सरकारने इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या सहकार्याने  डिजिटल गेम विकास, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम आयआयटी मुंबई येथे सुरु करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मार्च महिन्यातच केली. त्याची तयारी सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात, अभ्यासक्रमांची यादीच्या घोषणेकडे इच्छुक विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायला हवे. भारतीय संस्कृतिशी सुसंगत आणि येथील कथा आणि त्यावर आधारित डिजिटल खेळांच्या निर्मितीस प्राधान्य देण्याचे मंत्रीमहोदयांनी अधोरेखित केले आहे. (राजी-ॲन ॲनसिएन्ट एपिक, फाऊ-जी या सारख्या भारतीय डिजिटल गेम्सना जगातील अनेक देशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.)

संस्था आणि अभ्यासक्रम

(1) लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- या संस्थेत बॅचलर ऑफ डिझाइन इन गेमिंग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही ज्ञान शाखेतील 12 वी मध्ये इंग्रजीसह 50 टक्के गुण मिळणे आवश्यक. या अभ्यासक्रमात रेखांकन आणि चित्रकला, डिझाइनच्या मूलभूत बाबी आणि तत्वे, पर्यावरणाचा अभ्यास, संवाद कौशल्ये, दृष्यात्मक अभिकल्प प्रकल्प, दृष्यात्मक कथन विकास, डिजिटल आर्ट, मल्टिमीडिया, कॉमिक्स स्ट्रिप आणि कथानक, थ्रीडी चरित्र डिझाइन, थ्रीडी पर्यावरणीय डिझाइन, गेम तंत्र आणि कोडिंग, गेम व्हिज्युअल इफेक्ट,  गेमसाठी आवश्यक कथन कौशल्य, ॲनिमेशन, थ्रीडी  दृष्यात्मकता, संकल्पनात्मक डिझाइन, ग्रॅफिक्स, गेम आर्ट, गेम डिझायनिंग, प्ले गेमिंग या विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. संस्थेने बी.एस्सी इन गेमिंग हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमही सुरु केला आहे.

संपर्क– लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंदर-दिल्ली ग्रँट रोड, फगवारा, पंजाब- १४४४११, दूरध्वनी – ०१८२४-५०६१००, ईमेल-admissions@lup.co.in, संकेतस्थळ-lup.in

(2) अंजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी- या संस्थेत बी.एस्सी इन गेमिंग हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी – तीन वर्षे.अर्हता- 50 टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील 12 वी उत्तीर्ण.

संपर्क- अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, चारोळी बुद्रुक व्दारा लोहगाव, पुणे- ४१२१०५, दूरध्वनी-७७५६८६९०४६, संकेतस्थळ-www.adypu.edu.in

() व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल संस्थेच्या स्कूल ऑफ ॲनिमेशन ॲण्ड गेम डिझाइनमार्फत बी.ए इन गेम डिझाइन, हा चार वर्षे, कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी.

या अभ्यासक्रमात ॲनिमेशन, कॉमिक्स आणि गेम्सचा इतिहास, दृष्ये आणि साहित्य, दृष्यात्मक कथन, रंगांची कला, ॲनिमेशनसाठी संहिता लेखन, भूमिका/चरित्रांची निर्मिती/डिझाइन, गेम डिझाइन, पाश्चिमात्य कला, कला आणि सौंदर्य, कथेचे काल्पनिक जग, गेम डिझाइन स्टुडिओ, अभिजात भारतीय कला, प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत बाबी, जॅपनीज आणि चायनीज कला, स्थिर छायाचित्रण, डिजिटल आर्ट, व्हीडिओ गेम्समधील नैतिकता, भारतीय लोककला, विपणन (मार्केटिंग) आणि प्रचार, पर्यायी तंत्र आणि माध्यमे, २० व्या शतकातील आणि समकालिन जागतिक कला, उद्योजकता, सांस्कृतिक अभ्यास, व्हीडिओ गेम निर्मिती, गेम‍ डिझाइन स्टुडिओ, कोडिंग व्हीडिओ गेम्स, २० वे शतक आणि समकालीन भारतीय कला, संशोधनाची तोंडओखळ, गेमिंगमधील व्यवसाय, सुपर हिरो, या सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळण्यासोबतच त्यांना स्वतंत्ररीत्या कार्यरत होता व्हावे, यादृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. याच स्कूलमध्ये बी.ए इन ॲनिमेशन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमही करता येतो.

संपर्क- फिल्मसिटी, गोरेगाव (पश्चिम) मुंबई-४०००६५, दूरध्वनी- ०२२-६२७१६१७५, टेलेफॅक्स- ६२७१६०७०, ई-मेल-admissions@whistlingwoods.net, संकेतस्थळ- whistlingwoods.net

) माया ॲकॅडमी ऑफ ॲडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (एमएएसी) अभ्यासक्रम- प्रोग्रॅम इन गेम डिझाइन आणि इंटिग्रेशन (डीजीडीआय) आणि ॲडव्हास्न्ड प्रोग्रॅम इन इंटरॲक्टिव्ह डिझाइन ॲण्ड गेम्स. या अभ्यासक्रमांमध्ये गेम आर्ट, डिझाइन आणि इंटिग्रेशन गेम ॲसेट्स , बेसिक ऑफ आर्ट, गेम थिअरी, गेम डेव्हलपमेंट, गेम कंसेप्ट आर्ट, कंसेप्ट डिझाइन, इंट्रॉडक्शन टू थ्री डी, पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट, एन्व्हरॉन्मेन्टल मॉडेलिंग, इंट्रॉडक्शन टू गेम इंजिन, स्टायलाइज्ड कॅरेक्टर मॉडेलिंग, या विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. अर्हता– कोणत्याही विषयातील १२ वी.

संपर्क- २३,  शाह इंडस्ट्रिअल इस्टेट वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, दूरध्वनी-०२२-४०८२११११,संपर्क- http://www.maacindia.com/

() इमेज कॉलेज ऑफ आर्ट, ॲनिमेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी (डिझाइन ॲण्ड मीडिया कॉलेज) पदवीस्तरीय अभ्यासक्रम () गेम प्रोग्रॅमिंग– हा अभ्यासक्रम केल्यावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रोग्रॅमर, गेम प्रोग्रॅमर, गेम इंजिन प्रोग्रॅमर, स्पेशल इफेक्ट्स प्रोग्रॅमर, ॲप्स डेव्हलपर, मोबाइल/वेब गेम डेव्हलपर, ग्रॅफिक्स प्रोग्रॅमर, नेटवर्क प्रोग्रॅमर लेव्हल डिझायनर, अशा करिअर संधी मिळू शकतात. () गेम आर्ट आणि डिझाइन– हा अभ्यासक्रम केल्यावर डिजिटल खेळ निर्मितीचे कौशल्यप्राप्त होते. विविध डिजिटल खेळ विकसित करता येतात. कंसेप्ट आर्टिस्ट,थ्रीडी एनव्हीरॉन्मेंटल मॉडेलिंग,कॅरेक्टर डिझायनर, व्हेइकल ॲण्ड वेपन्स मॉडेलिंग,बॅकग्राऊड डिझायनर,गेम डिझायनर, लेव्हल डिझानर,यूआय डिझायनर, थ्रीडी कॅरेक्टर मॉडलेर, गेम टेस्टर, थ्रीडी पॉप्स मॉडेलिंग आणि ॲनिमेटर अशा संधी मिळू शकतात. () गेम डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट – हा अभ्यासक्रम केल्यावर कंसेप्ट आर्टिस्ट, एनव्हीरॉन्मेंट आर्टिस्ट, गेम डिझायनर, इफेक्ट्स ॲनिमेटर, कॅरेक्टर ॲनिमेटर, थ्रीडी गेम आर्टिस्ट, लेव्हल डिझायनर, गेम प्ले प्रोग्रॅमर, टूल डेव्हलपर अशा संधी मिळतात. गेमिंग कला, डिझाइन आणि गेमची निर्मिती या तीन विषय घटकांचा या  अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

() युझर इंटरफेस डिझाइन आणि डेव्हलपमेंट– हा अभ्यासक्रम केल्यावर युझर इंटरफेस डिझायनर, इंटरॲक्शन डिझायनर, युझर इंटरफेस डेव्हलपर, इन्फॉर्मेशन आर्किटेक्ट, यूक्स इंजिनीअर, टेस्टर, फ्रंट एंड/बॅक एंड डेव्हलपर, वेब/मोबाइल ॲप डेव्हलपमेंट, ग्रॅफिक डिझायनिंग आदी क्षेत्रांमध्ये करिअर संधी मिळू शकतात. () गेम प्रोग्रॅमिंग- कालावधी- चार वर्षे,अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. () एम.एस्सी इन गेम टेक्नॉलॉजी– कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम केल्यावर कंसेप्ट आर्टिस्ट, एनव्हीरॉन्मेंट आर्टिस्ट, गेम डिझायनर, गेम डेव्हलपर, गेम प्रोग्रॅमर, इफेक्ट ॲनिमेटर,कॅरेक्टर ॲनिमेटर, लेव्हल डिझायनर, गेम आर्टिस्ट, गेम प्ले प्रोग्रॅमर अशा संधी मिळू शकतात.

या संस्थेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये गेम डिझाइन, गेम डेव्हलपमेंट, यूआय डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.

संपर्क-  () ४२४ बोमनहल्ली, हौसर मेन रोड, बेंगळुरु, ५६००६८, दूरध्वनी- ०८०-४११०७७५५, संकेतस्थळ – www.icat.ac.in, () एल. बी.नगर, आर आर, डिस्ट्रिक्ट हैदराबाद – ५०००७४, दूरध्वनी-०४०-४२२१७७५