(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

सायबर सुरक्षा

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कोणत्याही देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची संधी कोणत्याही व्यक्ती /संघटना वा राष्ट्रांना मिळू शकते. यामुळे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचू शकतो. डिजिटल तंत्रज्ञान आधारित  अनेक संस्थांना अकल्पित असे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच यापुढे प्रत्येक राष्ट्राला सायबर तज्ज्ञाची मोठी गरज भासणार आहे.

नॅसकॉम या संस्थेच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत ३५ बिलियन डॉलर्सपर्यंत या क्षेत्राची वाढ होऊ शकते. त्यामुळे काही लाख विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. २०२२ पर्यंत सायबर सुरक्षा तज्ज्ञांच मागणी आणि पुरवठ्यामध्ये १.८ मिलियन मनुष्यबळाचा फरक पडू शकतो, असे भाकित आयआयटी कानपूरच्या, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी या विभागातील प्राध्यापक डॉ. संदीप शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. डेटा  सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गेल्या वर्षी विविध भारतीय उद्योग/व्यवसायांमध्ये, त्याच्या मागील वर्षापेक्षा, सायबर हल्ल्याच्या घटनेत ११७ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा थेट परिणाम सायबर  सिक्युरिटी व्यावसायिकांच्या मागणीमध्ये दिसू आला. डिजिटल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ ८५ टक्क्यांच्या आसपास कंपन्या/व्यावसायिक /उद्योजक यांच्याकडे नसल्याचे दिसून आले.

करोना काळात सायबर सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. घरातून काम या कार्यशैलिमुळे डेटाचे चलनवलन हे सुरक्षितरत्या होण गरजेचे होते. त्यासाठी सायबर सुरक्षेचे महत्व अत्याधिक असल्याचे कंपन्यांच्या लक्षात आले. यापुढील काळातही करोना साथीच्या दुसया किंवा तिसया लाटेमुळे घरातून वा कुठुनही काम करण्याची शैली अंगिकारली जाईल. त्यामुळे आत सायबर हल्ल्याव्दारे डेटा पळवून नेणे किंवा डेट्यामध्ये खोडसाळ करणे याबाबी टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी लागेल. सायबर हल्ला झाल्यानंतर धावाधाव करण्याएैवेजी आधीच तटबंदी सुरक्षित करण्याकडे कंपन्यांचा कल वाढत आहे. त्या अनुषंगाने अधिक प्रगत (ॲडव्हान्स्ड) कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची गरजही वाढणार आहे.

ही बाब लक्षात घेऊन  काही महत्वाच्या संस्थांनी  सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

() आयआयटी जोधपूरसायबर सुरक्षा क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या इस्त्राल देशातील सायबिंट आणि व्हिजहॅक टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थांच्या सहकार्याने ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट बूटकॅम्प इन सायबर डिफेन्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम आयआयटीचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि इस्त्रायल मधील सायबर तज्ज्ञ शिकवतात. कालावधी ६ महिने/ ४८० तास, त्यानंतर इस्त्रालयच्या प्रयोगशाळांमध्ये सायबर हल्ले आणि त्यापासूनची संरक्षण यंत्रणा याविषयी साधारणत: एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रमातील ५० टक्के प्रशिक्षण हे व्यक्तिगत (पर्सनलाज्ड) क्लाऊड आधारित लाव्ह (‍थेट) प्रयोगशाळत करण्याची सुविधा आहे.

सायबर  सिक्युरिटीमध्ये तज्ज्ञता मिळवण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरांना हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळावे यासाठी संस्थेमार्फत साहाय्य केले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर सायबर  सिक्युरिटी ॲनॅलिस्ट म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना ड्युएल (दुहेरी) प्रमाणपत्र दिले जाते. एक प्रमाणपत्र आयआयटी कडून आणि दुसरे प्रमाणपत्र सायबिंट कडून दिले जाते. सायबिंट संस्थेने अमेरिकेतील एनआयएसटीएनआयसीई या संस्थेसोबत सहकार्य केले आहे. दोन महत्वाच्या संस्थांनी दिलेल्या दुहेरी प्रमणपत्रामुळे विद्थ्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळणे सुलभ जाते. आयआयटी जोधपूरच्या सहकार्याने विकसित झालेली व्हिजहॅक ही संस्था सायबर सुरक्षिततेसाठी आवश्यक उपकरणे व तंत्र विकसित करते,त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देते. सायबिंट ही कंपनी जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेमधील रोजगार मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवते.

संपर्क संकेतस्थळईमेल-iitj@whizback.com, संपर्कध्वनी-८४४७२२३२४९

 () आयआयटी कानपूर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या संस्थेने, सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात, एम.टेक, एम.एस बाय रिसर्च आणि बीटी एमटी (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी- मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) डयुएल डिग्री हे तीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

यंदा पासूनच हे नवे अभ्यासक्रम सुरु हेात असल्याने त्यात मर्यादित स्वरुपात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. भविष्यात याचा विस्तार केला जाईल. एम.टेक आणि एम.एस रिसर्च अभ्यासक्रमास गेट परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जाईल. बीटी एमटी अभ्यासक्रमास मात्र कानपूर आयआयटीमधील काम्पुटर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल.

करिअर संधी- एम.टेक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात व्हल्नेराबिलिटी असेसमेंट अण्ड पेनिट्रेशन टेस्टिंग इंजिनीअर, सिक्युरिटी सेंटर ॲनॅलिस्ट, कॉम्प्युटर इर्मजन्सी रिस्पास टिम इंजिनीअर, सायबर  सिक्युरिटी टूल डेव्हलपर्स, वेपन्स ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आदी भूमिका समर्थपणे पार पाडता यावा यासाठीचे कौशल्य प्रदान केले जाते. इंडियन नेव्ही, डिफेंस इंटेलिजन्स एजंसी, डिफेन्स सायबर एजन्सी येथे करिअर संधी मिळू शकतात. एम.एस बाय रिसर्च या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना, सायबर  सिक्युरिटी रिसर्चस या भूमिकेसाठी प्रशिक्षित केले जाईल. बीटीएमटी अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी सायबर सुरक्षातज्ज्ञ म्हणून विकसित होतील.

संपर्कआयआयटी, कानपूर, कल्यापूरकानपूर २०८०१६, दूरध्वनी ०५१२२५९०१५१, संकेतस्थळ-iitk.ac.in, ईमेल -doaa@iitk.ac.in

() आयआयटी मद्रासच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डिजिटल स्किल ॲकॅडमीने, सर्टिफाड सायबर वॉरिअर हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्राला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. तथापि त्यांच्याकडे संगणकीय तंत्रज्ञान आणि नेटवर्किंगचे ज्ञान असल्यास उत्तम.

संपर्क डिजिटल स्किल ॲकॅडमी आयआयटी मद्रास चेन्नई६०००३६, दूरध्वनी ०४४ २२५७४९१४, ईमेल-skills@imail.iitm.ac.in

() आयआयटी दिल्लीअभ्यासक्रम एमटेक इन सायबर सिक्युरिटी. हा आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत सिस्टिम सिक्युरिटी ॲण्ड सायबर फॉरेंसिक, क्रिप्टोग्रॅफी ॲण्ड क्रिप्टोअॅनॅलिसीस, एम्बेडेड सिस्टिम ॲण्ड हार्डवेअर  सिक्युरिटी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. प्रवेश गेट (ग्रॅज्यएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स) परीक्षेतील गुणांवर आधारित.

संपर्क सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सायबर सिस्टिम्स ॲण्ड इन्फॉर्मेशन ॲश्युरन्स, रुम नंबर टू, ३०६, भारती बिल्डिंग आयआयटी दिल्ली११००१६, दूरध्वनी ०११२६५९७३५१, संकेतस्थळ https://csia.iitd.ac.in

() इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन, टेक्नॉलॉजी, अलाहाबादअभ्यासक्रमएम. टेक इन सायबर लॉ ॲण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, कालावधी दोन वर्षे. संपर्क इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, झालवा, प्रयागराज, अलाहाबाद २११०१५, संकेतस्थळhttps://clis.iiita.ac.in

() नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, रुरकेलाया संस्थेने ९ महिने कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन सायबर सिक्युरिटी हा अभ्यासक्रम, सुरु केला आहे. यासाठी ऑनलान अभ्यासक्रमांच्या अध्ययनात आघाडी घेतलेल्या एज्युरेका या संस्थेच सहकार्य घेतले आहे. प्रवेशासाठी ऑनलान चाळणी परीक्षा व मुलाखत घेतली जाते. अर्हताबीसीए/ बीई/ बीटेक. या अभ्यासक्रमात ऑपरेटिंग सिस्टिम ॲण्ड नेटवर्क फंडामेंटल्स, क्रिप्टोग्रॅफी, इन्फ्रास्ट्रक्चर  सिक्युरिटी, ॲप्लिकेशन  सिक्युरिटी, बेसिक्स ऑफ इथिकल हॅकिंग, डिव्हास हॅकिंग, वेब ॲप्लिकेशन हँकिंग, एंटरप्रा सिक्युरिटी आर्किटेक्चर, डिजिटल फॉरेंसिक या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. संपर्क संकेतस्थळ-www.edureka.co, ईमेल cybersecurity.pgp@edureka.co दूरध्वनी०८०४०४२३८०५

() बॉम्बे स्टॉक एक्स्जेंच एज्युकेशन लिमिटेड या संस्थेने एक वर्षं कालावधीचा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर  सिक्युरिटी अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता ५० टक्के गुणांसह बीसीए, एमसीए, बीई/ बीटेक.

काय शिकाल?

 फंडामेंटल्‍स ऑफ कॉम्प्युटर  सिक्युरिटी, नेटवर्क बेसिक्स ॲण्ड नेटवर्क  सिक्युरिटी, वेब ॲप्लिकेशन  सिक्युरिटी, ॲप्लिकेशन ॲटॅक, नेटवर्क ॲटॅक, क्रिप्टोग्रॅफी, क्लाऊड  सिक्युरिटी, सायबर  सिक्युरिटी ॲण्ड थिकल हॅकिंग, सायबर  सिक्युरिटी ॲनॅलिसीस ॲण्ड काउंटर मेझर्स, ॲडव्हान्स्ड  सिक्युरिटी मेझर्स, मोबाइल  सिक्युरिटी, इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, इंटरनेट ऑफ थिंग्ज  सिक्युरिटी, व्हलनेरॅबिलिटी ॲण्ड ॲटक्स, पेनिट्रेटिंग टेक्निक्स, डेटा ॲक्विजेशन्स ॲण्ड फॉरेंसिक, सायबर क्राम इव्हेंस्टिगेशन, इन्फॉर्मेशन  सिक्युरिटी कंप्लायन्स मॅनेजमेंट या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. संस्थेमार्फत प्लेसमेंटसाठी साहाय्य केले जाते.

संपर्क बीएसई लिमिटेड, १८ व १९ माळा, पी.जे.टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई४००००१, ईमेलadmissions@bseindia.com, टोल फ्री संपर्क क्रमांक १८००२२९०३०

संकेतस्थळ-bseindia.com

००००