एनआयटी : वेगळे अभ्यासक्रम
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी या संस्था तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसाठी ख्यातकीर्त आहेत. मात्रयातील काही संस्थांनीविज्ञान शाखेतील इंटिग्रेटड पदवी, विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी, मानव्यशास्त्रातीलपदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विज्ञान/ तंत्रज्ञान/ अभियांत्रिकी विषयात संशोधन (पीएचडी) सोबत मानव्य शास्त्रातील विषयांमध्येही संशोधनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. काहीएनआयटींनी एमबीए अभ्यासक्रमही सुरु केलेआहेत.
या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विषय घटकानुसार जेईई – मेन, जाँईट ॲडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स, गेट–ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स या परीक्षांमधील गुण ग्राह्य धरलेजातात. काहीअभ्यासक्रमांना संस्थांच्या परीक्षा व मुलाखतीव्दारेप्रवेश दिला जातो.
या संस्थांमध्ये तंत्रज्ञान व अभियांत्रिकीसाठीअसलेल्या पायाभूत सुविधा, प्राध्यापक, उत्कृष्ट ग्रंथालये, शिष्यवृत्ती, प्लेसमेंट, वसतिगृह, आर्थिक साहाय्य, अत्याधुनिकयंत्रसामग्री व उपकरणांसहसुसज्ज अशा प्रयोगशाळा आणि एनआयटी ब्रँडचा लाभ हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो.अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांशिवाय इतर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विचार करताना या वेगळ्या पर्यांयाकडे लक्ष द्यायला हवे.
(१) एनआयटी तिरुचिरापल्ली
या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्स, मार्फतएम.ए. इन इंग्लिश लँग्वेज ॲण्ड लिटरीचर हा अभ्यासक्रम चालवला जातो. भाषाआणि साहित्य यांचा समन्वय साधणारा हा एक महत्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. विद्यार्थ्यांमध्येवेगवेगळया सर्जनशील कौशल्य निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. अर्हता – इंग्रजी विषयातीलपदवी. याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते.
या संस्थेने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रया विषयांमध्ये प्रत्येकी दोन वर्षे कालावधीच्या, एम.एस्सीअभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अर्हता– संबंधित विषयातील पदवी प्राप्त उमेदवारास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
संपर्क– एनआयटी, तिरुचिरापल्ली – ६२००१५, टेलेफॅक्स– ०४३१–२५००१३३, संकेतस्थळ-https://www.nitt.edu
(२) एनआयटी रुरकेला
या संस्थेतील मानव्यशास्त्र विभागाने, एम.ए इन डेव्हलपमेंट स्टडीज, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी दोन वर्षे. याशिवाय इंग्रजी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये पीएचडी करण्याची सुविधासुध्दा या संस्थेत आहे.
या संस्थेत १२ वी विज्ञानशाखेतील विद्यार्थी पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन लाइफ सायन्स हा अभ्यासक्रम करु शकतात. लाइफ सायन्स किंवा जैविक विज्ञानशाखेत सूक्ष्मजीवजंतू, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात येते. याच अनुषंगाने जैव–वैद्यकीय तंत्रज्ञान, जैव–माहितीशास्त्र, जैव–भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, प्रतिकारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रेणीव जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र, जैव–रसायनशास्त्र, अनुवंषशास्त्र आदी विषयघटकांतील प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमाला जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन)- मेनमधील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
या संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी इन फिजिक्स हा अभ्यासक्रमही करता येतो. जेईई मेन परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.
पदव्युत्तर पदवी
दोन वर्षे कालावधीचे एम.एस्सी अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतात. (१) फिजिक्स, (२) केमिस्ट्रिी, (३) जिऑलॉजी, (४) ॲटमोस्फेरिक सायन्स. अर्हता– संबंधित विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांना जाँईट ॲडमिशन फॉर मास्टर्स, या परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.
संपर्क– एनआयटी– रुरकेला, ओडिशा ७६९००८, संकेतस्थळ– https://www.nitrkl.ac.in, दूरध्वनी–०६६१–२४६२६९०
(३) एनआयटीसुरतकल
या संस्थेत, एम.एस्सी इन केमिस्ट्री हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क– एनएच ६६, श्रीनिवासनगर, सुरतकल, मेंगलोर– ५७५०२५, दूरध्वनी–८२४–२४७४०००, ईमेल-registrar@nitk.ac.in, संकेतस्थळ– nitk.ac.in
(३) एनआयटीसुरत
या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समार्फत इंटिग्रेटेड एम.एस्सीइन फिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री मार्फतइंटिग्रेटेड एम.एस्सीइन केमिस्ट्री हे अभ्यासक्रम चालवले जातात. कालावधी- प्रत्येकी पाच वर्षे. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयासह १२वी विज्ञानशाखेची परीक्षा उत्तीर्ण
संपर्क– सरदार वल्लभभाई इंजिनीअरिंग कॉलेज रोड, अथवालाईन्स, अथवा, सुरत, गुजरात–३९५००७, संकेतस्थळ– https://www.svnit.ac.in
(३) एनआयटीअगरताळा
या संस्थेमध्ये, बी.एस–एम.एस (बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स) ड्युएल डिग्री इन फिजिक्स आणि केमिस्ट्री हे अभ्यासक्रम करतायेतात. कालावधी प्रत्येकी पाच वर्षे. अर्हता– १२ वी विज्ञान शाखा. पदव्युत्तरपदवी अभ्यासक्रमांमध्ये, एम.एस्सीइन फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांचा समावेश आहे. कालावधीप्रत्येकी दोन वर्षे. अर्हता– संबधित विषयातील पदवी. प्रवेशासाठीजाँईट ॲडमिशन फॉर मास्टर्स या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क– एयनआयटी अगतराळा, बरजाला, जिरानिया, त्रिपुरा– ७९९०४६, संकेतस्थळ– https://www.nita.ac.in. दूरध्वनी–०३८१–२५४८५३७
(४) एनआयटीपाटना
या संस्थेने इंटिग्रेटेड एम.एस्सीइन (१) फिजिक्स आणि (२) केमिस्ट्रीहे अभ्यासक्रमसुरु केले आहेत. अर्हता– रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
संपर्क– एनआयटीपाटणा, अशोकराजपथ महेंद्रू, पाटणा–८००००५, दूरध्वनी – ०६१२–२३७१७१५
(६) एनआयटी दुर्गापूर
या संस्थेने इंटिग्रेटेड एम.एस्सी इन केमिस्ट्री, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी– पाच वर्षे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये एम.एस्सी इन केमिस्ट्री या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. कालावधी– दोन वर्षे.
याच संस्थेने मास्टर ऑफ सोशल वर्क हा अभ्यासक्रम सुध्दा सुरु केला आहे. अर्हता–कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी.
संपर्क– एनआयटी दुर्गापर, दूरध्वनी– ०३४३–२५४५२९०, ईमेल– registrar@admin.nitdgp.ac.in, संकेतस्थळ– nitdgp.ac.in
(७) एनआयटीसिलचर
या संस्थेत एम.एस्सीइन ॲप्लाइड केमिस्ट्रीआणि एम.एस्सीइन फिजिक्स, हेप्रत्येकी दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क– डायरेक्टर, एनआयटी, सिलचर, काचर, आसाम– ७८८०१०, दूरध्वनी–०३८४२–२४२२७३, ईमेल– director@nits.ac.in , संकेतस्थळ– nits.ac.in
(८) एनआयटीजयपूर
या संस्थेत एम.एस्सीइन फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये करता येते. कालावधी– प्रत्येकी दोन वर्षे.
संपर्क– एनआयटीजयपूर, ईमेल-pg.acad@mnit.ac.in, संकेतस्थळ– mnit.ac.in, दूरध्वनी– ०१४१–२७१५०४६
(९) एनआयटीरायपूर
या संस्थेनेदोन वर्षे कालावधीचे एम.एस्सी इन फिजिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.
संपर्क– एनआयटीरायपूर, जीईरोड रायपूर–४९२०१०, दूरध्वनी– ०७७१–२२५४२००, ईमेल– director@nitrr.ac.in, संकेतस्थळ–nitrr.ac.in
(१०) एनआयटीजमशेदपूर
या संस्थेने फिजिक्स आणिकेमिस्ट्री या विषयांमध्ये प्रत्येकी दोन वर्षे कालावधीचे, एम.एस्सीअभ्यासक्रम सुरु केले आहेत.
संपर्क– एनआयटीजमशेदपूर, दूरध्वनी–०६५७–२३७३४०७, ईमेल-director@nitjsr.ac.in, संकेतस्थळ– nitjsr.ac.in
००००
एमबीए अभ्यासक्रम.
एनआयटी मेंगलोर, एनआयटीरुरकेला, एनआयटी अलाहाबाद, एनआयटीअगरताळा, एनआयटीतिरुचिरापल्ली, एनआयटी वरंगल, एनआयटीदुर्गापूर, एनआयटीसिलचर, एनआयटीजयपूर, एनआयटीजालंदर यांच्या अंतर्गत डिपार्टमेंटऑफ मॅनेजमेंट किंवास्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. सध्याच्याकाळात औद्योगिक जगतासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापकीय तंत्र, कौशल्यआणि सुयोग्य अशा ॲटिट्यूडच्या व्यवस्थापकांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने एमबीए अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे.
अर्हता- याअभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारकांना प्रवेश मिळू शकतो. तथापि त्याने व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या, कॅट– कॉमन ॲडमिशन टेस्ट/ मॅट– मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट/ सीमॅट– कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट/ जीमॅट– ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट यापैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतचांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येकएनआयटी,एमबीए प्रवेशाची प्रकिया स्वतंत्रपणे राबवत असते. प्रारंभिक निवडयादी साठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागांनुसार विशिष्ट प्रमाणात/संख्येत मुलाखत आणि समूहचर्चेसाठी उमेदवारांना बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. या संस्थांमधील प्लेसमेंट सेलमार्फत करिअर संधी मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. एनआयटी ब्रँडचा प्लेसमेंटच्या वेळी उपयोग होऊ शकतो. सर्व संस्थांमध्ये भारतसरकारच्या राखीव जागांचे निकष पाळले जातात.
सुरेश वांदिले
