कृषी शिक्षणाचा राष्ट्रीय मार्ग
देशस्तरावरील महत्वाची कृषी विद्यापीठे, कृषी संस्था, डीम्ड युनिव्हर्सिटी, या केंद्रीय विद्यापीठांमधील कृषी विभागातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम प्रवेशासाठी, इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर-ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲग्रिक्चरल (आयसीएआर- एआयईईए) ही परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेव्दारे पुढील संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. (अ) चार आयसीएआर- डीम्ड युनिव्हर्सिटी – (१) इंडियन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी- दिल्ली, (२) नॅशनल डेअरी इंस्टिट्यूट कर्नाल, (३) इंडियन व्हेटरनर्री इंस्टिट्यूट- इज्जतनगर, (४) सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन- मुंबई, (ब) तीन केंद्रीय कृषी विद्यापीठे- (१) सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी (सीएयू)– इम्फाल, (२) डॉ.राजेंद्रप्रसाद सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (आरपीसीएयू) -समस्तीनगर, (३) राणी लक्ष्मीबाई सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (आरएलबी सीएयू) – झाशी, (क) चार केंद्रीय विद्यापीठातील कृषी विभाग- (१) फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर- बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) वाराणसी, (२) अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, (३) विश्वभारती विद्यापीठ-शांतिनिकेतन, (ड) आणि नागालँड विद्यापीठ-लुमामी. (४) देशातील मान्यताप्राप्त ७५ च्या आसपास कृषी महाविद्यालयातील १५ टक्के जागा या परीक्षेच्या गुणांवर आधारित भरल्या जातात.
राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती – कृषी (नॅशनल टॅलेंट स्कॉलरशीप) -आसीएआर-एईईए, ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व स्वत:चे राज्य सोडून इतर राज्यातील कृषी विद्यापीठे वा केंद्रीय कृषी विद्यापीठे, आयसीएआर- डीम्ड युनिव्हर्सिटी आणि केंद्रीय विद्यापीठांमधील कृषी विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू केली जाते. (उदाहरणार्थ- महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने पंजाबमधील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतल्यास त्याला ही शिष्यवृत्ती मिळते. पंजाबमधील विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतल्यासच त्याला शिष्यवृत्ती मिळू शकते.) या शिष्यवृत्ती अंतर्गत पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये आणि पदव्युत्तर पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याबरोबर लागू होते. तथापि त्याच्या नूतनीकरणासाठी दरवर्षी, विद्यापीठाने निर्धारित केलेली शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करणे आवश्यक ठरते.
अशी असते परीक्षा
परीक्षेचा कालावधी- अडीच तास, एकूण प्रश्न १५०, (प्रत्येक विषयासाठी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी), प्रत्येक अचुक उत्तरास ४ गुण, चुकलेल्या उत्तरासाठी -१ गुणाची कपात केली जाते. परीक्षेचा पेपर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असतो. या परीक्षेचा अभ्यासक्रम भारतीय कृषी अनुसंधान ही संस्था ठरवते. विद्यार्थ्यांना ज्या ज्ञानशाखेत प्रवेश घ्यावयाचा असेल त्यानुसार चाळणी परीक्षेसाठीचा घटक विषय निवडवावा लागतो.
अर्हता- १२ वी विज्ञान शाखेत सरासरीने (अ) ५० टक्के गुण- खुला संवर्ग, नॉन क्रिमी लेअर इतर मागास संवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास), (ब) ४० टक्के गुण-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर), दिव्यांग.(क) परीक्षेसाठी बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे ३१ ऑगस्ट रोजी वय किमान १६ वर्षे असावे.
अभ्यासक्रमनिहाय अर्हता- (१) बी.एस्सी (ऑनर्स) – कृषी-भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (२) बी.एस्सी (ऑनर्स)-उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/,(३) बी.एस्सी (ऑनर्स)-मत्स्यशास्त्र (फिशरी सायन्स) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र, (४) बी.एस्सी (ऑनर्स)– वानिकी (फॉरेस्ट्री) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र, (५) बी.एस्सी (ऑनर्स)– सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/, (६) बी.एस्सी -फूड न्युट्रिशन ॲण्ड डायटेटिक्स -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (७) बी.एस्सी (ऑनर्स)-सेरिकल्चर -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (८) बी.टेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ (९) बी.टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/
(१०) बी.टेक फूड टेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/
(११) बी.टेक इन बायोटेक्नॉलॉजी -भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र किंवा गणित भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र
सरावाची संधी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या चाळणी परीक्षेच्या सरावासाठी संगणकीय केंद्रे उपलब्ध करुन दिली आहेत. ही सराव परीक्षा पूर्णपणे मोफत आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडवताना, कोणतीही तांत्रिक अडचण जाऊ नये याचा सराव होण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते.जे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकत नाहीत त्यांच्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत देशभर दीड लाख ठिकाणी कॉमन सर्व्हिसेस सेंटरची उभारणी करण्यात येते. यासाठी संपर्क संकेतस्थळ-www.csc.gov.in. उमदेवारांना त्यांच्या घरानजिकच्या केंद्रावर सराव परीक्षा देता येणे शक्य व्हावे यादृष्टिने व्यवस्था करण्यात येते. केंद्रांची माहिती https://nta.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते.
परीक्षा केंद्रे
चाळणी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नासिक, पुणे.
काही महत्वाच्या संस्था
या परीक्षेव्दारे पुढील काही महत्वाच्या संस्थामधील कृषी व तत्सम पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. (१) राज्य कृषी/ पशुवैद्यकीय विद्यापीठ- आचार्य एन.जी.रंगा ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी-गुंटूर, दूरध्वनी-040-24015 122, (२) आनंद ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- गुजराथ, दूरध्वनी- 02692-261 310 , (३) आसाम ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- जोरहट, दूरध्वनी- 0376-2340 008, (४) बिधानचंद्र कृषी विश्वविद्यालय, पश्चिम बंगाल, दूरध्वनी- 033-25878 1630 (५)
बिहार आसाम ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- भागलपूर, दूरध्वनी- 06274-240239(६)
बिर्सा ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- कांके -रांची ,दूरध्वनी- 0651-2450 832, (७)
सी.एस.आझाद ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- कानपूर , दूरध्वनी- 0512-2533 704, (८)
डॉ. यशवंत सिंघ परमार, युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टिकल्चर ॲण्ड फॉरेस्ट्री- सोलन, हिमाचल प्रदेश , दूरध्वनी- 01792-252 219, (९)डॉ.वाय.एस.आर
हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी, ताडेपल्लीगुड्म-आंध्रप्रदेश, दूरध्वनी-08816- 284445, (१०)डॉ.डी.जी.पंत
युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, पंतनगर-झारखंड, दूरध्वनी-05944-233640, (११) जवाहरलाल नेहरु कृषी विश्वविद्यालय, अधरतल- जबलपूर
, दूरध्वनी- 0761-2481778, (१२) जगन्नाथ ॲग्रिकल्चर
युनिव्हर्सिटी, जुनागढ , दूरध्वनी-0285-2672 346, (१३)केरळ व्हेटरनरी ॲण्ड ॲनिमल सायन्स युनिव्हर्सिटी, पुकॉट वावनाड- केरळ –0487-2373644, (१४) महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड टेक्नॉलॉजी-उदयपूर, दूरध्वनी –0294-2471 302 (१५) नवसारी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी-गुजरात, दूरध्वनी – 02637-282 823, (१६)ओरिसा युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर-सिरीपूर, दूरध्वनी – 0674-2397424, (१७) पंजाब ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी-लुधियाना, दूरध्वनी – 0161-2400 955, (१८) स्वामी केशवानंद राजस्थान ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी-बिकानेर, दूरध्वनी –0151-2250025, (१९) तामीळनाडू फिशरीज युनिव्हर्सिटी, नागापट्टिनम, दूरध्वनी –04365-241444 (२०) तामीळनाडू व्हेटरनरी युनिव्हर्सिटी ॲण्ड ॲनिमल सायन्स फिशरीज युनिव्हर्सिटी-चेन्नई, दूरध्वनी-044-25551584,
(२१)युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल ॲण्ड हॉर्टिकल्चरल सायन्स- शिमोगा,दूरध्वनी-08182-270705, (२२)युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टिकल्चरल सायन्स-बागलकोट-कर्नाटक, दूरध्वनी-08354-201351, (२१) वेस्ट बेंगाल युनिव्हर्सिटी ऑफ ॲनिमल ॲण्ड फिशरी सायन्स- कोलकता, दूरध्वनी-033-2556 3123, (२२) एसकेएन ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी जोबनेर -राजस्थान, दूरध्वनी-01425-254022, (२३) ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी कोटा -राजस्थान, दूरध्वनी-0744-2321205, (२४) प्रो.जयशंकर, तेलंगाणा स्टेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी हैदराबाद, दूरध्वनी –
040-24015226 (२५) श्री कोंडा लक्ष्मण तेलंगाना स्टेट हॉर्टिकल्चरल युनिव्हर्सिटी हैदराबाद, दूरध्वनी – 040-2401 4301, (२६) युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस धारवाड, दूरध्वनी –0836-2747958, (२७) सरदार कृषीनगर दांतीवाडा ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- गुजरात, दूरध्वनी – 02748-278226, (२८) श्री वेंकटेश्वरा व्हेटरनरी युनिव्हर्सिटी- तिरुपती, दूरध्वनी – 08772-248894, (२९) अलाहाबाद स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर अलाहाबाद -, दूरध्वनी –0532-2684781, (३०) फॅकल्टी ऑफ फिशरीज , केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरिज ॲण्ड ओशन स्टडीज – कोची-केरळ, दूरध्वनी – 0484-2703782 (३१) राजमाता विजयाराजे सिंधिया, कृषी विश्वविद्यालय, ग्वाल्हेर, दूरध्वनी-0751-2970519
(३२) सरदार वल्लभभाई पटेल स्वामी केशवानंद राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल ॲण्ड टेक्नॉलॉजी – मोदीपूरम-मीरत, दूरध्वनी –0121-2888502,
संपर्क संकेतस्थळ-www.nta.ac.in किंवा www.icar.org.in
सुरेश वांदिले
