(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 जैविकशास्त्राचे महत्व 

करोना विषाणू प्रादुर्भावामुळे जैविकशास्त्रास महत्व आले आहे. या शास्त्राच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाही. वैद्यकीय शाखा वा तत्सम शाखांमध्ये प्रवेश मिळाला नाही तर मग नाईलाजाने या शाखेकडे वळले जाते. पण विद्यार्थ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता, या शाखेतील पदवी-पदव्युत्तर पदवी-संशोधन,अशा मार्गाचा विचार करायला हवा. या विषयात दर्जेदार संस्थांमधून अभ्यास केल्यास चांगल्या करिअर संधी मिळणे सहज सुलभ जाते.

जैविकशास्त्रात देशात सर्वोत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये भुनवेश्वर स्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (नायसर), आणि मुंबई स्थित सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स (सीइबीएस) या संस्थांचा उल्लेख करावा लागेल. या दोन्ही संस्था अणुउर्जा विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत. नायसर संस्थेचा अभ्यासक्रम होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूशी संलग्नित आहेत तर सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापठाशी संलिग्नित आहे. या दोन्ही ठिकाणी इंटिग्रेटेड एम.एस्सी इन बायॉलॉजिकल सायन्स हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करण्याची सुविध आहे.

नॅशनल एन्ट्रन्स फॉर स्क्रिनिंग टेस्ट (नेस्ट)

दोन्ही संस्थांमधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स फॉर स्क्रिनिंग टेस्ट (नेस्ट) ही परीक्षा घेतली जाते. या दोन्ही संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, संगणक केंद्रे, उत्कृष्ट ग्रंथालये आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधांगनी युक्त अशा वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.

पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक जीवशास्त्राच्या विविध शाखांचे ज्ञान-प्रज्ञान केले जाते. ते करताना आंतरज्ञानशाखीय शैक्षिणिक प्रणालीचे तत्व अंगिकारले जाते. विद्यार्थ्याला संशोधन प्रकल्पावर कार्य करावे लागते. अनुभवी प्राध्यापक आणि संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मूळ (ओरिजिनल) विषयावर संशोधन करण्याची संधी दिली जाते.

हा अभ्यासक्रम केल्यावर राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था, अध्यापन, जैविक उद्योगातील विकास आणि संशोधन क्षेत्रात करिअर संधी मिळतात. ही पदवी प्राप्त उमेदवार, पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेल पदवीचा अभ्यासक्रम करुन आपल्या ज्ञान आणि संशोधनाची क्षितिजे आणखी रुंदावू शकतात. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या थेट मुलाखतीसाठी प्राप्त ठरतात.

प्रवेशासाठी चुरस

     हा अभ्यासक्रम उच्च श्रेणिचा असल्याने त्याच्या प्रवेशासाठी चुरस असते. प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (नेस्ट) ही चाळणी परीक्षा द्यावी लागते. विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाच्या मूलभूत ज्ञानाच्या आकलनाची पातळी जोखणारी ही परीक्षा आहे. त्यामुळेच एनसीईआरटी/सीबीएसई किंवा राज्यशासनाच्या १२ वी बोर्डाचा विज्ञान विषयांचा समजून-उमजून अभ्यास करणे आवश्यक ठरते. विज्ञान विषयातील सर्व घटकांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी २० टक्के अभ्यासक्रम किंवा ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला तरी चालू शकेल पण अशा चाळणी परीक्षांसाठी मात्र संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करावीच लागेल. १२ वीमधील गुणांपेक्षा नेस्ट परीक्षेतील गुण महत्वाचे ठरतात.

दिशा शिष्यवृत्ती

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरवर्षी ६० हजार रुपयांची  दिशा ( डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी-इन्सेंटिव्ह स्किम फॉर होलिस्टिक सायन्स एज्युकेशन ॲण्ड ऑगमेंटेशन) शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय दरवर्षी उन्हाळी संशोधन प्रकल्पासाठी २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

प्रवेश मिळालेल्या पहिल्यावर्षीच ही शिष्यवृत्ती लागू होते. मात्र पुढील वर्षांमध्ये, संस्थेमार्फत निर्धारित परीक्षेतील गुणांकांचा दर्जा राखला नाही तर, त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेपासून बाद केले जाते. मात्र हा विद्यार्थी पुढील वर्षी निर्धारित गुणांकाच्या परिघात आल्यास त्याला पुन्हा शिष्यवृत्ती लागू केली जाते.

अर्हता आणि पात्रता

२०१९ आणि २०२० साली ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले विज्ञान शाखेतील विद्यार्थी नेस्ट परीक्षा देऊ शकतात. यंदा ही परीक्षा १४ जून २०२१ रोजी होणार आहे. या दोन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांना समजा चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नसेल तर त्यांनी पुढील तीन महिने, या परीक्षेचा अभ्यास करुन त्यात चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. यंदा १२वी विज्ञान शाखेत असणारे विद्यार्थीसुध्दा ही परीक्षा देऊ शकतात.  मात्र त्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट. खुला आणि इतर मागास वर्ग संवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचा जन्म १ ऑगस्ट २००१ रोजी किंवा त्यानंतर झाला असेल ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अनुसुचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट दिली जाते.

अशी असते परीक्षा

ही संगणकाधारित, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा आहे. पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या चार विषयांचे चार विभाग असतात. प्रत्येक विभागात ५० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला चार गुण दिले जातात. प्रत्येक विभागात काही चुकलेल्या उत्तरासाठी गुण कपात (निगेटिव्ह मार्किंग) केली जाते. काही प्रश्नांसाठी चारही पर्याय योग्य असतात. त्यामुळे तशी नोंद करावी लागते. एखाद्या पर्यायाची नोंद केली नाही तर ते उत्तर चूक समजले जाते.

या परीक्षेतील कोणतेही तीन विभाग सोडवता येतात. मात्र नेस्ट व्यवस्थापनाने चारही विभाग सोडवण्याची सूचना केली आहे. ज्या कोणत्या तीन विभागात सर्वोच्च गुण मिळतात, तेच अंतिम गुणांकनासाठी ग्राह्य धरले जातात. गणित , जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्रश्न हे ११वी आणि १२वीच्या एनसीईआरटी – ( नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग/सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या) अभ्यासक्रमांवर आधारित असतात.  महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक बोर्डाचा ११वी व १२वीचा अभ्यासक्रम साधारणत: असाच आहे.  ज्या विषय घटकांचा समावेश या अभ्यासक्रमात नसेल, त्याचा अभ्यास मात्र एनसीईआरटी/सीबीएसईच्या पुस्तकांतून करावा. विषय घटकांची यादी नेस्ट परीक्षेच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे. ती एकदा नजरेखालून घालणे योग्य ठरेल. www.nestexam.in या संकेतस्थळावर नेस्ट परीक्षेच्या प्रत्येक विषयाचे घटक बघता येतात.  

प्रत्येक विभागात प्रत्येकी दोन प्रश्न विज्ञान विषयाचे सर्वसामान्य आकलन तपासण्यासाठी विचारले जातात. त्यासाठी स्पेशलाईज्ड (विशेष) ज्ञान अपेक्षित नसल्याचे नेस्ट व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. हे प्रश्न नेस्ट परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित नसू शकतात. मात्र १० वी स्तरीय विज्ञान विषयावर आधारित ते राहू शकतात. परीक्षेचा पेपर इंग्रजी भाषेत असतो. कालावधी-साडेतीन तास. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-मुंबई,पुणे आणि नागपूर

संपर्क- () चिफ कुआर्डिनेटर,नेस्ट २०२१, एनआयएसईआर, भुवनेश्वर, पोस्ट ऑफिस, जतनी खुर्दा- ७५२०५०, ओडिशा, ईमेल- nest-exam@niser.ac.in () यूएएम-डीएई-सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स इमारतीच्या विरुध्द बाजूला, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३२१३२, ईमेल-info@cbs.ac.in, संकेतस्थळ- cbs.ac.in

विज्ञान शाखेतील पदवी

विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या महत्वाच्या संस्था. (या संस्थांनी राष्ट्रीय स्तरावर गेल्या अनेक वर्षात गुणवत्ता आणि दर्जा या बाबत स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. () हिंदू कॉलेज-दिल्ली,() मिरांडा हाऊस कॉलेज- दिल्ली, () सेंट स्टिफन्स कॉलेज- दिल्ली, () मद्रास ख्रिस्तियन कॉलेज- चेन्नई, () लॉयला कॉलेज (स्वायत्त) – चेन्नई, () हंसराज कॉलेज- दिल्ली, () दौलतराम कॉलेज- दिल्ली, () स्टेला मॅरिस (स्वायत्त) कॉलेज-चेन्नई, ()डिपार्टमेंट ऑफ सायंस, ख्रिस्त कॉलेज-बेंगळुरु, (१०) लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन – दिल्ली.

मुंबईतील संस्था- () मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स, () सोफिया कॉलेज फॉर वुमेन, ()के.सी.कॉलेज. () रुईया (स्वायत्त) कॉलेज, () एस.के.सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स ,कॉमर्स ॲण्ड सायन्स, () रामनारायण झुनझुनवाला कॉलेज.

पुण्यातील संस्था- () सेंट मिरा कॉलेज फॉर वुमेन, () इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स, () अबिदा इनामदार सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ,सायन्स ॲण्ड कॉमर्स. () एमआयटी कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स ॲण्ड सायन्स.

सुरेजैविकशास्त्राचे महत्व

सुरेश वांदिलेश वांदिले