(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण (2)

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)च्या सर्व कॅम्पसमधील प्रवेशास NEET (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) परीक्षेतील गुणांवर आधारित केला जातो. अर्हता- या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या आणि इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र सरासरिने किमान  60 टक्के गुण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरिने किमान 50 टक्के गुण आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरीने किमान  45 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

अशी असते परीक्षा

यंदा नीट परीक्षा 1 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाईल. या परीक्षेतील गुणांव्दारे 80  हजार विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. यामध्ये 50 हजारच्या आसपास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा आहेत. नीट परीक्षा, नॅशलन टेस्टिंग एजन्सीव्दारे घेतली जाते.

या परीक्षेचा पेपर तीन तासांचा असतो. या पेपरमधील रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा पेपर बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ (मल्टिपल ऑप्शन्स आणि ऑब्जेक्टिव्ह) असतो. या दोन्ही विषयात प्रत्येकी 45 प्रश्न विचारले जातात. एकूण गुण प्रत्येकी 180. जीवशास्त्रावर आधारित 90 प्रश्न विचारले जातात. ते वस्तुनिष्ठ पध्दतीचे असले तरी फक्त चार पर्याय दिले जातील. यापैकी एक अचुक किंवा सर्वाधिक योग्य पर्यायाची निवड करावी लागेल. एकूण गुण- 360. प्रत्येक योग्य किंवा सर्वात योग्य/पर्यायासाठी 4 गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी 0.1 गुण वजा केला जातो. या परीक्षेचा पेपर इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 11 पैकी कोणत्याही एका भाषेतून सोडवता येतो. त्यासाठी अर्ज भरताना पर्यायाची नोंद करावी लागते. एकदा भरलेला पर्याय पुन्हा बदलता येत नसल्याने पर्यायाची निवड अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी.

मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून हा पर्याय निवडायलाच हवा असे नाही. इंग्रजीमधून व्याख्या आणि संकल्पना यांचा अभ्यास करुनही ते आकलन किंवा समजण्यास सोपे, सुलभ आणि सहज जात नसेल तरच या पर्यायाचा विचार करायला हवा.

इंग्रजी माध्यमाचा पर्याय स्वीकारल्यास पेपर फक्त इंग्रजीभाषेतीलच दिला जातो. मराठी भाषेचा पर्याय दिलास इंग्रजी आणि मराठी यादोन्ही भाषेतील पेपर दिला जातो. भाषांतरात काही गफलत असेल किंवा उमेदवाराला काही संशय असल्यास त्याने इंग्रजी भाषेतील प्रश्न बघण्याची सूचना नाटाने केली आहे.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड नाशिक, नवी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे

शुल्क रचना

२०२० या वर्षात मध्ये सर्वात कमी शुल्क असलेली खाजगी वैद्यकीय महाविद्यालये-(शुल्काची रक्कम संपूर्ण अभ्यासक्रमाची आहे.), ()ख्रिस्तियन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल -वेल्लोर- २ लाख १७ हजार ८८० रुपये, ()डॉ.पिन्नामेनी सिध्दार्थ इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च फाउंडेशन-विजयवाडा- ४ लाख ८५ हजार रुपये, ()महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा- ५ लाख ८० हजार रुपये, () आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस, न्यू दिल्ली- १६ लाख २० हजार रुपये, ()दयानंद मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल लुधियाना, १९ लाख रुपये, () सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगळुरु- २६ लाख रुपये, ()एम.एस.रामय्या मेडिकल कॉलेज, बेंगळुरु- ३२ लाख रुपये, ()पीएसजी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च, काईम्बतूर- ३७ लाख रुपये, ()ख्रिस्तियन मेडिकल कॉलेज, लुधियाना- ४० लाख रुपये, (१०)कस्तुरबा मेडिकल कॉलेज- ५० लाख रुपये.

२०२० या वर्षात मध्ये सर्वात कमी शुल्क असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये-(शुल्काची रक्कम संपूर्ण अभ्यासक्रमाची आहे), ()आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे -शुल्क नाही. () ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली -१ हजार ६२८ रुपये, () ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जोधपूर-१ हजार ६२८ रुपये, () लेडी हार्वर्ड मेडिकल कॉलेज, न्यू दिल्ली-५ हजार रुपये,()युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस- ५ हजार  ३०० रुपये ,()मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, न्यू दिल्ली १९ हजार २६५ रुपये, ()जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च -पुडीचेरी- ३४ हजार ५०० रुपये, ()मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, कोलकता- ५४ हजार ५०० रुपये, ()जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ – ७३ हजार ९६५ रुपये, (१०)उस्मानिया मेडिकल कॉलेज- ७६हजार रुपये,

महाराष्ट्रातील एम्स

नागपूर येथील एम्सची स्थापना २०१४-१५ साली प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत करण्यात आली. परवडणाऱ्या आणि सुयोग्य अशा आरोग्यव्यवस्थेतील विभागीय असमतोल दूर करणे आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणास चालना देण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेपुढे ठेवण्यात आले आहे. अल्पावधित या संस्थेने दर्जेदार वैद्यकीय शिक्षण, उत्कृष्ट रुग्णसेवा आणि संशोधन यामध्ये ठसा उमटवला आहे. २०१८ साली संस्थेत ५० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला प्रवेश देण्यात आला. मिहान येथील विशेष आर्थिक झोनमध्ये राज्य सरकारने या संस्थेस १५० एकर जागा दिली आहे. या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय, अध्यापन/अध्ययन केंद्र व इतर सोईसुविधांची गतिने निर्मिती केली जात आहे.

आधुनिक वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन तयार केलेला एमबीबीएस अभ्यासक्रम या ठिकाणी करता येतो. विद्यार्थ्यांच्या चौफेर व्यक्तिमत्व (ज्ञान- कौशल्य-वृत्ती/दृष्टीकोन) विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जाते. त्याच्या व्यक्तिगत समस्या निर्धारणाकडेही लक्ष पुरवले जाते. वैद्यकीय संशोधनात जागतिक कीर्तिच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उद्ष्टि संस्थेने निर्धारित केले आहे. आरोग्य सुविधांबाबत नावीन्यपूर्ण सुविधा/सोई उपलब्ध करुन देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि उपकरणे/ संयत्रंणांची उपलब्धता करुन घेण्यावर संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे.

 

संपर्क- ऑल इंडिया इंस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, प्लॉट नंबर २, सेक्टर-१५, मिहान, नागपूर- ४४४१०८, ईमेल-infoaiimsnagpur@edu.in

000

महाराष्ट्रातील  महत्वाची महाविद्यालये-

(1), ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई,  (2)सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज ॲण्ड केईएम हॉस्पिटल, मुंबई, (3) लोकमान्य टिळक, महानगरपालिका मेडिकल कॉलेज ॲण्ड जनरल हॉस्पिटल – मुंबई, (4) बी.जे. मेडिकल कॉलेज ॲण्ड ससून  जनरल हॉस्पिटल- पुणे, (5) गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, नागपूर  (6) महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स-वर्धा, (5) इंदिरा गांधी गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल – नागपूर (ही यादी सर्वसाधरण स्वरुपाची आहे. वेगवेगळे सर्वेक्षण, विद्यार्थ्यांचा ओढा, अध्यापनाचा दर्जा, प्रयोगशाळेतील सोई-सुविधा, आदी बाबींचे घटक त्यासाठी लक्षात घेतले आहेत.)

शिष्यवृत्ती

ब्रिटिश कौन्सिल आणि न्यू कॅसल युनिर्व्हसिटीने दक्षिण आशियातील महिला विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. यामध्ये भारताचा समावेश आहे.या विद्यापीठातील एम.एस्सी इन () एन्हिरॉन्मेंट कंसलटन्सी, () हायड्रॉलॉजी ॲण्ड वाटर मॅनेजमेंट, () एन्हिरॉन्मेंट जिओसायन्स, () रिन्युएबल एनर्जी, एंटरप्राइज ॲण्ड मॅनेजमेंट या अभ्याक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी सप्टेबर २०२१ मध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्रात संबंधित विद्यार्थीनीस प्रवेश मिळणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्तीमध्ये संपूर्ण शिक्षण शुल्क, मासिक विद्यावेतन, परतीच्या प्रवासाचे विमानाचे तिकिट, अभ्यासक्रमासंदर्भातील इतर खर्च, आयलेट (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट) परीक्षेचे शुल्क, व्हिजा अर्जासाठी लागणारे शुल्क यांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती एक वर्षासाठी दिली जाते.

संपर्क- https://publichealthupdate.com/newcastle-university-and-the-british-council-climate-change-scholarship

०००