सर्वोत्कृष्ट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
मुंबई मध्ये असणारी इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिेशन ही दक्षिण पूर्व आशियातील या विषयातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५४ साली करण्यात आली. ही संस्था केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे.
हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग तंत्रज्ञान या विषयातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी ही पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था समजली जाते. दिल्लीच्या संस्थेनंतर या संस्थेमध्येच प्रवेश मिळावा अशी बहुतेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. या संस्थेतून १३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रशिक्षण घेतले असून, हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचले आहेत.
या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात.
(१) बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी. अभ्यासक्रमाचाकालावधी- तीन वर्षे. जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- हॉटेल मॅनेजमेंट,कॅटेरिंग टेक्नॉलॉजी)परीक्षेव्दारे अभ्यासक्रमाला गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ जुलै/ ऑगस्ट मध्ये होतो.
(२) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन – अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे. या अभ्यासक्रमास नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी यासंस्थेची संलग्नता प्राप्त आहे. अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी. कमाल वयोमर्यादा- खुला संवर्ग- २५ वर्षे. राखीव संवर्ग-२८ वर्षे. या अभ्यासक्रमाला संस्थेच्या पातळीवर प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानुसार प्रवेश निश्चिती केली जाते. शैक्षणिक शुल्क – ६० हजार रुपये.
(३) क्रॉफ्ट कोर्स – कुकरी– अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. हा अर्धवेळ अभ्यासक्रम आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. जुलै ते ऑक्टोबर पहिल्या तुकडीस आणि जानेवारी ते एप्रिल दुसरी तुकडीस प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम सोमवार ते शुक्रवार या कालावधित शिकवला जातो.
(४) क्रॉफ्ट कोर्स – बेकरी – अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. हा अर्धवेळ अभ्यासक्रम आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. जुलै ते ऑक्टोबर पहिल्या तुकडीस आणि जानेवारी ते एप्रिल दुसरी तुकडीस प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम सोमवार ते शुक्रवार या कालावधित शिकवला जातो.
(५) हुनर से रोजगार कार्यक्रम- या अंतर्गत फूड प्रॉडक्शन (खाद्य पदार्थ निर्मिती) या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पर्यटन मंत्रालयाने सुरु केला आहे. कालावधी- दोन महिने. अर्हता – आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे. दर दोन महिन्याला नव्या तुकडीस प्रवेश दिला जातो.
(६) हुनर से रोजगार कार्यक्रम– या अंतर्गत बेकरी या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पर्यटन मंत्रालयाने सुरु केला आहे. कालावधी- दोन महिने. अर्हता-आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे. दर दोन महिन्याला नव्या तुकडीस प्रवेश दिला जातो.
(७) हुनर से रोजगार कार्यक्रम – या अंतर्गत फूड ॲण्ड बिव्हरेजेस सर्व्हिस (अन्न आणि पेय सेवा) या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पर्यटन मंत्रालयाने सुरु केला आहे. कालावधी – सहा आठवडे. अर्हता – आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे. दर दोन महिन्याला नव्या तुकडीस प्रवेश दिला जातो.
(८) हुनर से रोजगार कार्यक्रम- या अंतर्गत हाऊसकीपिंग युटिलिटी, या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पर्यटन मंत्रालयाने सुरु केला आहे. कालावधी – सहा आठवडे. अर्हता – आठवी उत्तीर्ण. वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे. दर दोन महिन्याला नव्या तुकडीस प्रवेश दिला जातो.
संपर्क – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, व्ही.एस.मार्ग, दादर(पश्चिम),मुंबई–४०००२८, दूरध्वनी–०२२-२४४५७२४१ , ईमेल-info@ihmctan.edu, संकेतस्थळ – www.ihmctan.edu.
०००००
टॉप संस्था
हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये गेल्या काही वर्षात पुढील संस्थांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता कायम राखली आहे. त्यामुळे या संस्थांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा असतो. (१) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग न्युट्रिशन, पुसा – नवी दिल्ली,(२) वेलकम ग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन – मनीपाल, (३) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – मुंबई, (४) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन- हैदराबाद,(५) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन- चेन्नई, (६) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – लखनौ, (७) बनारसीदास चांदिवाला इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टटेक्नॉलॉजी- नवी दिल्ली. (८) डॉ.आंबेडकर इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग ॲण्ड न्युट्रिशन- चंदिगढ. (९) आर्मी इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – बेंगळुरु, (१०) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन- कोलकता, (११) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – भुवनेश्वर, (१२) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन-देहरादून, (१३) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन-देहरादून, (१४) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – गंगटोक, (१५) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी – थिरुवनंतपूरम, (१६) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग ॲण्ड न्युट्रिशन -सिमला, (१७) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग ॲण्ड न्युट्रिशन – गुरुदासपूर, (१८) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – हाजिपूर-बिहार,(१९) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन – भटिंडा, (२०) ॲमिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी – नॉयडा, (२१) स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी- नवी मुंबई, (२२)हिंदुस्थान कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायंस – कोईम्बतूर, (२३) युनिव्हर्सिटी इंस्टिट्यूट ऑफ टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट,चंदिगढ युनिव्हर्सिटी- मोहाली, (२४) कॅटेरिंग सायंस अॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट डिपार्टमेंट,बिशप अप्पासॅमी कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायंस कोईम्बतूर, (२५) श्री रामक्रिष्ण कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायंस-कोईम्बतूर, (२६) वेल्स इंस्टिट्यूट ऑफ सायंस टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲडव्हान्स्ड स्टडीज – चेन्नई,(२७) डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,ख्रिस्त युनिव्हर्सिटी -बेंगळुरु, (२८) बीएनजी टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इंस्टिट्यूट -कोलकता, (२९) फॅकल्टी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, आयसीएफएआय युनिव्हर्सिटी -सिक्कीम-गंगटोक
(३०) एसआरएम इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-चेन्नई, (३१) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ – पुणे, आयटीएम इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट – नवी मुंबई
०००
अशी मिळते संधी
(१) विमानसेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, (२) रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, (३) भारतीय नौसेना आतिथ्य सेवा, (४) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, (५) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रासाठी आवश्यक ग्राहकसेवा एक्झिक्युटिव्ह, (६) प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, (७) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या कार्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा , (८) हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रातील गेस्ट/कस्टमर रिलेशनशिप अधिकारी , (९) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूड चेनमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी किंवा एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या संस्थांमधील भोजनगृहे, (१०) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग महाविद्यालयातील अध्यापक, (११) रिसॉर्ट मॅनेजमेंट, (१३) स्वंयरोजगार, (१४)ॲकोमोडेशन मॅनेजर, (१५) कॅटेरिंग मॅनेजर, (१६) इव्हेंट मॅनेजर, (१७) फास्ट फूड रेस्टॉरेंट मॅनेजर, (१८) हॉटेल मॅनेजर, (१९) पब्लिक हाऊस मॅनेजर, (२०) रेस्टॉरेंट मॅनेजर.
सुरेश वांदिले