(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 पादत्राणे : निर्मिती ते विक्री 

पादत्राणे निर्मिती तंत्रज्ञान, चामडी वस्त्रप्रावरणे व आभूषण आणि वस्तुनिर्मिती या क्षेत्राची देशात व परदेशातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कौशल्यविकास अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात पुढील काही वर्षात रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या विपुल संधी मिळू शकतात.

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरणारी संस्था म्हणजे फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट.    भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेस स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे.

संस्थेने पादत्राणे उद्योगास आवश्यक असणारे तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. विविध चामडी वस्तू, वस्त्रप्रावरणे, हँड बॅग्ज, प्रवासी बॅग वा आधुनिक जीवनशैलीस लागणाऱ्या चामडी वस्तू यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करते. या  संस्थेला २०१७ साली इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला. पादत्राणे निर्मिती क्षेत्रात असा दर्जा मिळणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. पादत्राणे आणि चामडी वस्तुनिर्मिती करणाऱ्या जगातील काही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांची या संस्थेला अधिस्वीकृती दिली आहे.

पादत्राणे आणि चामडी वस्तुनिर्मितीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये या संस्थेचे विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही संस्था या उद्योगांच्या गरजा, आवश्यकता आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बदलते प्रवाह लक्षात घेऊन अभ्यासक्रमांचे सातत्याने नूतनीकरण करत असते.

गेल्या तीन दशकांपासून या संस्थेने पादत्राणे निर्मिती, डिझाइन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा सातत्याने पुरवठा केल्यानेच या क्षेत्रात भारत हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. चामड्यापासून बनवणाऱ्या वस्त्रप्रावरणांची जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाची निर्यात आपल्या देशातून होते. चामड्यापासून निर्मित वस्तुंच्या निर्यातीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो.

२० लक्ष कामगार सध्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. देशांतर्गत रोजगार निर्मिती करण्यात या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. २०२४ पर्यंत या क्षेत्रातील उलाढाल १५.५ मिलियन डॉलर्स होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पादत्राणे निर्मिती, चामड्यापासून बनणारी वस्त्रप्रावरणे आणि इतर वस्तुंच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या जागतिक पातळीवरील पहिल्या तीनमध्ये या संस्थेचा समावेश होतो. देशातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी चंदिगढ, पाटणा, हैदराबाद, गुना, अंकलेश्वर, चेन्नई, रोहतक, फुरसतगंज, छिंदवाडा, नॉयडा, कोलकता, जोधपूर या १२ शहरांमध्ये कॅम्पस सुरु करण्यात आले आहेत. या सर्व केंद्रांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट शिकवणी वर्ग, माहिती तत्रंज्ञानाच्या अद्ययावत सुविधा, सुसज्ज ग्रंथालये, आंतरराष्ट्रीय परीक्षण केंद्रे, वसतिगृहाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

पदवी अभ्यासक्रम-

  )बॅचलर ऑफ डिझाइन इन फूटवेअर डिझाइन आणि प्रॉडक्शन – हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग, डिझाइन, मॅन्युफॅक्चुरिंग, रिटेलिंग, मर्कंडायजिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळतात. यामध्ये फॅशन फोरकास्टर, डेव्हलपर, कॉम्प्युटर एडेड स्पेशॅलिस्ट, डिझाइन कंसलटंट, स्ट्रॅटेजी प्लॅनर, व्हिज्युअल मर्कंडायझर, डिझायनर यांचा समावेश आहे.

 ) बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर गुड्स ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन  – हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना डिझायनर, मर्कंडायजर आणि प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह अशा करिअर संधी मिळतात. या अभ्यासक्रतांर्गत डिझाइन प्रोसेस आणि मेथॉडॉलॉजी, फॅशन ट्रेंड्स, फोरकास्ट आणि ॲनालिसीस, डिझाइन कंसेप्च्युलायझेशन आणि रेंज बिल्डिंग, डिझाइन प्रॉडक्ट्स इन लेदर गुड्स, गार्मेंट्स आणि ॲक्सेसरी कलेक्शन डेव्हलपमेंट, लेदर गुड्स आणि गार्मेंट डिझाइन आणि  मॅन्युफॅक्चुरिंग टेक्निक , कॉम्प्युटर एडेड डिझाइन, बिझिनेस कम्युनिकेशन आणि प्रॉडक्शन डॉक्युमेंटेशन, प्रॉडक्ट फोटोग्रॅफी, क्लासरुम आणि इंडस्ट्रिअल डिझाइन प्रोजेक्ट आदी विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची संधी दिली जाते.

) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझायनिंग- हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यास पुढील करिअर संधी मिळतात – कंसलटंट, पर्सनल स्टायलिस्ट, टेक्निकल डिझायनर, ग्रॅफिक डिझायनर, फॅशन जर्न्यालिस्ट, फ्री लान्स डिझायनर, फॅशन मर्कंडायझर, व्हिज्युअल मर्कंडायजर, क्वालिटी कंट्रोलर, फॅशन कूऑर्डिनेटर

उपरोक्त तिनही अभ्यासक्रमाचा कालावधी- प्रत्येकी चार वर्षे

) बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन रिटेल ॲण्ड फॅशन मर्कंडाइज –

रिटेल आणि फॅशन वस्तू विक्री व्यवस्थापन या क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई, कोलकता, रोहतक, जोधपूर, फुरसतगंज, हैदराबाद, अंकलेश्वर ,पाटणा आणि चंदिगढ येथील कॅम्पसमध्ये शिकवला जातो.

काय शिकाल ?

 (1) सप्लाय चेन मॅनेजमेंट, (2) मॉल मॅनेजमेंट, (3) फ्रँचायजिंग, (4) इंटरनशनल रिटेलिंग, (5) स्टोअर डिझाइन, (6) व्हिज्युअल मर्कंडायजिंग, (7) फॅशन कम्युनिकेशन, (8) ट्रेंड रिसर्च,(9) बायिंग आणि मर्कंडायजिंग, (10) रिटेल ऑपरेशन, (11) प्रॉडक्ट कॉस्टिंग, (12) फॅशन ट्रेंड्स, (13) फॅशन फोरकास्टिंग, (14)इंट्रोडक्शन टू ॲपेरल्स, (15) फायबर टू फॅब्रिक, (16) एलिमेंटस ऑफ फॅशन, (17)मार्केटिंग मॅनेजमेंट, (18) हयुमन रिसोर्स मॅनेजमेंट (19) आंत्रप्रिन्युरशीप,

करिअर संधी- (1) रिटेल स्टोअर मर्कंडायजिंग किंवा डिस्प्ले डिपार्टमेंट, (2) व्हिज्युअल मर्कंडायजिंग आणि सप्लाय कंपनी, (3) रिटेल मर्कंडायजिंग,बायर्स, कॅटेगरी मॅनेजर, (4) रिटेल ऑपरेशन- एरिआ मॅनेजर, रिटेल मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर. (5) लक्झरी ब्रँड्स – स्टोअर मॅनेजर (6) ई-कॉमर्स- बिझिनेस मॅनेजर,कॅटेगरी मॅनेजर.

अर्हता- चारही पदवी अभ्यासक्रम- ()कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण. () अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेला १० वीनंतरचा ३ वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम, () नॅशनल ओपन स्कूलची परीक्षा. संबंधित विद्यार्थ्याने किमान ५ विषयांची परीक्षा दिलेली असावी.

प्रवेश प्रकिया    

अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट, घेतली जाते. या परीक्षेत पुढील चार भाग (सेक्शन)  असतात () संख्यात्मक कलचाचणी (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड )- प्रश्न-२५/ गुण-२५, () इंग्रजी भाषा चाचणी/व्हर्बल ॲबिलिटी (कॉम्प्रिहेन्शन १० प्रश्न/१० गुण आणि व्याक्रण- ३० प्रश्न/ ३० गुण)- एकूण प्रश्न-४०/ गुण- ४०,() सामान्य ज्ञान आणि चालू  घडामोडी (जनरल नॉलेज आणि करंट अफेअर) – प्रश्न- ३५ / गुण- ३५, () बिझिनेस ॲप्टिट्यूड टेस्ट प्रश्न – २५, गुण- ५० आणि डिझाइन ॲप्टिट्यूड  टेस्ट, प्रश्न-२५/ गुण- ५०. एकूण गुण – २००, कालावधी- तीन तास. निगेटिव्ह मार्किंग नाही.

   ही परीक्षा देशभरातील अनेक शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई येथील केंद्रांचा समावेश आहे. यंदा ही परीक्षा १९ जून २०२२ रोजी घेतली जाईल. या परीक्षेला अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२२

प्लेसमेंट

या संस्थेत पुढील कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात-   अदिदास, एप्रिल सोर्सिंग बायिंग हाऊस, अब्राहम ॲण्ड ठाकोर हाऊस, ॲक्शन, ॲपेरल ग्रुप-दुबई, एव्हिटी, बाटा इंडिया लिमिटेड, कार्लटन लंडन, क्लॅर्क्स, डा मिलॅनो, फरिदा ग्रुप, फ्युचर ग्रुप, गौरव गुप्ता, जेनेसिस लक्झरी, ग्लोबस, एच ॲण्ड एम, हाय डिझाइन, इनडिटेक्स, आयकॉनिक, इॅम्पल्स, इम्पॅक्टिवा, खादमीस, लॅण्ड मार्क, लिबर्टी, लाईफस्टाईल, ली ॲण्ड फंग, एम ॲण्ड बी, मदुरा गार्मेंटस, मार्कस ॲण्ड स्पेंसर्स, मॅक्स लाईफ स्टाईल, मिर्झा इंटरनॅशनल, प्युमा, राजेश प्रताप, रेसन्स, रिबॉक, रिलॅक्सो, रिलायन्स ब्रँड, रिलायंस रिटेल, सब्यासाची, समर्थ लाईफस्टाईल, सरोज इंटरनॅशनल, स्केचर्स, एसएसआयपीएल, स्नॅपडिल, स्ट्रट्टस, सुपर हाऊस, टँगेराईन डिझाइन, टाटा इंटरनॅशन, टॉमी हिल जेर, युनिक्वो, विशाल मेगा मार्ट, व्हीकेसी, वेस्टसाईड, विलहेम टेक्सटाईल, वूडलँड, झारा, पिडिलाईट.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

() मास्टर ऑफ डिझाइन इन फूटवेअर डिझाइन आणि प्रॉडक्शन- अर्हता-फूटवेअर/ लेदर गुड्स/ डिझाइन/ फॅशन/ फाइन आर्ट्स/ आर्किटेक्चर/ अभियांत्रिकी/ प्रॉडक्शन/ तंत्रज्ञान या विषयातील पदवी (२) एमबीए इन रिटेल आणि फॅशन मर्कंडायजिंग कोणत्याही विषयातील पदवी

  संपर्क – फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट ,ए १०/ए, सेक्टर २४ नॉयडा-२०१३०१, गौतमबुध्द नगर, उत्तरप्रदेश, दूरध्वनी- ०१२०-४५००१००/४५००२०३, फॅक्स- २४१२५५६, ईमेल- contact@ fddiindia.com आणि admission@fddindia.com, संकेतस्थळ- www.fddiindia.com.

सुरेश वांदिले