स्मार्ट व्यवस्थापक भाग ३
आयआयएम इंदोर-
12 वीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण – प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे उत्कृष्ट व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण व्हावे यादृष्टिने इंदोर आयआयएमच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. पुढील दोन वर्षे त्यांना नियमित स्वरुपाचस एमबीए अभ्यासक्रम शिकवला जातो.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी सामाजिक (सोशल) इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. चौथ्या आणि पाचव्या वर्षांच्या मध्ये बिझिनेस इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. ९ व्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते.
काय शिकाल?
पहिल्या तीन वर्षात पुढील विषय शिकवले जातात- फंडामेंटल कोर्सेस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स, लिनिअर प्रोग्रॅमिंग, स्टॅटिस्टिकल मेथड्स, सॅम्पलिंग डिस्ट्रिब्युशन ॲण्ड स्टॅटिस्टिकल इन्फरंस, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स, मायक्रो ॲण्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमी, इंटरनॅशनल ट्रेड, एनव्हीरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स, इंट्रोडक्शन टू सोशिऑलॉजी, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, पोलिटिकल थिअरी- वर्ल्ड हिस्ट्री, पब्लिक पॉलिसी, रिसर्च मेथडॉलॉजी, लॉ, अकाउंटिंग, बिझिनेस हिस्ट्री, बिझिनेस गव्हर्नन्स ॲण्ड सोसायटी, इंग्रजी – फ्रेंच-स्पॅनिश – जर्मन, प्रेझेंटेशन स्किल्स, डान्स- म्युझिक- ड्रामा-स्पोर्ट्स.
चौथ्या आणि पाचव्या वर्षी पुढील विषय शिकवले जातात–
कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, फायनांस ॲण्ड अकाउंटिंग, ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायंस, इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स ॲण्ड ऑर्गनाझेशनल बिहेव्हियर, ऑपरेशन मॅनेजमेंट ॲण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, स्ट्रॅटेजी, रुरल इर्मशन प्रोग्रॅम, हिमालय आऊट बाउंड प्रोग्रॅम, इंडस्ट्री व्हिजीट वर्कशॉप
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बॅचलर ऑफ आर्ट्स (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. ३ वर्षानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. त्याला बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ही पदवी प्रदान केली जाते.
अशी असते प्रवेश परीक्षा
या अभ्यासक्रमासाठी निवड, (१) कल चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट) आणि (२) मुलाखत या दोन घटकांवर आधारित केली जाते.
कल चाचणीच्या पेपरमध्ये तीन विभाग (सेक्शन) असतात (१) संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी)– बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस), (२) क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी– लघुउत्तरी प्रश्न (शॉर्ट ॲन्सर),(३) भाषा क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी) बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस)
प्रत्येक अचुक उत्तरास चार गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो.परीक्षेचा कालावधी 2 तास. प्रत्येक सेक्शनसाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. उमेदवारांना पेपरमध्ये ठरवून दिलेल्या सेक्शनच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावे लागतात. या तिनही भागांसाठी विशिष्ट असा कटऑफ(किमान गुण) ठरवण्यात येतो. तो कटऑफ प्राप्त करणे आवश्यकआहे. हे किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते.(प्रत्येक संवर्गासाठी हे किमान गुण वेगवेगळे राहतात.)
कलचाचणी आणि मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या उमेदवारांची निवड अंतिम यादीसाठी केली जाते. कल चाचणीस ६५ टक्के वेटेज आणि मुलाखतीस ३५ टक्के वेटेज दिले जाते.
क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीच्या भागात अलजेब्रा, मॉर्डन मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री, डाटा ॲनॅलिसिस, अॅरिथमॅटिक यावरील प्रश्नांचा समावेश असतो. व्हर्बल ॲबिलिटच्या भागात व्हर्बल रिझनिंग, रिडिंग कॉम्फ्रिहेन्शन, एरर्स इन युसेज, या घटकांवर प्रश्न विचारले जातात. अंतिम यादित ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशातील ३४ शहरांमध्ये २ जुलै २०२२ रोजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – मुंबई, पुणे आणि नागपूर
या अभ्यासक्रमांना १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
अर्हता– (१) २०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण विद्यार्थी- खुल्या संवर्गातील उमेदवारांना 10 वी आणि12 वी परीक्षेत 60 टक्के गुण व राखीव संवर्गातील उमेदवारांना 55 टक्के गुण मिळणे आवश्यक. (२) २०२० मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी- १० वी दहावी आणि १२वी मध्ये फक्त उत्तीर्ण श्रेणी. (३) यंदा १२वी परीक्षा देणारे विद्यार्थी – उत्तीर्ण श्रेणी. (४) उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट २००२ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. राखीव संवर्गासाठी वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट दिली जाते
संपर्क – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर, राऊ -पितमपूर रोड, इंदौर- 453556, दूरध्वनी- 0731-2439689,२४३९७९५ संकेतस्थळ –www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in
000
बीटेक-एमबीए
नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने पुढील विषयांमध्ये इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) एमबीए (टेक)इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक) – या अभ्यासक्रमांतर्गत पुढील अभियांत्रिकी विषय घेता येतात- कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात – फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स.हा अभ्यासक्रम शिरपूर कॅम्पसमध्ये करता येतो.
(२) एमबीए (टेक)इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक)– या अभ्यासक्रमांतर्गत पुढील अभियांत्रिकी विषय घेता येतात- कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन , मेकॅनिकल , केमिकल, सिव्हिल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात- फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स.हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पसमध्ये करता येतो.
(३) एमबीए (टेक)इंटिग्रेटेड प्रोग्रॅम (बीटेक आणि एमबीए टेक). या अभ्यासक्रमांतर्गत कॉम्प्युटर विषयात स्पेशलायझेशन करता येते. व्यवस्थापन विषयात पुढील स्पेशलायझेशन घेता येतात- फायनांस यामध्ये फिनटेकचा समावेश आहे. मार्केटिंग , ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स. हा अभ्यासक्रम नवी मुंबई , इंदोर आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये करता येतो.
(४) इंटिग्रेटेड एमबीए इन आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पस मध्ये करता येतो. पाच वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बीबीए(आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस)आणि एमबीए(आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस) या पदव्या प्रदान केल्या जातात.ज्या विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर या अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असले त्यास तशी परवानगी दिली जाते. हा विद्यार्थी बीबीए (आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस) पदवीसाठी पात्र ठरतो. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुंटुंबाधारित उद्योग/व्यवसायाचं नेतृत्व करता येणं शक्य व्हावं अशा तऱ्हेनं या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
(५)बी.फार्म आणि एमबीए (फार्मा टेक्नॉलॉजी) – इंटिग्रेटेड प्रोग्रॅम. हा अभ्यासक्रम मुंबई, शिरपूर आणि हैदराबाद कॅम्पस मध्ये करता येतो.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, एनआयएमआयएस- सीईटी, ही परीक्षा घेतली जाते.
संपर्क – संकेतस्थळ-nmimscet.in ०२२-४२३५५५५५, टोल फ्री क्रमांक- १८००१०२५१३८
०००
उद्योजक व्हा..
कुटुंबामार्फत चालविण्यात येणाऱ्या व्यवसाय आणि उद्योगाने देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यास हातभार लावल्याचं दिसून येतं. किराणा व्यवसाय ,लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये कुटुंबाधारित अनेक व्यावसायिकांनी उत्तम कामगिरी केलीय. अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या उद्योग/व्यवसायांचा कारभार साधारणत: पारंपरिक पध्दतीने केला जातो. मात्र बदलत्या काळानुसार या उद्योग/व्यवसांपुढे नवी आव्हाने आणि समस्या भेडसावू लागल्या आहेत. या समस्यांना भिडण्यासाठी आधुनिक व्यवस्थापकीय कौशल्य आणि तंत्राचा वापर करणं गरजेच ठरतय. त्यासाठी उपयुक्त ठरु शकेल असा पदविका अभ्यासक्रम नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेनं सुरु केला आहे.
हा एक वर्षं कालावधीचा असून तो आठवड्यातून (वीक एंड)एकदा शिकवला जातो. कोणत्याही विषयातील पदवीधारक किंवा १२ वी नंतर कोणत्याही विषयातील ३ वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम केलेले उमेदवार हा अभ्यासक्रम करु शकतात.
संपर्क – प्रवीण दलाल स्कूल ऑफ आंत्रप्रिन्युरशीप ॲण्ड फॅमिली बिझिनेस मॅनेजमेंट, नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑु मॅनेजमेंट स्टडीज, व्ही.एल.मेहता रोड, विले पार्ले पश्चिम,मुंबई ४०००५६,दूरध्वनी-०२२-४२३५ ५५५५ ,https://familybusiness.nmims.edu/programs/mba-entrepreneurship-and-family-business
सुरेश वांदिले
