(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक वर्षापूर्वींच्या विविध मंदिरावर कोरलेल्या मूर्त्यांना विविध प्रकारच्या दागिने आणि आभुषणांनी सजवलेले आणि मढवलेले आढळते. उत्खनात सापडलेल्या प्राचिन काळातील अनेक मूर्त्या देशातील वेगवेगळया वस्तुसंग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्त्यांच्या शरीरावरील आभुषणे आणि दागिने हे विस्मयचकित करणारे आहेत. अतिशय सुबक आणि सुरेख असणाऱ्या या दागिन्यांना घडवणाऱ्या कलावंतांना डिझायनिंगचे उत्कृष्ट ज्ञान होते, हे स्पष्ट होते. डिझायनर्स दागिने आणि आभुषणे परिधान करण्याची ही आपली परंपरा  अशी उज्ज्वल! त्या परंपरेत कोणताही बदल सध्याच्या काळात झालेला दिसत नाही. या अशा उज्ज्वल परंपरेत करिअरसंधी सुध्दा दडल्या आहेत.

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात.

प्रगतीच्या संधी

ज्वेलरी डिझायनिंगमध्ये एखाद्या कंपनीत सुरुवात केल्यानंतर अनुभव आणि विशिष्ट गुणवत्ता/दर्जा गाठल्यास स्वयंरोजगाराचं दालन खुलं होतं. प्रारंभी या क्षेत्रात मनाजोगता मेहताना कदाचित मिळणार नाही. मात्र तुम्ही ही कला उत्कृष्टरीत्या सादर करु लागलात व त्यात गती घेतली तर या उत्पन्नात वेगानं वाढ शक्य आहे. ही कमाई दरमहा काही लाख रुपयांपर्यंतही राहू शकते.

जगातील २० टक्के सोन्याची खरेदी भारतात केली जाते. यातील महत्वाचा भाग हा दागिने आणि आभूषणे निर्मितीत जातो. सध्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना ब्रँडेड दागिने आणि आभुषणे हवी असतात. ब्रँडेडचा अर्थ, डिझाइन केलेले! वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळया आभुषणांची खरेदी, मोठी रक्कम खर्ची घालून केली जाते. काही तज्ज्ञांच्या मते या क्षेत्रात १.३ मिलियन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

 संस्था आणि अभ्यासक्रम

(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जेम्स ॲण्ड ज्वेलरी-

अभ्यासक्रम – (अ) बॅचलर ऑफ डिझाइन इन ज्वेलरी डिझाइन. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम राज्यस्थान स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.

अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला जनरल ॲबिलिटी टेस्ट (गॅट- सामान्य क्षमता चाचणी), डिझाइन ॲबिलिटी टेस्ट (डॅट- अभिकल्‍प क्षमता चाचणी) आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो

संपर्क- एसपी- १११, आर. के. डेरेवाला, सितापुरा, जयपूर, राजस्थान – ३०२०२२, दूरध्वनी- ०१४१- २७७०९९५ ईमेल- admissions.jaipur@iigj.com

(ब) बी.ए इन जेम्स ॲण्ड ज्वेलरी डिझाइन – या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.

(क) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमात दागिने/आभुषणे डिझायनिंगच्या संकल्पना, निर्मिती, संगणकाच्या साहाय्याने डिझायनिंग, विक्री आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे. कालावधी एक वर्षं. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी.

संपर्क – () बागमल लक्ष्मीचंद पारिख कॅम्पस, प्लॉट नंबर – १११/२, १३ वा रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) – ४०००९३, दूरध्वनी- ०२२-४२९०६६६६, ईमेल- enquiries.mumbai@iigj.com, संकेतस्थळ – https://iigj.org/

 

करिअर संधी- (१) ज्वेलरी डिझानर, (२) ज्वेलरी मर्कंडायझर, (३) व्हिज्युअल मर्कंडायझर, (४) डिझाइन कुऑर्डिनेटर

कौशल्य विकास

या संस्थेने कौशल्य विकासाला चालना देणारे पुढील अल्पमुदतीचे अभ्यासक्रम/प्रशिक्षण सुरु केले आहेत. () ज्वेलरी डिझायनिंग कोर्स– यामध्ये बेसिक सर्टिफिकेट कोर्स आणि ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स टप्पा एक आणि दोन. () उद्योगांना लागणारे अभ्यासक्रम – फाउंडेशन कोर्स इन ज्वेलरी, डायमंड ग्रेडिंग, जेमॉलॉजी, जेम आयडेंटिफिकेशन, बेसिक ज्वेलरी मॅन्युफॅक्चुरिंग. () ज्वेलरी मॅन्युफॅक्चुरिंग कोर्स – यामध्ये बेसिक सर्टिफिकेट कोर्स आणि ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स टप्पा एक                                                                                        आणि दोन.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात ज्वेलरी क्रिएटिव्ह, मॅन्युफॅक्चुरिंग टेक्निक, कल्चरल स्टडी – आर्ट, मेटलर्जी, कम्युनिकेशन स्किल्स, प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कल्चरल स्टडी – ज्वेलरी, एन्व्हीरॉन्मेंटल स्टडीज, ज्वेलरी क्रिएटिव्ह, डायमंड ग्रेडिंग, जेमॉलॉजी , पर्सनॉलिटी डेव्हलपमेंट ॲण्ड सॉफ्ट स्किल्स, डिझायनिंग ॲण्ड मर्कंडायजिंग, मॅन्युफॅक्चुरिंग या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

००

(२) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्ना

लॉजी- या संस्थेच्या वेगवेगळया कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण पध्दतीच्या उपक्रमांतर्गत ज्वेलरी डिझायनिंगच्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

(अ) चेन्नई कॅम्पसमध्ये दोन वर्षे कालावधीचा, ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना प्रोफेशनल ज्वेलरी डिझायनर, प्रॉडक्ट हेड, रिटेल ज्वेलरी सोर्सिंग हेड्स, ज्वेलरी उद्योजक आदी करिअर संधी मिळू शकतात.

संपर्क- cep.chennai@nift.ac.in, दूरध्वनी- ०४४-२२५४२७५९

(ब) गांधीनगर कॅम्पसमध्ये ज्वेलरी डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.

संपर्क- https://nift.ac.in/gandhinagar/continuing-education, दूरध्वनी- ०७९-२३२६५०५१

(क) दिल्ली कॅम्पसमध्ये लक्झरी प्रॉडक्ट ॲण्ड ज्वेलरी डिझाइन हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.

संपर्क- ce.delhi@nift.ac.in, दूरध्वनी – ०११ – २६५४२१४९

०००

(३) जे.डी. इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

डिप्लोमा इन फाइन ज्वेलरी डिझाइन– कालावधी – एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.  

हा अभ्यासक्रम केल्यावर ज्वेलरी डिझायनर, ॲक्सेसरी डिझायनर, ज्वेलरी कंसलटंट लक्झरी सर्विस, कास्चुम ज्वेलरी, क्युटरेटर अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

संपर्क- ३९ दरयाचा बिल्डिंग, हौज खास व्हिलेज, नवी दिल्ली- ११००१६, दूरध्वनी- ०११- २६९६०८२१, , ईमेल- delhi@jdinstitute.co, संकेतस्थळ- https://jdinstitute.ac.in/courses/diploma-jewellery-design-1-year/

 

०००

(४) जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट ऑफ इंडिया

या संस्थेमध्ये, डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा हा अभ्यासक्रम दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. या अभ्यासक्रमात डिझायनिंग आणि सर्जनशीलतेच्या संकल्पनांची ओळख, रेखांकने, डिझायनिंगशी संबंधित चित्रे व त्याबरहुकूम साचा तयार करणे, विविध मौल्यवान धातू आणि खड्यांची तोंड ओळख, सोन्याची पोत ओळखणे, विविध प्रकारच्या रिंग, गळयातील दागिने, हात व बोंटांमध्ये वापरण्यात येणारे दागिने, नेकलेस, अमेरिका, जर्मन आणि जपान देशातील मार्केटमधील दागिने व्यापाराची संधी, दागिने निर्मितीची मूलभूत तत्वे आदी विषयघटकांचा समावेश करण्यात येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी १५ आठवड्यांचा आहे.

डिप्लोमा इन जेमॉलॉजी हा अभ्यासक्रमही या संस्थेत करता येतो. कालावधी एक वर्षं.

संपर्क -501/502, मेहता भवन, पाचवा माळा, राजा राम मोहनरॉय मार्ग, चर्नीरोड स्टेशन(पूर्व)च्या विरुध्द दिशेला,मुंबई-४००००४, संकेतस्थळ- https://www.giigemlab.com/diploma-in-jewellery-designing/  ईमेल- edu@giionline.com, दूरध्वनी- ०२२-२३८८९२३६

०००

(5) इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट

या संस्थेने ज्वेलरी डिझाइनचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात दागिने आणि त्यासाठी लागणारे साहित्य, धातू आणि खडे यापासून तयार करावयाच्या दागिन्यांची चित्रे आणि रेखांकने, दागिन्यांच्या सूक्ष्म बाबी, धातूंचे पोत, दागिन्यांच्या विविध प्रकारांची निर्मिती, सोन्याचे मूल्य जोखणे, दागिने डिझायनिंगचे मूल्य निर्धारण करणे, हिरे आणि रंगीत खड्यांचे मूल्य निर्धारण करणे, आदी विषय घटकांचा समावेश आहे.

कौशल्यनिर्मितीचा हा अभ्यासक्रम केल्यावर ज्वेलरी डिझायनर, फ्रीलान्सर डिझायनर, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग, ज्वेलरी रिटेलर आदी व्यवसाय वा करिअर संधी मिळू शकतात.

 

या संस्थेने ज्वेलरी डिझाइनसाठी कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मशिन टेक्नॉलॉजी या तंत्रकौशल्याला अवगत करण्यासाठी अभ्यासक्रम सुरु केला आहे. अत्याधुनिक टू डायमेंशेनल आणि थ्री डायमेंशेनल संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करुन असंख्य नावीन्यपूर्ण डिझाइन करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.

संपर्क – इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट, स्कूल ऑफ जेमॉलॉजी, ७०२, द कॅपिटल,  बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई -४०००५१,दूरध्वनी-०२२-4035२५५0,  ईमेल-: india@igi.org /www.igi.org/education/jewelry-cad-course,
सुरेश वांदिले

00000