डिझायनिंगच्या नव्या तंत्र आणि मंत्रामुळे “स्मार्ट जीवनशैली” अंगिकारणं हे आता सहज सुलभ झालय. विविध प्रकारच्या डिझायनिंगमध्ये स्पेशलायझेशन केलेल्या उमेदवारांना करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळायला लागल्या आहेत. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम जर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेतून केलेला असल्यास त्यांच्या, करिअर ग्रॉफ हा सदैव चढत राहतो.
सर्वोत्कृष्ठ संस्था
डिझायनिंगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेनं निर्माण केला आहे. विविध १७ विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी एनआयडी ही आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव संस्था होय. या अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
डिझाइनचे प्रशिक्षण देणाऱ्या परदेशातील १६ संस्थांशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी विशेष कार्यक्रम सुरु केले आहेत. या संस्थेमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात.
पदवी अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२वी उतीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.उच्च माध्यमिक (एचएससी)- व्होकेशलन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या तंत्रशिक्षण मंडळाच्या तीन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.(या सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक.)
बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील तीन शांखामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. (१)इन्डस्ट्रीयल डिझाइन (प्रॉडक्ट/ फर्निचर / इन्टेरेरिअर डिझाइन, सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन) (२) टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल (३) मीडिया डिझाइन (ग्रॅफिक/ ॲनिमेशन/फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन/एक्झिबिशन)
कॅम्पस आणि अभ्यासक्रम
एनआयडीचे पाच ठिकाणी कॅम्पसेस आहेत.
(१)अहमदाबाद कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पाच वर्षे कालावधीचा पूर्णकालीन पीएचडी अभ्यासक्रमही सुरु करण्यात आला आहे. इतर कॅम्पसेसमध्ये सध्या फक्त पदवी अभ्यासक्रम करण्याची सुविधा आहे.
या कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१) ॲनिमेशन फिल्म डिझाइन – एकूण जागा- १९,(२)एक्झिबिशन डिझाइन- एकूण जागा- १३,(३)फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन – एकूण जागा- १३,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा- १९,(५)सिरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन- एकूण जागा- १३, (६)फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन- एकूण जागा- १३, (७)प्रॉडक्ट डिझाइन- एकूण जागा-१९,(८)टेक्स्टाइल डिझाइन- एकूण जागा-१९. अशा एकूण १२५ जागा.
या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांचा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच फाऊंडेशन कोर्स करणं बंधनकारक आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि विषयाचा पर्याय लक्षात घेऊन शाखा प्रदान केली जाते.
(२)आंध्रपदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा- १३, ,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा- २५, अशा एकूण ७५ जागा आहेत.
या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम करणं बंधनकारक आहे.
(३)हरयाणा कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा- २५,(३)टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३,(४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा- २५, अशा एकूण ७५ जागा आहेत.
या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांचा पायाभूत अभ्यासक्रम आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणं बंधनकारक आहे.
(४)मध्यप्रदेश कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा-२५,(३)टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, (४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा-२५, अशा एकूण ७५ जागा आहेत.
(५)आसाम कॅम्पसमध्ये बॅचरल ऑफ डिझाइनच्या पुढील प्रमाणे जागा आहेत- (१)कम्युनिकेशन डिझाइन- एकूण जागा- २५,(२)इंडस्ट्रिअल डिझाइन – एकूण जागा- २५,(३)टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन – एकूण जागा-१३, (४)ग्रॅफिक डिझाइन- एकूण जागा- २५, अशा एकूण ७५ जागा आहेत. या कॅम्पसमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम आणि सहा सत्राचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करणं बंधनकारक आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि विषयाचा पर्याय लक्षात घेऊन शाखा प्रदान केली जाते.
आरक्षण
या सर्व अभ्यासक्रमासाठी १० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग, २७ टक्के जागा ओबीसी-एनसीएल (इतर मागासवर्ग-नॉन क्रिमी लेअर)संवर्ग, १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहेत. सर्व संवर्ग मिळून एकूण ५ टक्के जागा दिव्यांगासाठी राखीव आहेत. गुणवत्ता यादित पहिल्या पाच टक्क्यांमध्ये येणाऱ्या दिव्यांगाचा विचार केला जातो. या उमेदवारांना दिव्यांग प्रमाण पत्रसादर करावं लागतं. या प्रमाणपत्राचा नमुना www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इतर कोणतंही प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जात नाही.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्गाचं प्रमाणपत्र प्रवेश वर्षाच्या १ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर प्राप्त केलेलं असावं.
प्रवेश प्रक्रीया
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी डिझाइन ॲप्टिट्यूट टेस्ट(डॅट-प्राथमिक) ही चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट(डॅट-मेन)परीक्षेसाठी केली जाते.
डॅट(प्राथमिक) परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर ही केंद्रे आहेत. डॅट(मुख्य) परीक्षेमध्ये स्टुडिओ सेटमध्ये सुध्दा एक चाचणी द्यावी लागू शकते. डॅट (प्राथमिक) आणि डॅट (मुख्य) या दोन्ही चाचणी परीक्षेतील सर्व घटकांची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचीच गुणवत्ता यादीत निवड केली जाते.डॅट(प्राथमिक) परीक्षेतील पेपरसाठी पुर्नतपासणी(रिचेकिंग)ची सुविधा आहे.
प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.
संपर्क-एनआयडी,पालडी,अहमदाबाद:३८०००७, गुजराथ, दूरध्वनी:०७९-२६६२३६९२/ २६६२३४६२, फॅक्स: २६६२११६७,संकेतस्थळ- www.nid.edu
(३) एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन
या संस्थेतील अभ्यासक्रम-
(१) ग्रॅफिक डिझाइन, (२) ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, (३) प्रॉडक्ट डिझाइन, (४) इंटेरिअर स्पेस ॲण्ड फर्निचर डिझाइन, (५) ॲनिमेशन डिझाइन, (६) फिल्म ॲण्ड व्हिडिओ डिझाइन, (७) युझर एक्सपिरिअंस डिझाइन, (७) गेम डिझाइन, (८) फॅशन डिझाइन
उपरोक्त सर्व बॅचलर ऑफ डिझाइन अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षे. हे अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. त्यासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी एमएटी डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (डॅट) ही चाळणी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे नागपूर, मुंबई,पुणे येथे केंद्र आहेत. त्यानंतर स्टुडिओ टेस्ट व मुलाखत घेतली जाते.
संपर्क- एमआयटी, इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी- काळभोर, पुणे—४१२२०१, दूरध्वनी- ०२०-६७६५२३००, संकेतस्थळ- www.mitid.edu.in.
०००
(४) अनंत नॅशनल युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ डिझाइन– हा अभ्यासक्रम (१) प्रॉडक्ट डिझाइन, (२) स्पेस डिझाइन, (३) इंटरॲक्शन डिझाइन, (३) कम्युनिकेशन डिझाइन, (४) ट्रान्सडिसिप्लिनिरी डिझाइन, (५) सस्टेनेबल फॅशन ॲण्ड टेक्सटाइल डिझाइन, (५) मुव्हिंग इमेजेस या विषयांमध्ये करता येतो.
कम्युनिकेशन डिझाइन या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात येतो- डिझाइन कॉन्टेक्स्ट, डिझाइन स्टुडिओ, थिंकिंग व्हिज्युएली, टायपोग्रॅफी, डाटा व्हिज्युलायझेशन, टाइप जनरेशन्स, टायपोग्रॅफिक सिस्टिम्स, मेसेज-मिनिंग-मीडिआ, पॅकेजिंग ॲण्ड ब्रँडिंग
स्पेस डिझाइन या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात येतो- बेसिक कलर थेरी, सर्व्हिसेस, एन्व्हिरॉन्मेन्ट पर्सेप्शन, लायटिंग डिझाइन, फर्निचर डिझाइन, इंट्रोडक्शन टू सॉफ्टवेअर, व्हिज्युलायझिंग स्पेस ,कंस्ट्रक्शन मटेरिअल्स.
प्रॉडक्ट डिझाइन या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात येतो-
मॅन्युफॅक्चुरिंग प्रोसेस, मटेरिअल स्टडी, फॉर्म स्टडीज, युजर एक्सपिरियन्स डिझाइन, प्रॉडक्ट कॅपस्टोन कोर्स, बेसिक कलर थेरी, डिजिटल फॅब्रिकेशन, मॉक अप स्टुडिओ.
इंटरॲक्टिव्ह डिझाइन या विषयामध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात येतो.
मटेरिअल ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, एक्सपिरियन्स मॅप्स, क्रिएटिव्ह कोडिंग, फिजिकल कॉम्प्युटिंग, एक्सपेरिमेंटल ॲनिमेशन, गेम डिझाइन, इंटरफेस ॲण्ड डिव्हायसेस, डिजिटल फॅब्रिकेशन, बेसिक कलर थेरी.
संपर्क- अनंत नॅशनल युनिव्हर्सिटी, बोपल- घुमा- सानंद रोड, अहमदाबाद-३८२११५, गुजरात, दूरध्वनी-८१४०२१३३९९,संकेतस्थळ-www.anu.edu.in , ईमेल- info@anu.edu.in / admissions@anu.edu.in
सुरेश वांदिले