(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी ,व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना देशातील नामवंत कंपन्या, उद्योग, बँका यामध्ये सुलभतेने उत्तम पॅकेजसह नोकरी मिळते. या संस्थेचा बरेचदा उल्लेख, “सीईओ फॅक्टरी (कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्माण करणारी संस्था किंवा कारखाना,सं वर्णन केलं जातं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या संस्थेतील अनेक पदवीधर देशविदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या सीईओ या पदावर कार्यरत आहेत.)” असा केला जातो.

या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात-

(१) मास्टर ऑफ मॅनेजमेंटअभ्यासक्रमाला शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सीटी, कॅट, सीमॅट या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत (१) फायनांस, (२) मार्केटिंग, (३) ऑपरेशन, (४) ह्युमन रिसोर्स आणि (५) सिस्टिम या शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. सामान्य प्रवेश प्रकिये (कॉमन ॲडमिशन प्रोसेस-कॅप) व्दारे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये शासनाच्या नियमानुसार राखीव जागांचा समावेश आहे.

 (२) एम.एस्सी इन फायनांस– हा अभ्यासक्रम माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या सूचनेनुसार सुरु करण्यात आला. ‘भविष्यातील वित्तीय नेतृत्व’, निर्मितीच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची सरंचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना (१) इनव्हेस्टमेंट बँक, (२) ब्रोकरेज हाऊसेस, (३) प्रायव्हेट इक्विटी कंपन्या, (४) क्रेडिट रेटिंग्ज संस्था, (६) पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा, (७) व्हेंच्युर कॅपिटल कंपन्या यामध्ये करिअर संधी मिळाल्या आहेत.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रारंभिक चाळणी सीईटी/कॅट या परीक्षेतील गुणांवर  केली जाते. त्यानंतर लिखान क्षमता चाळणी (रिटन ॲबिलिटी टेस्ट), समूह चर्चा (ग्रुप डिस्कशन) आणि मुलाखत घेतली जाते. एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

(३) मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असून कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्याला तो करता येतो.

प्रवेश प्रकिया

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रारंभिक चाळणी सीईटी/कॅट या परीक्षेतील गुणांवर  केली जाते.

पुढचा टप्पा व्यक्तिमत्व चाचणीचा असतो. यामध्ये (१) समूह कृती, (२) लिखाण क्षमता चाचणी आणि (३) मुलाखत या तीन घटकांचा समावेश आहे.

व्यक्तिमत्व चाचणीसाठी १०० गुण आहेत. यामध्ये मुलाखतीला ० गुण, समुह कृती (ग्रुप ॲक्टिव्हिटी) ला ० गुण आणि लेखन क्षमता चाचणीला १० गुण अशी वर्गवारी आहे. यामध्ये ३०० शब्दांमध्ये, हा अभ्यासक्रम कां करु इच्छिता? (स्टेटमेंट ऑफ परपोज)” या विषयावर निबंध लिहावा लागतो.

समूह कृतीमध्ये उमेदवारांची इतरांसोबतची वर्तणूक, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, समूहकृतीतील रस, पुढाकार, तार्किक विचारसरणी या घटकांचा समावेश आहे. १० ते १२ उमेदवारांचा समूह करुन त्यांना एखादे कार्य सोपवले जाते.

अर्हता- खुला संवर्ग () १० वी- ६० टक्के किंवा त्याहून अधिक, () १२ वी ६० टक्के किंवा त्याहून अधिक, () पदवी ५० टक्के किंवा त्याहून अधिक. राखीव संवर्ग () १०वी – ५५ टक्के किंवा त्याहून अधिक, () १२वी ५५ टक्के किंवा त्याहून अधिक () पदवी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक

प्लेसमेंट

पुढील कंपन्या या संस्थेत प्लेसमेंटसाठी येतात- () टाटा प्रोजेक्ट, () थरमॅक्स, () वेदांता, () व्ही गार्ड, () व्ही आय, () विरतुसा, () टाटा डिजिटल, () सियाराम, () सोडेक्स, (१०) टाटा कॅपिटल, (११) मॉर्गन स्टॅन्ले, (१२) महिंद्रा, (१३) महिंद्रा लॉजिस्टिक्स, (१४) लँडमार्क, (१५) मर्सर, (१६) मेन्सा, (१६) मायकेल पेज, (१७) एनव्हेंट, (१८) रेमंड्स, (१९) प्युमा, (२०) पॉझिटिव्ह मुव्हस, (२१) हिरो, (२२) एचपी, (२३) इन कॉर्प, (२४) इंडेजिन, (२५) जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, (२६) कोटक लाइफ, (२७) केपीएमजी, (२८) एचडीएफसी इर्गो, (२९) एचसीएल, (३०) जीएसके, (३१) गोदरेज, (३२) एमिरेट्स, (३३) एफसीए, (३४) बजाज फिनसर्व्ह, (५) इगल बर्गमन, (६) केपजेमिनी , (७) क्रेडिट ॲग्रिकोल, (८) ॲस्टर, (९) अमॅझॉन, (४०) एअर लिक्विड, (४१) ॲग्रोस्टार, (४२) अदानी पॉवर, (४३) अदानी विल्मर, (४४) आदित्य बिर्लाहिंडाल्को, (४५) अल्ट्राटेक, (४६) ग्रॅसिम, (४७) फॅशन ॲण्ड रिटेल, इत्यादी.

एक नवी संधी

मास्टर ऑफ मॅनेजमेंट आणि एम.एस्सी फायनांस या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी पात्र ठरु न शकलेल्या विद्यार्थ्यांना मास्टर इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या रुपाने या संस्थेत प्रवेश मिळवण्याची आणखी एक संधी उपलब्ध होऊ शकते.

संपर्क– संचालक जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, डी.एन.हाऊस, १६४ बॅकबे रिक्लेमेशन, एच टी पारेख मार्ग चर्चगेट, मुंबई-४०००२०, संकेतस्थळ- www.jbims.edu

०००

सिडनेहॅम

सिडनेहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च ॲण्ड आंत्रप्य्रुनरशीप एज्युकेशन, ही महाराष्ट्राच्या शासनाच्या अखत्यारितील महत्वाची संस्था. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता या संस्थेचा, देशातील “टॉपची संस्था” म्हणून विद्यार्थ्यांनीच लौकिक कायम ठेवला आहे.  देशस्तरावरील सर्व शासकीय संस्थांमध्ये या संस्थेचा क्रमांक १७ वा लागतो. मुंबईमध्ये – शैलश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट (आयआयटी मुंबई), जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेनंतर सिडनेहॅमचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र शासनाच्या सीइटी-एमबीए/एमएमएस परीक्षेत पहिल्या  १२० ते १३० क्रमांकात येणाऱ्या येणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (कॅट) किंवा कॉमन- मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (सी-मॅट) या शासकीय परीक्षा दिलेल्या उमेदवारांनांही अर्ज करता येतो. मात्र ९९.९५ किंवा ९९.९६ असे पर्सेंटाइल असल्यास प्रवेश मिळण्याची शक्यता राहू शकते. जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेनंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची पहिली पसंती हीच संस्था असते. काही पॉईंट्सचाच फरक प्रवेशाच्या वेळी दिसून येतो. या संस्थेची प्रवेश क्षमता १२० आहे.

या संस्थेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, रिर्टन ऑफ इनव्हेस्टमेंटच्या बाबत ही संस्था देशातील पहिल्या पाच ते सहा संस्थांमध्ये कायम असते. रिटर्न ऑफ इनव्हेस्टमेंटचा अर्थ शैक्षणिक शुल्क आणि वार्षिक पॅकेजचे प्रमाण.  या संस्थेतील दोन वर्षाचा अभ्यासक्रमासाठी १ लाख ३४ हजार रुपये शुल्क आहे. (जमनालाल बजाज या संस्थेत हे शुल्क ६ लाख रुपये आहे.)

या संस्थेत मास्टर ऑफ मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. यामध्ये (१) फायनांस, (२) मार्केर्टिंग, (३) ह्युमन रिसोर्स, (४) ऑपरेशन्स आणि (५) सिस्टिम्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सोय आहे.

प्लेसमेंट सुविधा

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते. प्लेसमेंटच्या बाबतीत ही संस्था बऱ्याच नव्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटपेक्षा समोर आहे. मुंबईतील आर्थिक केंद्रांच्या परिसरात ही संस्था असल्याने सर्व महत्वाच्या नामवंत कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स या संस्थेत प्लेसमेंटसाठी येतात. एका महत्वाच्या बिझिनेस मॅगेझिनच्या सर्वेक्षणानुसार प्लेसमेंटच्या बाबतीत या संस्थेचा देशस्तरावरील क्रमांक २४ आहे. (आयआयएम नागपूरचा २३ वा क्रमांक, आयआयएम अमृतसरचा २६, आयआयएम बोधगयाचा २७ वा, आयआयएम संबलपूरचा ३६ वा क्रमांक  आणि भारत सरकारच्या अखत्यारितील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेचा क्रमांक ४० वा आहे.)

या संस्थेत ॲक्सिस बँक, एसचडीएफसी, सिटी बँक, बार्केलेज, डेलाईट ,पिरामल, विप्रो, मॉर्गन स्टॅन्ले, आयसीआयसीआय प्रुडेंशिअल, गोल्डमन सॅच, आयसीआयसीआय बँक, इंफोसिस, लॅक्मे लिव्हर, मॉर्गन स्टॅन्ले, मार्श, पीडब्ल्यूसी, आयडीएफसी फर्स्ट बँक आदी कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात.

संपर्क- बी रोड चर्चगेट, मुंबई ४०००२०, दूरध्वनी-०२२- ६१५१०७०१, ईमेल-info@simsree.org, संकेतस्थळ- simsree.org

पदवीनंतर पुढे काय? हा प्रश्न मिटवणाऱ्या या दोन्ही संस्था आहेत. अर्थातच प्रवेश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. स्पष्ट संकल्पना, सरावातील सातत्य आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर यश मिळू शकतं.

सुरेश वांदिले