भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी मार्केटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाचीही आवशक्यता भासू लागली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जागतिक लक्झरी व्यापाराची उलाढाल २५ बिलियन डॉलर्स पेक्षाही अधिक आहे. यापैकी एकचतुर्थांश हिस्सा हा भारत आणि चीन या दोन देशांनी व्यापला आहे.
गेल्या काही वर्षात भारतातील लक्झरी मार्केटची वाढ ८६ टक्क्यांनी झाल्याचं तज्ज्ञाचं सांगणं आहे. भारतात महिलांसोबत उच्चभ्रू गटात गेलेले किंवा या गटात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती व्यक्तीगत आभुषणे, कपडे आणि शरीराला सजवणाऱ्या किंवा अधिक उठाव आणणाऱ्या सहाय्यकारी बाबी किंवा ॲक्सेसरीजना अधिकाधिक महत्व द्यायला लागले आहेत. त्यामुळे डिझायनर कपडे, डिझायनर पादत्राणे, डिझायनर निवासस्थाने अशा बहुतेक सर्वच बाबींना महत्व प्राप्त झाल्याचं दिसतं. या गटातील या सर्व बाबींची गरज समजून घेणारे, त्यांच्याशी संवाद साधू शकणारे व अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करु शकणारे कौशल्यप्राप्त उमेदवारांची कमतरता निर्माण झाली आहे. लक्झरी वस्तू अथवा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठी लक्झरी ब्रँड मॅनजमेंट तज्ज्ञ हवे आहेत.
पर्ल ॲकॅडेमी या आघाडीच्या फॅशन, डिझाइन आणि ब्रँड मॅनेजमेंटचं शिक्षण देणाऱ्या संस्थेने,”लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट” आणि ” फॅशन ॲण्ड लाइफ स्टाइल मॅनेजमेंट,” या विषयांशी निगडीत पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बीबीए इन ग्लोबल लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट- हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेत १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला तो करता येतो. या अभ्यासक्रमात लक्झरी ब्रँड विक्री व्यवस्थापनाशी संबंधित सर्व महत्वाच्या पैलूंचं ज्ञान प्रदान केलं जातं. अभ्यासक्रमात सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा सुयोग्य मेळ साधण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील सर्व आव्हानांचा सामना करणं शक्य होतं.
लक्झरी वस्तूंच्या जगाशी संबंधित सांस्कृतिक बाबी आणि वारसा समजून घेऊन या क्षेत्रातील अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणं सुलभ जाऊ शकतं. पुढे त्यांना वित्तीय व्यवस्थापनाचं सखोल ज्ञान प्रदान केलं जातं.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील काही महत्वाच्या विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे- (१) कल्चरल फाउंडेशन इन लक्झरी, (२) लक्झरी बिझिनेस इन्व्हार्यमेंट, (३) बिझिनेस कम्युनिकेशन, (३) लक्झरी कंझ्युमर बिहेव्हिअर, (४) फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, (५) लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट, (६) लक्झरी गुड्स ॲण्ड सर्व्हिसेस, (७) फायनांशिअल डिसिजन मेकिंग, (८) लक्झरी बायिंग ॲण्ड मर्कंडायजिंग, (९) लक्झरी गुड्स ॲण्ड सर्व्हिस, (१०) डिजिटल मार्केटिंग ॲण्ड ई कॉमर्स, (११) लक्झरी रिटेल ॲण्ड व्हिज्युअल मर्कंडायजिंग, (१२) लक्झरी ऑपरेशन्स अॅण्ड सेल्स मॅनेजमेंट, (१३) ग्लोबल लक्झरी कम्युनिकेशन ट्रेंड्स, (१४) इंटरनॅशनल लक्झरी बिझिनेस, (१५) लक्झरी पब्लिक रिलेशन ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट, (१६) फ्युचर ऑफ लक्झरी बिझिनेस, (१७) स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ऑफ लक्झरी ब्रँड्स, (१८) बिझिनेस लॉज ॲण्ड इथिकल प्रॅक्टिसेस, (१९) कस्टमर रिलेशन ॲण्ड एक्सपिरिअंस मॅनेजमेंट.
(२) एमबीए इन ग्लोबल लक्झरी मॅनेजमेंट– जागतिक लक्झरी वस्तू व्यापाराची कार्यपध्दती आणि कार्यप्रणालीची विस्तृत माहिती या अभ्यासक्रमात दिली जाते. उच्चभ्रू संवर्गासाठी लागणाऱ्या विविध लक्झरी वस्तूंचे डिझाइन ते मार्केटिंग पर्यंतचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्रदान केलं जातं. एखाद्या नव्या लक्झरी ब्रँडला निर्धारित केलेल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठीच्या व्युहनीतीचा अभ्यास केला जातो. या अभ्यासक्रमात लक्झरी मार्केटिंग, ई लक्झरी, लक्झरी गुड्स आणि सर्व्हिसेस, लक्झरी बायिंग ॲण्ड मर्कंडायजिंग, लक्झरी व्हिज्युअल मर्कंडायजिंग या सारख्या विषय घटकांचा समावेश करण्यात आल्याने या क्षेत्रात उत्तम करिअर घडण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांना हस्तगत करता येणं शक्य होतं. या क्षेत्रातील अधिक उच्च श्रेणीच्या करिअर संधी मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. स्वत:चा उद्योग वा स्टार्टअप सुरु करण्यासाठीसुध्दा या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो.
या अभ्यासक्रमात प्रामुख्याने तीन प्रकारच्या लक्झरी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जातं- (१) लक्झरी वस्तू-यामध्ये वस्त्रप्रावरणं व या वस्त्रांना अधिक सुशोभित करणाऱ्या ॲक्सेसरीज, पेन, गृह सजावट, घड्याळी, अलंकार आणि दागिने, वाईन्स आणि लक्झरी मद्य. (२) लक्झरी सेवा- स्पा, पर्यटन आणि प्रवास, फाइन डायनिंग आणि हॉटेल्स
- (३) मालमत्ता- यॅच, फाइन आर्ट, जमीन जुमला, वाहने.
- या सर्वांचे ग्राहक हे उच्च मूल्य श्रेणी संवर्गातील असल्याने त्यांना प्रभावीरित्या सांभाळणे व त्यांना खरेदीसाठी बाध्य करणे, याचं तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवलं जातं.
या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असून तो कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम पर्ल ॲकॅडेमीच्या दक्षीण दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी उपलब्ध होतात-
(१) लक्झरी ब्रँड मॅनेजर, (२) लक्झरी प्रॉडक्ट मॅनेजर, (३) लक्झरी रिटेल बायर, (४) पीआर स्पेशॅलिस्ट, (५) व्हिज्युअल मर्कंडायजर, (६) मार्केटिंग मॅनेजमेंट,
(३) बीबीए इन फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल बिझिनेस मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचा (सहा सत्रे) आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. बेंगळुरु, मुंबई आणि दक्षीण दिल्ली या कॅम्पसमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुढील कार्यपध्दती अवलंबण्यात येते- (१) रिटन ॲडमिशन टेस्ट- लेखी प्रवेश परीक्षा, (२) जनरल प्रोफिसिंएन्सी टेस्ट-सामान्य क्षमता चाळणी. यामध्ये उमेदवाराचं इंग्रजीवरील प्रभुत्व, तार्किक विचारसणी/ कौशल्य, संख्यात्मक कौशल्य आणि माहितीचे विश्लेषण (डाटा इंटरप्रिटेशन) यांचं परीक्षण केलं जातं.
पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावलं जातं. हा टप्पा मुलाखत आणि व्यक्तीमत्व चाचणीचा असतो.
(४) एमबीए इन फॅशन ॲण्ड लाइफस्टाइल बिझिनेस मॅनेजमेंट. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून कोणत्याही विषयातील पदवी घेतलेल्या उमेदवाराला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात-
(१) प्रॉडक्ट डेव्हलपर, (२) रिटेल मर्कंडायझर, (३) रिटेल प्लॅनर, (४) रिटेल बायर, (५) स्टोअर मॅनेजर, (६) कस्टमर रिलेशनशीप मॅनेजर, (७) फॅशन कंसल्टंट, (८) प्रॉडक्ट मर्चंट, (९) सोशल मीडिआ मार्केटीअर, (१०) डिजिटल मार्केटिअर, (११) कंटेट रायटर, (१२) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, (१३) सोर्सिंग मॅनेजर,
फॅशन आणि जीवनशैली उद्योगाशी निगडित मनुष्यबळाला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या कौशल्याची निर्मिती या अभ्यासक्रमाव्दारे केली जाते. बहुज्ञानशाखीय सैध्दांतिक ज्ञान, अधिकाधिक प्रात्यक्षिके, देश विदेशातील या उद्योगांना भेटी, उद्योगांसोबत प्रकल्प, इंटर्नशीप अशा विविध बाबींचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम दक्षीण दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु या तीन कॅम्पसमध्ये करता येतो.
संपर्क- एस. एम. सेंटर अंधेरी कुर्ला रोड, मरोळ मेट्रो स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९, दूरध्वनी-०२२-४०५८५४००, संकेतस्थळ-https://www.pearlacademy.com,ईमेल-registrar.mumbai@https://www.pearlacademy.com
०००
लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मुंबई कॅम्पसमध्ये, सर्टिफिकेट इन लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन, हा अभ्यासक्रम करता येतो. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा हा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात- (१) लक्झरी प्रॉडक्ट डिझायनर, (२) डिझाइन मॅनेजर्स, (३) प्रॉडक्ट स्टायलिस्ट, (४) पॅकेजिंग डिझायनर्स,(५) कम्युनिकेशन डिझायनर्स, (६) व्हिज्युअल मर्कंडायझर, (७) ब्रँड मॅनेजर, (८) प्रॉडक्ट मर्कंडायझर, (९) युझर एक्सपिरियंस डिझायनर, (१०) डिझायनर आंत्रप्रिन्युरर्स,
काय शिकाल?
(१) प्रॉडक्ट डिझायनिंगचं तंत्रं आणि तत्वं, (२) ग्राहक आणि विशिष्ट ब्रँडबद्दलची जाणीवजागृती, (३) दागिने/आभुषणे डिझाइनची नवी परिमाणे आणि नवा दृष्टिकोन, (४) फॅशन ॲक्सेसरीजसाठी वापरण्यात येणारे साहित्य,(५) प्रात्यक्षिकांवर भर, (६) संशोधन, (७) कला-संस्कृती-डिझाइन यासंदर्भातील आखीव पर्यटन.
संपर्क- https://nift.ac.in/mumbai/continuing-education
सुरेश वांदिले