इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) किंवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थांमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये प्रवेश मिळत नसल्यास इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी)मधील या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे उचित ठरेल. कोणत्याही खाजगी संस्थांमधील कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयांपेक्षा अधिक उत्तम ज्ञान या संस्थांमध्ये मिळू शकते.
काही महत्वाच्या आयआयआयटी मधील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
- हैदराबाद आयआयआयटी
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शैक्षणिक कामगिरीनुसार तिसऱ्या वर्षानंतर बीटेक ॲण्ड मास्टर ऑफ सायंस इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि (३) कॉम्प्युटेशनल नॅचरल सायंस या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.
संपर्क-https://www.iiit.ac.in/academics/undergraduate/dual-degree/
०००
(२) बेंगळुरु आयआयआयटी
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
इंटिग्रेटेड एमटेक
या संस्थेने प्रत्येकी पाच वर्षे कालावधीचे पुढील इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
बीटेक – एमटेक वुइथ ड्युएल डिग्री इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड मॅनेजमेंट
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) या संस्थेने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड मॅनेजमेंट हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून तो कला, वाणिज्य, विज्ञान, विधि, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, डिझाइन यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर प्रॉडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट डिझायनर, बिझिनेस ॲनॅलिस्ट, टेक्नॉलॉजी कंसलटंट, युझर रिसर्चर अशा करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- www.iiitb.ac.in
०००
(३) ग्वाल्हेर आयआयआयटी
बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, (३) मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग, (४) इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (बीटेक-एमटेक) इन इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी. (५) इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम (बीटेक-एमबीए)
संपर्क- www.iiitm.ac.in
०००
(४) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– – जबलपूर
या संस्थेत बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) डिझाइन, (४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग, (५) स्मार्ट मॅन्युफॅक्चुरिंग हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क- http://www.iiitdmj.ac.in
०००
(५) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम) – कांचिपूरम-
बीटेक (कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग) इन (१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,
(२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) वुइथ स्पेशलायझेशन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग,
ड्युएल डिग्री
बीटेक -एमटेक इन (१) कॉम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन व्हीएएलएसआय डिझाइन, (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन सिग्नल प्रोसेसिंग, (४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग
संपर्क- www.iiitdm.ac.in/
०००
(६) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– कुरनूल.
या संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन (१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग.
ड्युएल डिग्री
या संस्थेने बीटेक (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि (२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयांमध्ये, ड्युएल डिग्री अभ्यासक्रम सुरु केला आहे.संपर्क- http://www.iiitdmkl.ac.in
सुरेश वांदिले