वस्त्रोद्योगातील नव्या वाटा
पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज सातत्याने भासत असून ही गरज भागवण्यासाठी, भारत सरकारने, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी आपल्या देशातील महत्वाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत वस्त्रोद्योग निर्मिती, व्यवस्थापन व्यवसायासंदर्भातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.
पदवी अभ्यासक्रम
(१) बीएस्सी- टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल, अर्हता- भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र या विषयासह १२वी. खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के.कालावधी- तीन वर्षे.
(२) बीएस्सी- टेक्निकल टेक्सटाइल, अर्हता- भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र या विषयासह १२ वी. खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के. अभ्यासक्रमाचा कालावधी – तीन वर्षे.
(३) बीबीए- टेक्सटाइल बिझिनेस ॲनॅलिटिक्स. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. खुला संवर्ग ५० टक्के/ राखीव संवर्ग ४५ टक्के. अभ्यासक्रमाचा कालावधी – तीन वर्षे.
(४) बीएस्सी- टेक्सटाइल (बिझिनेस ॲनॅलिटिक्स), अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. अर्हता- १२वी विज्ञान शाखा – रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा १२ वी वाणिज्य शाखा- अकाउंटिंग (लेखा) आणि (वित्त) आणि बिझिनेस मॅथेमॅटिक्स (व्यवसाय गणित). अर्हता- खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के.
प्रवेश प्रकिया
सर्व पदवी अभ्यासक्रमांना बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. याचा अर्थ जे इच्छूक विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतील, त्यांची बारावित मिळालेल्या गुणांच्या आधारावर संवर्गनिहाय गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. उपलब्ध जागांनुसार प्रवेश निश्चित केला जाईल.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
(१) एमबीए टेक्सटाइल मॅनेजमेंट, (२) एमबीए ॲपेरल मॅनेजमेंट, (३) एमबीए रिटेल मॅनेजमेंट, (४) एमबीए टेक्निकल टेक्सटाइल मॅनेजमेंट, (५) एमबीए – टेक्सटाइल (बिझिनेस ॲनॅलिटिक्स)
अर्हता- कला/ वाणिज्य/ विज्ञान/ अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ औषधीनिर्माणशास्त्र/ वास्तुकला विषयातील पदवी अथवा ३ वर्षे कालावधीची पदविका आणि ३ वर्षांचा कार्यानुभव.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. ज्यांना ही परीक्षा द्यायची नसेल त्यांना, कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट), मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (मॅट), कॉमन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (सी-मॅट) अशा सारख्या चाळणी परीक्षा द्याव्या लागतील. या परीक्षेत मिळालेले गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.
करिअर संधी
पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी साहाय्य केलं जातं. या संस्थेत पुढील कंपन्या प्लेसमेंसाठी येतात- (१)जे जे मिल्स, (२)रोडमाइन/इस्टमॅन एक्सपोर्ट, (३)लाइफस्टाइल इंटरनॅशनल-मॅक्स फॅशन, (४)रिलायंस ट्रेंडस्, (५) लॉयल टेक्सटाइल, (६)बाटा, (७)गोकलदास एक्स्पोर्टस, (८)ककून ॲपेरल्स, (९)रेमंड्स, (१०)पँटलून्स, (१०)पार्क अव्हेन्यू, (१०)वर्धमान, (११)टॉमी ॲण्ड हिलफिगर इत्यादी.
संपर्क- १४३८ अविनाशी रोड पीलामेदू कोईम्बतूर-६४१००४, संकेतस्थळ- www.svpitm.ac.in, ईमेल-admission@ svpitm.ac.in, दूरध्वनी-०४२२ – २५७१६७५,