(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बँकेतील तंत्रोव्यवस्थापक

बँकाच्या विस्तार – विकास आणि वृध्दी यामध्ये तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज वाढली आहे. नव्या बँका, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांची सातत्याने वाढ होत असल्याने या तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढली आहे.

संस्था आणि अभ्यासक्रम

(१) इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी – या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या संस्थेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कार्यालयीन कामाकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, त्याचा विविध घटकांमध्ये अंतर्भाव करणे आणि या सर्वांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या अभ्यासक्रमात सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान आणि उदयास येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, तंत्रज्ञानाने कार्यक्षम करण्यासाठी हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार उपयुक्त ठरु शकतात.

अर्हता – या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुण प्राप्त केलेला अभियांत्रिकी पदवीधर किंवा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी कॅट- कॉमन एंट्रन्स टेस्ट, मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, सीमॅट- कॉमन मॅनेजमेट ॲडमिशन टेस्ट, झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट, जीआरई – ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन, एआयएमए टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन (आत्मा) या परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना कोटक महिंद्र बँक, द साऊथ इंडियन बँक लिमिटेड, फेडेरल बँक, कॅथोलिक सिरियन बँक यासारख्या संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

०००

 एमटेक इन बँकिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी

याच संस्थेने हैद्राबाद युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने, एमटेक इन बँकिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई/टेक  किंवा एमसीए/ एमएस्सी (कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन सायंस/ इलेक्ट्रॉनिक्स) आणि गेट (ग्रज्युएट ॲपिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) मधील सुयोग्य गुण.

संपर्क- कासल हिल, रोड नंबर एक, मसाब टँक, हैदराबाद- ५०००५७, दूरध्वनी- ०४०-२३२९४९९९ आणि २३२९४१२१, संकेतस्थळ- www.idrbt.ac.in, ईमेल-  program@ idrbt.ac.in आणि publisher@ idrbt.ac.in

००००

(२) पाँडेचरी युनिव्हर्सिटी

या संस्थेत () एमबीए इन बँकिंग टेक्नॉलॉजी, (२) एमबीए इन फायनांशिअल टेक्नॉलॉजी, हे अभ्यासक्रम करता येतात. अर्हता– बीई/ बीटेक/ बीएस्सी/ बीसीए (कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी), प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट -सीयूइटी-(पीजी) मधील गुण ग्राह्य धरले जातात.

संपर्क– रजिस्ट्रार, आर.वेंकटरमन नगर, कलापेट, पाँडिचेरी- ६०५०१४, दूरध्वनी- ०४१३-२६५५१७९, ईमेल-registrar@pondiuni.edu.in, संकेतस्थळ- http://www.pondiuni.edu.in/programmes

०००