(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

क्रिएटिव्ह कम्युनिकेशन

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सर्जनशील मन असतं. या मनाची मशागत करुन विविध संकल्पनांना जन्मास घालणं  आणि त्यातून उत्तम कलाकृतीच्या निर्मितीसाठीचं तंत्र आणि कौशल्य, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रम इन क्रॅफ्टिंग क्रिएटिव्ह कम्युनिकेशन, या अभ्याक्रमामध्ये शिकवलं जातं. हा अभ्यासक्रम मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनने या संस्थेमार्फत चालवला जातो.या अभ्यासक्रमाची टॅग लाइन (आशय रेषा) ही ,प्रत्येक धाग्याला सांगायची असते एक कथा, (एव्हरी थ्रेड हॅज अ स्टोरी टू टेल) अशी आहे.

हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी रणनीतिकारर (स्ट्रॅटेजिस्ट), कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर), अभिकल्पकार (डिझायनर), ॲनिमेटर्स, चित्रपट निर्माते या क्षेत्रात नाव कमावलं आहे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- () संकल्पना निर्मितीचे तंत्र ( आयडिया जनरेशन टेक्निक), () कथाकथन (स्टोरी टेलिंग), () प्रतिमा निर्मिती (ब्रँडिंग), () संहिता लेखन (कॉपी रायटिंग), () कला दिग्दर्शन (आर्ट डायरेक्शन), () सजर्नशील नोंद लेखन (रायटिंग क्रियेटिव्ह ब्रिफ्स), () दूरचित्रवाणी वाणिज्यिक/ जाहिरात निर्मिती नियोजन (टेलिव्हिजन कर्मशिअल प्लॅनिंग), () प्रचार/प्रसिध्दी मोहीम (कॅम्पेन प्लॅनिंग), () चिन्हविज्ञान- (सेमिऑटिक्स), (१०) डिजिटल संवादसंप्रेषन (डिजिटल कम्युनिकेशन), (११) छायाचित्रण (फोटोग्रॅफी), (१२) दृष्टीक्षेप (वेज ऑफ सीईंग) -आपल्या अवतीभवती असणारे विविध घटक/ पात्रे/ घटना अशा बाबींपासून सर्जनशील प्रेरणा कशी घ्यावी? याविषयीचं प्रशिक्षण, (१३) जाहिरात व्यवस्थापन (ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट), (१४) नवी माध्यमे आणि अनुभवात्मक विपणन (न्यू मीडिया ॲण्ड एक्सपिरेंशिअल मार्केटिंग) – नव्या माध्यमांचा वापर करुन पारंपरिक जाहिरातीपेक्षा नावीन्यपूर्ण पध्दतीने जाहिरात करण्याचं तंत्र/कौशल्य या विषय घटकात शिकवलं जातं. (१५) ग्राहक केंद्रित संवाद संप्रेषन (कस्टमर सेंट्रिक कम्युनिकेशन), (१६) डिजिटल जाहिराती, (१७) रेडियो, (१८) ब्रँडिंग, (१९) साधनांचे शिक्षण (टूल लर्निंग) उदा- अडॉब फोटोशॉप, इल्युस्ट्रेटर, इन डिझाइन, प्रिमिअर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, (२०) अनिमेशन ॲण्ड स्टॉप मोशन- वाळू, प्रकाश, माती, कठपुतळे, चित्रे, पेपरचे तुकडे अशा सारख्या साहित्याच्या मदतीने चित्रपटांची निर्मिती. (२१) चित्रपट आस्वाद/ समीक्षा (फिल्म ॲप्रिशिएशन), (२२) चित्रपट निर्मिती

कोणत्याही विषयातील पदवीधरास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.अभ्यासक्रमाचा कालावधी- दहा महिने.

संपर्क- https://www.mica.ac.in/academic-centres/mudra-institute-of-communications-research

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात-

() मॅनेजमेंट ट्रेनी, () क्रिएटिव्ह ट्रेनी, () मॅनेजर- ब्रँड स्ट्रॅटेजी, () सिनीयर मॅनेजर-ब्रँड स्ट्रॅटेजी, () कंटेट क्रिएटर , कॉपी रायटर, सिनियर कॉपी रायटर, () सिनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, () आर्ट डायरेक्टर, () व्हिज्युएलायजर, () सोशल मीडिया स्ट्रॅटिजिस्ट, (१०) असोशिएट क्रिएटिव्ह पार्टनर, (११) आर्ट डायरेक्टर, (१२) ग्रॅफिक डिझायनर, (१३) क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर

 जाहिरात, ब्रँडिग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्युहनीती, डिजिटल मार्केटिंग या सारख्या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या व्यक्तीस आपली प्रतिभा  आणि सृजनशीलता प्रभावीरीत्या व आधुनिक पध्दतीने वापरता यावी यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. एखाद्या नामवंत जाहिरात संस्थेत एक महिन्याची इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

००० ऑनलाइन अभ्यासक्रम

या संस्थेमार्फत पुढील ऑनलाइन अभ्यासक्रम करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हे अभ्यासक्रम ब्रँडिंग, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, व्यवसायवृध्दीसाठी ठरविण्यात येणाऱ्या सृजनशील व्युहनीती, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग  यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.

() ॲडव्हर्टायजिंग मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन, () ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट, () बिझिनेस मॅनेजमेंट, () डिजिटल मार्केटिंग, () डिजिटल मार्केटिंग ॲण्ड कम्युनिकेशन  () मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट मॅनेजमेंट, () स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड कम्युनिकेशन, () सेल्स ॲण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन, () मॅनेजिंग ब्रॅड ॲण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन, (१०) ई-कॉमर्स बिझिनेस मॅनेजमेंट, (११) रिटेल ॲण्ड शॉपर मार्केटिंग, (१२) मार्केट रिसर्च ॲण्ड ब्रॅण्ड कम्युनिकेशन, (१३) ॲडव्हान्स्ड डिजिटल ट्रॉन्सफॉर्मेशन प्रोग्रॅम,

या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी पुढील संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. () टॅलेन्ट एज- ईमेल- enquiry.dtd@talentedge.in, संकेतस्थळ-admissions.assistance@talentedge.com, दूरध्वनी-८३७  ६०००६००, () अपग्रेड – ईमेल-admissions@upgrad.com () आयव्होरी एज्युकेशन- ईमेल-  admission@ivoryeducation.in, दूरध्वनी- ८८६०४३८९९०  ()एमिरिटस- ईमेल- mica.execed@emeritus.org,दूरध्वनी – ७४१२०८१०८१

०००