(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या क्षेत्रात करिअरच्या विविधांगी संधी मिळू शकतात. नावीन्याचा शोध घेण्याची व सर्जनशीलता, कल्पकतेने समरसून काम करण्याची इच्छा व उर्जा असल्यास हे क्षेत्र समाधान आणि संपन्नता देण्यास समर्थ आहे.

प्रगतीच्या संधी

ज्वेलरी डिझायनिंगमध्ये एखाद्या कंपनीत सुरुवात केल्यानंतर अनुभव आणि विशिष्ट गुणवत्ता/दर्जा गाठल्यास स्वयंरोजगराचे दालन खुले होते. प्रारंभी या क्षेत्रात आठ ते दहा हजार रुपये इतका मेहताना मिळू शकतो. मात्र तुमची कला उत्कृष्टरीत्या सादर करु लागलात व त्यात गती घेतली तर या उत्पन्नात वेगाने वाढ शक्य आहे. ही कमाई दरमहा लाख रुपयांपर्यंतही राहू शकते.

भारतीय अर्थव्यवस्थेत हे क्षेत्र बऱ्यापैकी महत्वाची भूमिका बजावत असून परकीय चलन मिळवण्यात या क्षेत्राचा हातभार लागत आहे. जगातील २० टक्के सोन्याची खरेदी भारतात केली जाते. यातील महत्वाचा भाग हा दागिने आणि आभूषणे र्निर्मितीत जातो. सध्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना ब्रँडेड दागिने आणि आभुषणे हवी असतात. ब्रँडेडचा अर्थ, डिझाइन केलेले असा होतो. वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळया आभुषणांची खरेदी मोठी रक्कम खर्ची घालून केली जाते. काही तज्ज्ञांच्या मते या क्षेत्रात १.३ मिलियन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

 संस्था आणि अभ्यासक्रम

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जेम्स ॲण्ड ज्वेलरी-

अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ डिझाइन इन ज्वेलरी डिझाइन.या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम राज्यस्थान स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.या अभ्यासक्रमाला जनरल ॲबिलिटी टेस्ट (गॅट),डिझाइन ॲबिलिटी टेस्ट (डॅट) व्दारे प्रवेश दिला जातो आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो

करिअर संधी- (१) ज्वेलरी डिझायनर, (२) ज्वेलरी मर्कंडायझर,(३) व्हिज्युअल मर्कंडायझर, (४) डिझाइन कुऑर्डिनेटर

संपर्क – एसपी -१११, आर के डेरेवाला, सितापुरा, जयपूर, राजस्थान,-३०२०२२, दूरध्वनी- ०१४१-२७७०९९५ ईमेल- admissions.jaipur@iigj.com

बी.ए इन जेम्स ॲण्ड ज्वेलरी डिझाइन – या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट-  हा अभ्यासक्रम मुंबई कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमात दागिने/आभुषणे डिझायनिंगच्या संकल्पना, निर्मिती, संगणकाच्या साहाय्याने डिझायनिंग, विक्री आणि व्यवस्थापकीय कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे. कालावधी एक वर्षं. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी.

करिअर संधी- (१) डिझायनर, (२) मॅनेजर, (३) मर्कंडायजर, (४)इन्स्ट्रक्टर, (५) उद्योजक

संपर्क – () बागमल लक्ष्मीचंद पारिख कॅम्पस, प्लॉट नंबर – १११/२, १३ वा रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) – ४०००९३, दूरध्वनी- ०२२-४२९०६६६६, ईमेल- enquiries.mumbai@iigj.com

संकेतस्थळ – https://iigj.org/

000

इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट

या संस्थेने ज्वेलरी डिझाइनचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात दागिने आणि त्यासाठी लागणारे साहित्य, धातू आणि खडे यापासून तयार करावयाच्या दागिन्यांची चित्रे आणि रेखांकने, दागिन्यांच्या सूक्ष्म बाबी, धातूंचे पोत, दागिन्यांच्या विविध प्रकारांची निर्मिती, सोन्याचे मूल्य जोखणे, दागिने डिझायनिंगचे मूल्य निर्धारण करणे, हिरे आणि रंगीत खड्यांचे मूल्य निर्धारण करणे, आदी विषय घटकांचा समावेश आहे. कौशल्यनिर्मितीचा हा अभ्यासक्रम केल्यावर ज्वेलरी डिझायनर, फ्रीलान्सर डिझायनर, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग,ज्वेलरी रिटेलर आदी व्यवसाय वा करिअर संधी मिळू शकतात.

या संस्थेने ज्वेलरी डिझाइनसाठी कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मशिन टेक्नॉलॉजी या तंत्रकौशल्याला अवगत करण्यासाठी अभ्यासक्रम सुरु केला आहे. अत्याधुनिक टू डायमेंशेनल आणि थ्री डायमेंशेनल संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करुन असंख्य नावीन्यपूर्ण डिझाइन करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.

संपर्क – इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट, स्कूल ऑफ जेमॉलॉजी, ७०२, द कॅपिटल,  बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई -४०००५१,दूरध्वनी-०२२-403525७२५५0,  ईमेल-: india@igi.org संकेतस्थळ-https://www.igi.org/school-of-gemology/graduate-programs00000