(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट

 इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया – भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही एक महत्वाची संस्था आहे. कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील शिक्षण- प्रशिक्षण देणारी व नियमन करणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे.

संस्थेचे अभ्यासक्रम

सीएमए (कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटन्ट) फाउंडेशन कोर्स –  अर्हता – 12 वी उत्तीर्ण. इंटरमिजिएट अभ्यासक्रम – अर्हता – (1) सीएमए फाउंडेशन अभ्यासक्रमक उत्तीर्ण, (2) कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात.

अभ्यासक्रम करण्याचे फायदे – (1) सध्याच्या औद्योगिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. (2) विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम आणि औद्योगिक जगताला उपयुक्त ठरतील असे सीएमए विद्यार्थी, असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय आहे. (3) संगणकीय आणि व्यक्तित्व विकासाला उपुयक्त ठरणाऱ्या विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. (4) व्यवस्थापन, व्युहनीती, नियामक कार्यप्रणाली आणि वित्तीय अहवाल तयार करणे, या चार मुख्य घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. (5) औद्योगिक जगतास आवश्यक असणाऱ्या प्रात्यक्षिकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

प्रवेश प्रकिया –  फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाला वर्षभर प्रवेश दिला जातो. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जून महिन्यातील सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी 31 जानेवारीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी 31 जुलैपूर्वी प्रवेश घेणे आवश्यक आहे. अर्ज पोस्टाने पाठवता येतो.

काय शिकाल ?

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना (1) व्यवस्थापकीय निर्णय प्रकिया, (2) अर्थसंकल्पीय स्थैर्य, (3) प्रभावी कार्यान्वयन,(4) निर्मिती सेवा व्यवस्थापनाचे मूल्यांकन, (5) नफ्यातील तफावतीची कारणे आणि जबाबदार घटकांचा शोध घेणे याबाबींचे ज्ञान प्रदान केले जाते.

करिअर संधी

सीएमए  यांना शासकीय आस्थापना, खाजगी आस्थापना, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र विकास संस्था, शिक्षण – प्रशिक्षण आणि  संशोधन क्षेत्र  यामध्ये मोठी मागणी आहे. या मुनष्यबळाकडे असणाऱ्या स्पेशलाइज्ड ज्ञानामुळे बऱ्याच खाजगी आणि काही सार्वजनिक आस्थापनांमध्ये चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, फायनांस डायरेक्टर, फायनांशिअल कंट्रोलर, चिफ फायनांशिअल ऑफिसर, कॉस्ट कंट्रोलर, मार्केटिंग मॅनेजर, चिफ इंटरनल ऑडिटर अशा सारख्या महत्वाच्या पदांवर नियुक्तीची संधी मिळू शकते. त्यामुळे आपल्या देशात आणि परदेशातील वेगवेगळया उद्योग व व्यवसाय व शासकीय आस्थापनांमध्ये तज्ज्ञ, प्रशिक्षित आणि अनुभवी सीएमए मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर सीएमए व्यावसायिकदृष्ट्या सर्वोच्च स्थानी पोहचू शकतात. बऱ्याच सीएमएंनी स्वत:चा व्यवसाय वा उद्योग सुरु केला असून ज्ञानाच्या बळावर ते त्यात यशस्वी झाले आहेत. अनेक सीएमए हे मूल्याच्या बाबात सल्ला-सेवा देण्यात तज्ज्ञ झाले आहेत. बऱ्याच जणांना कॉस्ट आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षण या विषयाचे तज्ज्ञ म्हणून महाविद्यालयात शिकवण्यासाठी बोलावले जाते.

सीएमए  हे, एक्झाइज, सेबी-सेक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, एनएसडीएल-नॅशनल सेक्यिुरीटिज डिपॉझिटोरी लिमिटेड, इतर नियामक संस्था, सल्लागार संस्था येथे लेखापरीक्षणाच्या सेवा देऊ शकतात. केंद्रीय अकबारी विधिनीयम, सेवा कर कायदा, विविध राज्यांचे  करविषयक कायदे, केंद्रीय अकबारी कायद्याचे प्रमाणीकरण, कॉस्ट रेकॉर्डस मेंटनन्स सल्लागार, स्पेशल ऑडिट अंडर कस्टम्स ॲक्ट, बँकेचे स्टॉक लेखा परीक्षण, बँक क्षेत्रासाठी वसुली सल्लागार आदी क्षेत्रातही सीएमए स्वतंत्रपणे कार्य कार्य करु शकतात.

संपर्क– वेस्टर्न इंडिया रिजनल काउंसिल, रोहित चेम्बर्स, फोर्थ फ्लोअर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट मुंबई-400001, दूरध्वनी- 8828061444

ईमेल- wirc@icmai.in,संकेतस्थळ-www.icmai.in