
औषधी निर्मितीचे व्यवस्थापन
भारतातील औषधी निर्मिती उद्योग झपाट्याने वाढत आहे. विविध प्रकारच्या औषध निर्मिती करणारा भारत, जगातील आघाडीचा देश बनला आहे. भविष्यात विपुल करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासोबतच या उद्योगाच्या (१) व्यस्थापकीय,(२) विक्री आणि (३) विपणन या बाजू सांभाळणाऱ्या मनुष्यबळाचीसुध्दा गरज भासेल. त्याअनुषंगाने,एमबीए इन फार्मा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.
(१) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च
या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणा-या डिपार्टमेंट ऑफ फॉर्मास्युटिकलने औषधी निर्मिती, संशोधन आणि विकास क्षेत्राला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी केली आहे. या संस्थेची हैदराबाद, अहमदाबाद, गोहाटी, हाजीपूर,कोलकता, रायबरेली आणि एस.एस.नगर (नवी दिल्ली जवळ) येथे कॅम्पस सुरु करण्यात आले आहेत.
हैदराबाद कॅम्पस
या संस्थेस भारत सरकारने इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. येथे, एमबीए इन फॉर्मास्युटिकल मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी – दोन वर्षे. अर्हता- बी.फॉर्म किंवा केमिकल इंजिनीअरिंग मधील बी.टेक किंवा केमिकल अथवा इतर जैविक शास्त्रातील एम.एस्सी.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. या परीक्षेत मिळालेले गुण, मुलाखत आणि समूह चर्चा या आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.
प्लेसमेंट
या अभ्यासक्रमाचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन पुढील कंपन्या प्लेसमेंट प्रकियेत सामील होतात – नोवॅर्टिस, डॉ.रेड्डीज लेबारेटरी, अबॅाट इंडिया, सन फार्मा, ल्युपिन, सिनजिन,आयएमएस हेल्थ, पीफिजेर, कॅडिला, अलेंबिक, जीएसके, बायकॉन, ॲस्ट्रा, झेनेका, थर्मोफिशर, इनफिनीटी रिसर्च, ग्लॅन्ड फार्मा, वीवो बायोटे, विरचौ बायोटेक इत्यादी.
संपर्क– बालानगर, हैदराबाद- ५०००३७, दूरध्वनी- ०४०-२३०७३७४१, फॅक्स- २३०७३७५१, ईमेल- director@niperhyd.ac.in, संकेतस्थळ-
www.niperhyd.ac.in.
(२) एस.ए.एस नगर कॅम्पसमध्येही, एमबीए- फॉर्मास्युटिकल हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क– नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, सेक्टर ६७, एस.ए.एस नगर- १६००६२, दूरध्वनी- ०१७२-२२९२०००, ईमेल- registrar@niper.ac.in, संकेतस्थळ- https://niper.gov.in/
०००
(३) नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स-डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ बिझिनेस मॅनजमेंट या संस्थेने एमबीए इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
औषधी निर्मिती क्षेत्रातील व्यवस्थापकीय बाजू सांभाळण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते.
अर्हता– अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पुढील विषयांमध्ये पदवी मिळालेली असावी- फार्मसी, सायन्स, बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस. एमबीबीएस आणि बीटेक इन बायोटेक किंवा बायोमेडिकल या विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी सुध्दा अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
संपर्क– स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट,व्ही.एल.मेहता रोड, विलेपार्ले- पश्चिम, दूरध्वनी- ०२२-४२३५५५५५, संकेतस्थळ- nmims.edu
००००