
बँक : तंत्र आणि व्यवस्थापन
सध्या भारत आणि परदेशातील बँकिंग क्षेत्र हे अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याद्वारे बँक व्यवहारामध्ये गतिमानता, पारदर्शकता आणि अचुकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि सेवा यांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. खर्चात घट करुन अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल, यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. बँकाच्या विस्तार – विकास आणि वृध्दी यामध्ये तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज वाढली आहे. नव्या बँका, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांची सातत्याने वाढ होत असल्याने या तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढली आहे.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इंस्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी – या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम २०१६ साली सुरु केला. या संस्थेची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कार्यालयीन कामाकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, त्याचा विविध घटकांमध्ये अंतर्भाव करणे आणि या सर्वांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. या अभ्यासक्रमात सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान आणि उदयास येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, तंत्रज्ञानाने कार्यक्षम करण्यासाठी हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार उपयुक्त ठरु शकतात.
अर्हता – या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुण प्राप्त केलेला अभियांत्रिकी पदवीधर किंवा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी कॅट- कॉमन एंट्रन्स टेस्ट, मॅट- मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, सीमॅट- कॉमन मॅनेजमेट ॲडमिशन टेस्ट, झॅट- झेवियर ॲप्टिट्यूड टेस्ट, जीआरई – ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन, एआयएमए टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन (आत्मा) या परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना कोटक महिंद्र बँक, द साऊथ इंडियन बँक लिमिटेड, फेडेरल बँक, कॅथोलिक सिरियन बँक यासारख्या संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.
०००
एमटेक इन बँकिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी
या संस्थेने हैद्राबाद युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने, एमटेक इन बँकिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई/टेक किंवा एमसीए/ एमएस्सी (कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन सायंस/ इलेक्ट्रॉनिक्स) आणि गेट (ग्रज्युएट ॲपिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) मधील सुयोग्य गुण.
संपर्क- कासल हिल, रोड नंबर एक, मसाब टँक, हैदराबाद- ५०००५७, दूरध्वनी- ०४०-२३२९४१२१, संकेतस्थळ- www.idrbt.ac.in, ईमेल- program@ idrbt.ac.in
००००
पाँडेचरी युनिव्हर्सिटी
या संस्थेत (१) एमबीए इन बँकिंग टेक्नॉलॉजी, (2) एमबीए इन फायनांशिअल टेक्नॉलॉजी, हे अभ्यासक्रम करता येतात. अर्हता– बीई/ बीटेक/ बीएस्सी/ बीसीए (कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी), प्रवेशासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट -सीयूइटी-(पीजी) मधील गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क– रजिस्ट्रार, आर.वेंकटरमन नगर, कलापेट, पाँडिचेरी- ६०५०१४, दूरध्वनी- ०४१३-२६५५१७९, ईमेल-registrar@pondiuni.edu.in, संकेतस्थळ- http://www.pondiuni.edu.in/programmes
०००
बँकामधील इतर संधी
(1) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरिटज मार्केट्स (एनआयएसएम) – ही संस्था सिक्युरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, या संस्थेंतर्गत कार्यरत असणारी शिक्षण संस्था आहे. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) एलएलएम इन इनव्हेस्टमेंट ॲण्ड सेक्युरिटीज लॉ. कालावधी- एक वर्षं. अर्हता-५० टक्के गुणांसह एलएलबी. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट.(२) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन सेक्युरिटीज मार्केट (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट/ इनव्हेस्टमेंट ॲडव्हॉझरी/ रिसर्च ॲनॅलिसीस), कालावधी- १५ महिने/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. (३) पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (डेटा सायंस इन फायनांशिअल मार्केट्स), कालावधी- १४ महिने/अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.(४) या संस्थेने आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन सेक्युरिटीज मार्केट्स, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- १२ महिने (यापैकी एनआयएसएम मध्ये ९ महिने प्रत्यक्ष अध्ययन आणि आयसीआयसीआय बँकेत ३ महिने इंटर्नशीप)/ अर्हता -कोणत्याही विषयातील पदवी.(५)ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स इन इनव्हेस्टमेन्ट मॅनेजमेंट. अर्हता -कोणत्याही विषयातील पदवी.
संपर्क- प्लाट क्रमांक आयएस १ आणि २ पाताळगंगा इंडस्ट्रिअल एरिआ, मोहपाडा, रसायणी, जिल्हा रायगड, नवी मुंबई जवळ- ४१०२२२, दूरध्वनी- ०२२-६६८३००, संकेतस्थळ www.nism.ac.in
(2) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंट, फरिदाबाद– ही संस्था भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. यासंस्थेने एमबीए इन फायनांस हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु विद्यापीठाशी संलग्नित आहे. निवडीसाठी कॅट, मॅट, जीमॅट, झॅट, सीमॅट या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- अरुण जेठली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंट, सेक्टर ४८, पाली रोड, फरिदाबाद-१२१००१, हरयाणा, दूरध्वनी- ०१२९-२४६५२६८ ,संकेतस्थळ-www.nifm.ac.in, ईमेल- mbafm2023@ nifm.ac
(३) इंस्टिट्यूट ऑफ इंशुरन्स ॲण्ड रिस्क मॅनेजमेंट – (आयआयआरएम) हैदराबाद, या संस्थेची स्थापना इंश्युरंन्स रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथोरिटी ऑफ इंडिया –(आयआरडीएआय) आणि तेलंगणा सरकारने केली आहे. या संस्थेमार्फत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत (१) इंश्युरन्स, (२) ॲक्च्युरिअल सायन्स , (३) रिस्क मॅनेजमेंट, (४) फायनांस, या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. कालावधी – दोन वर्षे. उमेदवारांच्या निवडीसाठी- कॅट/ झॅट/ मॅट/ आत्मा/ जीमॅट/ सीमॅट या परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. विद्यार्थी आयआयआएम सीइटी ही परीक्षा देऊ शकतात. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- फायनांशिअल डिस्ट्रिक्ट, गाचीबोवली, हैदराबाद- ५०००३२, दूरध्वनी- ०४०-२३०००००५, संकेतस्थळ- www.iirmworld.org.in ,ईमेल-admissions@iirmworld.org.in
०००
याच संस्थेने पुढील दोन दूरस्थ शिक्षण (डिस्टंन्स एज्युकेशन) पध्दतीने अभ्यासक्रम सुरु केले आहेत.(१) इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लाइफ इंशुरन्स, (२) इंटरनॅशनल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जनरल इंशुरन्स, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क-theiirm.ac.in/distance-education
(4) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे – या संस्थेमार्फत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बँकिंग ॲण्ड फायनांशिvल सर्व्हिसेस) हा दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम संस्थेमार्फत चालवला जातो. या संस्थेची स्थापना १९६९ साली भारत सरकारच्या सल्लामसलतीने रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली. बँकिंग व्यवस्थेची थिंक टँक म्हणून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीमध्ये ५० टक्के गुण. राखीव संवर्गासाठी ५ टक्के गुणांमध्ये सूट. संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅट, सीमॅट, झॅट, जीमॅट, जीआरई मधील गुणांचा आधार घेतला जातो. या परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करतात, त्यातील निवडक विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य चाळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. संपर्क- डीन एज्युकेशन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, एनआयबीएम, पोस्ट ऑफिस, कोंढवे खुर्द पुणे- ४११०४८, संकेतस्थळ-http://pgdm.nibmindia.org, ईमेल-pgdm@nibmindia.org
(५) सिम्बॉयसीस स्कूल ऑफ बँकिंग ॲण्ड फायनांस पुणे – या संस्थेने एमबीए इन बँकिंग ॲण्ड फायनांस, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला स्नॅप (सिम्बॉयसीस नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. संपर्क- ॲडमिन ऑफिसर, सिम्बॉयसीस ऑफ बँकिंग ॲण्ड फायनांसेस, लव्हाळे, तालुका-मुळशी, पुणे-४१२११५, ईमेल-adminofficer@ssbf.edu.in, संकेतस्थळ- www.ssbf.edu.in,दूरध्वनी-020-28116284
(६) आयसीआयसीआय बँक आणि एनआयआयटी युनिव्हर्सिटी – या दोन्ही संस्थांनी संयुक्तरित्या, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनांस ॲण्ड बँकिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी-एक वर्षं. अभ्यासक्रम आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन दिले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना आयसीआयसीआय बँकेत, व्यवस्थापक या पदावर नियुक्ती मिळू शकते. संकेतस्थळ– www.icicicareers.com
000