
कृषीमाल प्रकिया व्यवसाय
कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकांनांमध्ये, प्रकिया केलेले काजू, सोप, मिरची पावडर, विविध प्रकारची पापडे, टोमॅटो सॉस, चटण्या, मसाले लोणची, अशी विविध प्रकारची उत्पादने असतात. या सर्व उत्पादनांची निर्मिती, कृषीआधारित प्रकिया व्यवसाय किंवा उद्योगांव्दारे केली जाते. यासर्व उत्पादनांना मोठी ग्राहकी लाभते.
कृषी आधारित, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायासातून रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या उत्तमोत्तम संधी निर्माण होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन, भारत सरकारच्या “उद्यमी,” प्रकल्पांतर्गत प्रोत्साहन दिलं जातं. त्याअनुषगांने विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. या योजनेचा लाभ, प्रधानमंत्री रोजगार र्निमिती कार्यक्रम योजनेंतर्गत, अर्थसाहाय्य करुन दिलं जातं.
देशाच्या औद्योगिक विकासामध्ये, कृषी आधारित प्रकिया उद्योगाचा मोठा हातभार लागतो. कृषीक्षेत्रातील कच्च्या मालावर प्रकिया करणारे उद्योग यात येतात. याप्रकिया उद्योगांमध्ये कृषी, वने आणि मासोळीपासून निर्मित वस्तुंच्या समावेश होतो.
प्रशिक्षण संधी
“उद्यमी’ प्रशिक्षण योजनेंतर्गत पुढील, कृषीआधारित अन्नप्रक्रिया उद्योगांच्या सर्वांगीण प्रशिक्षणाचा समावेश आहे- (१) मसाले तयार करण्याचा उद्योग, (२) टोमॅटो केचअप निर्मिती उद्योग, (३) टोमॅटो पुरी निर्मिती उद्योग, (४) बहुधान्य (मल्टीग्रेन) प्रकिया उद्योग आणि पॅकेजिंग, (५) काजू प्रकिया व्यवसाय, (६) किशमीश प्रकिया व्यवसाय, (७) पेठा निर्मिती व्यवसाय, (९) जिरा निर्मिती व्यवसाय, (१०) धने पावडर निर्मिती व्यवसाय, (११) गुळपावडर निर्मिती उद्योग, (१२) काळा तांदुळ प्रकिया व्यवसाय, (१३) मिरी पावडर निर्मिती व्यवसाय, (१४) बाजरी स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (१५) मसाला चहा निर्मिती प्रकिया, (१६) चिकोरी प्रकिया व्यवसाय, (१७) ग्रीन टी प्रकिया व्यवसाय, (१८) रोस्टेड मखाना प्रकिया व्यवसाय, (१९) तिखट निर्मिती व्यवसाय, (२०) सोप स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२१) उदीड दाळ पापड निर्मिती व्यवसाय, (२२) जिरे स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२३) फळ लगदा (पल्प) प्रक्रिया व्यवसाय, (२४) सत्तू पावडर प्रक्रिया व्यवसाय.
हे उद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना, संबंधित उद्योग/व्यवसायाची संपूर्ण माहिती ‘उद्यमी,’ प्रशिक्षण पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते. या पोर्टलवरच या उद्योग आणि व्यवसायाचे, प्रशिक्षण मॉड्यूल ठेवण्यात आले आहे. खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या मार्गदर्शन सूचीनुसार प्रशिक्षण मॉड्युल तयार करण्यात आले आहेत.
त्याव्दारे पुढील व्यवस्थापकीय आणि कार्यान्वयन कौशल्याचं ज्ञान प्रदान केलं जातं- (१) व्यवसाय नियोजन, (२) विपणन, (३) वित्त, (४) कार्यान्वयन, (५) निर्मिती, (६) विपणन, (७) ब्रँडिंग, (८) उद्योजकता व्यवस्थापन, (९) बँकिंग, (१०) माहिती तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवसाय, (११) बूककीपिंग, (१२) व्यवसायातील जोखिम आणि शास्वतता, (१३) शासकीय योजनांसाठी वैधानिक पूर्तता.
प्रशिक्षणाचे व्हिडियो इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषेत उपलब्ध आहेत. अभ्यासाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात उपरोक्त नमूद भाषेत उपलब्ध करुन दिले जातात. मूल्यांकनसुध्दा मराठी व उपरोक्त नमूद भाषांमध्ये उपलब्ध आहे. मूल्यांकनासाठी बहुपर्यायी प्रश्नसंच असतात.
अर्थसाहाय्य
प्रकिया उद्योगाला अर्थसाहाय्य देण्याची योजना, सूक्ष्म,मध्यम आणि लघु उद्योजकता मंत्रालयाच्यामार्फत, केंद्रिय खादी आणि ग्रामोद्योग विभागामार्फत राबवली जाते. राज्यपातळीवर, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकामार्फत, ही योजना राबवली जाते. खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत वित्तीय साहाय्य, नोडल बँकांव्दारे दिलं जातं. या योजनेव्दारे ग्रामीण आणि नागरी विभागात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याची क्षमता असणारे छोटे औद्योगिक घटक आणि प्रकल्पाची स्थापना व्हावी, असे अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील कुशल कारागिर आणि बेरोजगार युवकांना त्यांच्याच परिसरात शास्वत स्वरुपाच्या, रोजगार संधींची निर्मिती या योजनेव्दारे केली जाते. १८ वर्षावरील कोणत्याही इच्छुक व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पनाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
संपर्क- (१) हेल्पलाइन-९११८१३३५१३५, संकेतस्थळ- https://www.udyami.org.in/industrial-solution/agro-based-food-processing# आणि http://support.udyami.org.in, (२) ईमेल-
helpdesk@udyami.org.in
हेल्पलाइनच्या माध्यमातून पुढील सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात- (१) नोंदणी संदर्भातील विविध समस्यांचं निराकरण, (२) प्रशिक्षणासंदर्भातील तांत्रिक समस्यांचं निराकरण, (३) मूल्यांकनासंदर्भातील समस्यांचं निराकरण, (४) प्रमाणपत्राची निर्मिती आणि तपासणी, (५) व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन, (६) औद्योगिक कागदपत्रे, (७) तज्ज्ञांच्या मार्गदर्शन मालिका, (८) प्रकल्प अहवाल.
हेल्पलाइनच्या, कॉलसेंटरची सेवा दररोज सकाळी व ते रात्रौ ९ वाजेपर्यंत सुरु राहते.
सुरेश वांदिले