(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

ड्रॅगन सफारी

 

    सुट्टयांमध्ये फुल टू धम्माल करायचीयतेजोमीयन्नं जाहीर करुन टाकलं.

   अगं सुट्या त्याचसाठीअसतात.मौजमस्तीधम्मालआणि दंगा कराचीय, मात्र जराआईपासून सांभाळ हं,या सुट्याततुला कामाला जुंपायची..बाबा हसतहसत म्हणाले.मौजमस्ती करतानाघरातली छोटी छोटी कामंकरायला हरकत नाही बरंका,असंसांगायलाही ते विसरले नाहीत..बाबांनाछानसी पप्पी देऊन तेजोमयीबाप्पांच्या समोर उभी राहिली,अन्आता धम्माल करण्यासाठी तुम्हीनाही म्हणू नका,असं तिनेसांगितलं.

   अगं मी कधीनाही म्हणतो,कां खरंमुलांनी हेच करावं असचमला वाटत ना.पण मी तसंसांगू लागलो ?माझ्या मम्मीसहतुझीही मम्मी मला मोदकचद्यायच्या नाहीत..बाप्पा हसतहसत म्हणाले..

   विनोद नको हो बाप्पा..आपणकशी काय धम्माल करायचीते ठरवू या ना..

   ..के.बाप्पा विचारकरु लागले..

   त्यांना  काहीतरी आठवलं नि ते उत्साहानंम्हणाले, धम्माल करण्यासाठी ड्रॅगनलाबोलावू काय?

   ड्रॅगनचं नाव कानीपडताच,तेजोमयी चमकलीच.घाबरली सुध्दा..

      ss बापरे बापड्रॅगन.त्याच्या सोबत कशी कायधम्माल करणार.तो आपल्याधम्मालीचे बारा वाजणार..तेजोमयी म्हणाली

     एवढं बापरे बापकरायला काय झालं?दिसतं तसंनसतं.ड्रॅगन दिसायला जरी भयावहअसला तरी तो प्रेमळहीराहू शकतो.तू चित्रांशिवायप्रत्यक्ष ड्रॅगनला बघितलं आहेसका? बाप्पांनी विचारलं..

   नाही हो बाप्पा.ते आपल्यादेशात कुठे राहतात .मी असंऐकून आहे की ते चीनमध्येचराहतात..खरं आहे का?

   चीनमध्येच राहतात असंनाही तर जगात इतरत्रहीराहतात..बाप्पांनी सांगितलं.

000

2

    बाप्पा,हे ड्रॅगनआले तरी कुठून हो?तेजोमयीनंविचारलं.तिला ड्रॅगनची भीतीही वाटतहोती नि त्याचबरोबर त्याच्याबद्यल माहितीही जाणून घ्याविशीवाटत होती.तिची उत्सुकताबघून बाप्पांनी तिला ड्रॅगनसफारीवर न्यायचं ठरवलं..

   तेजू तू माझ्यासोबत ड्रॅगन सफारीवरच कांबरं चलत नाहीत.तुला या ड्रॅगनचीमाहितीही कळेल नि धम्मालहीकरतायेईल..

   ड्रॅगन सफारीची आयडीयातेजोमयीला पटली नि तिनेहोकार दिला.मुषक स्वामीहीखुष झाले.कारण बरेचदिवस झाले ते कुठेचअशा सफारीवर गेले नव्हते.अशासफारी म्हणजे नवे ज्ञान ,नवीमाहिती अन नवी चविष्टमेजवाणी मिळण्याचा हुकमी एक्का,हे त्यांनाइतक्या दिवसांच्या अनुभवांवरुनचांगलंच कळलं होतं.त्यामुळे ते चारहीपायावर तयार झाले.

बाप्पा,मुषकस्वामींवर बसले आणि ,तेजामयी बाप्पांच्याखांद्यावर बसली.मुषक स्वामींनीआकाशात सुरु घेतला.ढगांमधून प्रवाससुरु झाला.या प्रवासातचबाप्पा तिला सांगू लागले..

000

3

    अगं,ड्रॅगनच्या चित्राकडेबारकाईनं बघितलं तर तुझ्यालक्षात येईल की ते सापासारखेदिसतात.तशीच शेपटी,नागासारखे अणुकचिदारदात,वळवळवणारीजिभ,नागमोडीवळण घेणारं शरीर.असचं दिसतंनाही का?आपल्या घरीअसलेल्या पालीला मोठ्ठं केलंतर ती सुध्दा ड्रॅगनदिसू लागेल.

    ड्रॅगन म्हणजे सापआणि पालीचा भाऊ असंम्हणायचं का बाप्पा आपण.

    अगं तो त्यांच्याचकुळातला.ड्रॅगनचं महत्वाचं वैशिष्ट म्हणजेतो सारखा आग ओकतो.उडूशकतो,चक्रीवादळ,अतिवृष्टीसाठी कारणीभूत ठरतो असंसमजलं जातं.तो नेहमीकोणत्यातरी संपत्तीचं रक्षण करतो.या संपत्तीचंहरण करु इच्छिणाऱ्याशी मुकाबलाकरुन त्याला ठार करतो.ड्रॅगनलामानवी रुप घेण्याची विद्याप्राप्त झाली असते.काही पुराणकथांमध्ये ड्रगनला बोलता येतं असंहीसांगितलं जातं.ड्रॅगन नेहमीचअवाढव्य असतीलच असं नाहीतर युरोपातील काही लोककथांमध्येपालीएवढे ड्रॅगन असल्याचा उल्लेखआहे.चल तुलामी आता काही प्रसिध्दड्रॅगनशी ओळख करुन देतो.बाप्पाम्हणाले.

    हे ड्रॅगन राहतातकुठे हो बाप्पा ,तेजोमयीने विचारलं.

   स्वर्गातल्या प्राणीसंग्रहालयात.

    मग आपण आतास्वर्गात जायचं काय?

   मग तिकडेच चाललोतना आपण आता..

   थोडयाच वेळात मुषकस्वामी स्वर्गातल्या प्राणीसंग्रहालया जवळ येऊन थांबले.बाप्पाखाली उतरले नि तेजोमयीहीत्यांच्या खांद्यावरुन खालीउतरली.

000

4

   स्वर्गातलं प्राणीसंग्रहालय पृथ्वीवरच्या प्राणीसंग्रहालासारखं बंदिस्त नव्हतं.ते उघडचहोतं.विविध प्राणी इकडून तिकडेजात होते.बाप्पा दिसताचत्यांना दंडवतं घालत होते.हे बघूनतेजोमयीला मजा वाटत होती.

      तो बघ..प्राणी संग्रहालयातल्या एका प्राण्याकडे बोटदाखवत बाप्पा म्हणाले..

   त्या ड्रॅगनला होतूपुकूया नावानं ओळखलं जातं.तो न्युझिलंडदेशातला.त्याने अनेक प्रवाशांना ठारकेलं होतं.

    बाप्पा त्याला जा म्हणावंपरत.आपल्याकडे  बोलावू नका..तेजोमयी घाबरुनम्हणाली.बाप्पा हसले आणि त्यालापरत पाठवले.दूसऱ्या ड्रॅगनकडेबाप्पांनी तेजोमयीचं लक्ष वेधलं..

    याला तिम्मत नावानंओळखलं जातो.तो बेबिलोनियादेशाचा बरं का? समुद्र तळाशीराहतो.बेबिलॉन देशाच्या परमेश्वराचा जन्मदातायालाच समजलं जातं.बाप्पा म्हणाले.तिम्मतबाप्पांच्या जवळ आला नि त्यानेबाप्पांच्या पायावर डोके ठेवले.तिम्मतप्रेमळ वाटत होता.त्याला बघूनतेजोमयीला भीती वाटली नाहीत्यामुळे तेजोमयीने तिम्मतच्या पायावरडोके ठेवले.तेजोमयीला आशीर्वाददेऊन तिम्मत रमत गमतपुढे निघून निघून गेला.

00

5

   स्वर्गातल्या प्राणीसंग्रहालयात बरच पुढे गेल्यावर ,एकेठिकाणी बाप्पांनी लर्नियन हायड्राये माझ्या राज्या,अशी हाकदिली. तेव्हा त्यांच्या समोर तीनचार ड्रॅगन प्रगटले..या ड्रॅगनलाअनेक मुख होते.त्या ड्रॅगनेहीबाप्पांना दंडवत घातला.

   हा ड्रॅगन पाण्यातराहतो. ग्रीक देशाच्या या ड्रॅगनचंएखादे मुख कापलं तर ताबडतोबतिथं दुसरं येतं.बाप्पा म्हणाले.लर्नियनहीहसला नि त्याने आकाशातल्यापोकळीत सूर मारला.

   थोडं पुढं गेल्यावर  बाप्पांनी वैत्र वैत्रअशी हाक मारली.आकाशात वैत्रानंदर्शन दिलं.हा ड्रॅगनभारतातला.या वैत्रने पुराणकाळात आकाशातीलसर्व जल पिऊन टाकलंहोतं.त्यानंतर तो एका पर्वतालाविळखा घालून आराम करतबसला.देवांचा राजा इंद्राने त्याच्यावरहल्ला करुन त्याला ठारकेलं आणि आकाशातील जलालामुक्त केलं.बाप्पांनी सांगितलं.

    बाप्पा,हा वैत्रमला गिळून टाकणार तर नाहीना..तेजोयमीनंघाबरुन विचारलं.

    अगं तो काहीकरणार नाही.बघ कसामलूल झालाय आता.मी बोलावलयम्हणून तो आलाय.

    वैत्रने मोठया कष्टानंबाप्पांना नमस्कार केला आणितो माघारी वळला.

000

6

    आकाशात एक प्रचंडमोठा ड्रॅगन दिसू लागला.हा ड्रॅगनउत्तर अमेरिकेतला आहे.बाप्पांनीत्याच्याकडे बोट दाखवत माहितीदिली.

    बाप्पा यांचं नावंकाय हो,

    क्वेटजालकोटी….हे याचंनावं.हा उडणारा ड्रॅगन आहे.उत्तरअमेरिकेतील काही जमातींना हा या विश्वाचानिर्माता वाटतो.

    तेजोमयीने क्वेटजालकोटीला भक्तिभावानेप्रणिपात केला.त्यानेही शेपटीहलवून तिला आशीर्वाद दिलाआणि तो माघारी वळताच  आकाशात नवा ड्रॅगनअवतरला.हा जर्मनिचा फाफनिर.बाप्पांना माहितीदिली.

   हा देवाचा आवडताड्रॅगन होता.देवानं त्यालासोन्याचं कडंही दिलं होतं.पण हा नंतरखूप स्वार्थी झाला.त्यामुळे देवाच्यामनातून उतरला.बाप्पा म्हणाले.फाफनिरकसुनसा हसला नि तो माघारीवळला.त्यानतर बाप्पांनी गोईन,ग्रॅबक,ग्रॅवीतनीर आणिग्रॅफवोलूड या ड्रॅगन्सना हाकमारली.हे चारही नार्वे देशातले.त्यांच्यामुक्काम नेहमी यग्राडीसील या जीवनवृक्षाखाली असतो.ते प्रेमळ असतात.अशी माहितीदिली.चारही ड्रॅगन वेगाने बाप्पांकडेआले नि बाप्पांच्या भवतालएक नृत्यकरुन वेगाने माघारीपरतले.

    त्यानंतर बाप्पांनी ची लूंगवाँग अशी हाक मारली.आकाशातचीलूंगवॉगदिसू लागला.

    चीलूंगवाँग हा चीनमधीलड्रॅगन्सचा राजा समजला जातो.हा आगिलाआटोक्यात आणण्यात माहीर समजलाजातो.बाप्पांनी सांगितलं.

    म्हणजे हा फायरफायटर म्हणायचा.

    अगदी बरोबर.बाप्पा म्हणाले.चीलूंगवांगथोडा वेळ आकाशात राहिलाआणि नंतर तो अदृष्यझाला.

000

7

    आता कोणत्या ड्रॅगनलाबोलवणार बाप्पा..तेजोमयीनं विचारलं.

    आता कुणालाही बोलावणारनाही.पण मला सांग आतातरी तुझी भीती दूरझाली की नाही ते सांगबघू आधी.

    झाली ना..

    अगं आपल्याला बरचकाही माहीत नसतं.आपण उगिचचभीत राहतो.खरय नं..

    होय बाप्पा.. तेजोमयी म्हणाली.

   चला तर मग परतपृथ्वीवर बाप्पा म्हणाले.बाप्पा मुषकस्वामी वर बसले नि तेजोमयीबाप्पांच्या खांद्यावर बसली.मुषक स्वामीनेपृथ्वीकडे झेप घेतली.

ड्रॅगनसफारीनं तेजोमयी भारावून गेलीहोती.मातीचा किल्ला करतानातिने त्या किल्ल्याच्या रक्षणासाठीएक ड्रॅगन बनवला.तिला चकलीच्याआकारात ड्रॅगन दिसला.सेव म्हणजेड्रॅगनची पिल्ल तर नाहीतना अशी शंका तिलाआली.कंरज्याचेआकार तिला तसेच वाटूलागले..बाप्पांनाही तिनं तसं सांगितलं..

   हीच तर खरीधम्माल..मौज नाही का तेजू.. बाप्पासोंड हलवित म्हणाले.ती हलणारीसोंड तेजोमयीला ड्रॅगनच वाटलं..आणितीच तिलाच हसू आलं..

 

000000

 

सुरेश वांदिले

वाय 1/15

शासकीय वसाहत ,वांद्रेपूर्व मुंबई 51

9324973947