विकेट उडाली बाबांची
विनयच्याघरी आज फार खडाजंगीझाली. त्याचं कारण घडलंएक पिटुकला वाद.
बाबाम्हणाले उन्हाळयाच्या सुटीतगोष्टीची खूप पुस्तक वाचायची.त्यासाठीवाचनालय लावायचं.विनयने मात्र पुस्तक वाचाण्यासाठीठाम नकार दिला.वर्षभर अभ्यासाची पुस्तकंवाचलीत आता परत पुन्हापुस्तक वाचायची नाहीत.त्याने सांगितलं.
मग कायउंडारक्या करत टाइमपासकरणार आहेस का?बाबा ओरडले.
मी कुठेउंडारक्या करणार म्हणतोय.
पुस्तकंनाही वाचणार म्हणजे याचाअर्थ मी काय समजायचा?
अहोबाबा तुम्ही जरा गोष्टींच्यापुस्तकांच्या पलिकडे बघाना.
शहाण्या ,तू मलासमजवणार आहेस का आता.
छे हो बाबामोठयांना कुठं समजावयचं असतं.लहानांनीचसमजून घ्यायचं असतं.
हे बघ तू फारचआगावू झालास हं.
बाबामी म्हणालो की गोष्टींच्यापुस्तकांच्या पलिकडे बघू या ना..
तुलाम्हणायच तरी काय?
बाबावर्षभर माझ्या असं लक्षातआलय की माझी शब्दसंपत्तीफारशी चांगली नाहीय.या उन्हाळयातही शब्दीसंपत्ती गोळाकरण्यात घालवली तर मलाकिती फायदा होईल नाही.अहो वेगेवगळी पुस्तकंवाचतांना या शब्दांचाच मलाफायदा होईल की नाही?तुम्हीच सांगा.
आता यावर काय बोलावं हे बाबांना कळेना. विनयने त्यांची चांगलीच विकेट घेतली होती.
सुरेश वांदिले
.jpg)