(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

शामची आई

     रामच्या आईने त्याच्यासाठीहॅरी पॉटरची आख्खी सिरीजचआणली.

    वाव,राम म्हणाला,

    त्याच दिवशी आजिनेत्याच्यासाठी शामची आई हे पुस्तकआणलं.त्यावर काय प्रतिक्रियाद्यावी हे रामला कळलनाही.

    हॅरी पॉटर आणिशामची आई हे दोन्हीपुस्तकं त्यानं टेबलावर ठेवलं.कधीया पुस्तकाकडे तो बघायचातर कधी त्या बघायचा.कोणत्यापुस्तकाने वाचायला सुरुवात करायचं,या गोंधळातपडला.त्यामुळे दोनदिवस त्याने कोणत्याच पुस्तकालाहात लावला नाही.ही गमंतआजोबांच्या लक्षात आली.

    किती वाचून झालंपुस्तकं रे बाळा,आजोबांनीविचारलं.

    कसलं काय नि कसलंकाय,हे पुस्तक वाचावकी तेच मला कळतनाही हो आजोबा.

    आधी शामची आई वाचना..त्यादोघांच्या संभाषणात भागघेत आजी म्हणाली.

    नको,आधी हॅरीपॉटर वाच..आजीचं बोलणंऐकून आई म्हणाली.

    अगं शामच्या आईतंसंस्काराचे मोती आहेत.आजीम्हणाली.

    हॅरी पॉटर मध्येसाहस ,बुध्दीचातुर्य,स्मार्टनेसचंसोनं आहे.आई उत्तरली.तुम्हादोघिचं तू तू मै मै सुरुझालं वाटतं पुन्हा..दोघींचाआवाज ऐकून बाबाही या संभाषणातसहभागी झाले.

    तुम्ही गप्प बसाहो..मी म्हणते ही रामचीआई जिवंत असताना शामचीआई कशाला हवी बरंसंस्कार करायला..आई बाबांनाकिंचित घुश्यात म्हणाली.

    बरं बाई,मी माझंम्हणणं मागे घेते.त्यालाहॅरी पॉटरच वाचू दे.आजीसमजुतीच्या स्वरात म्हणाली.

    नको नको,मीसुध्दामाझं म्हणंनं मागे घेते,त्यालाआधी शामची आईच वाचूदे..

वा.वा दोघीहीदोन घर मागे गेलातते बरं झालं..आताआपण यावरचा छान उपायकाढू या..आजोबा उत्तरले.

    म्हणजे हो कायपप्पा..बाबा म्हणाले.

    अरे गोविंदा,पुस्तकांचीछान मजा असते रे..ती रामूलाघेऊ द्याना.एक तर एकाचवेळी एकच पुस्तक वाचायलाद्या.नाहीतर वाचायलाच देऊनका.म्हणजे गोंधळ नकोना..अभ्यासाची पुस्तकंवाचता वाचता कधी वेळकाढणार तो .विचार करा.मलावाटतं त्यानं आधी सक्षममनाचा शाम समजून घ्यावानि मग समर्थ हॅरीलाभेटावं.कसा काय वाटतोतोडगा..

    छानच आहे की..

    जमलं तर शामची आई पाठवून देऊ या ना त्या जादूच्या शाळेतील मुलांना वाचण्यासाठी.त्यांच्यावरही छान संस्कार होतील..जादूचा उपयोग मग ते फक्त चांगल्याच कार्यासाठी करतील. आजोबा म्हणाले.

सुरेश वांदिले