(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

टंकलू आणि छंकू

टंकलूच्या पाळीव कुत्र्याचं नाव होतं छंकू. त्याचं फारच असायचं भुंकू भुंकू..

छंकूला आपल्या भुंकण्याचा जरा अभिमानच होता. आपलं भुंकणं क्लास असल्याचं त्याला वाटायचं..

टंकलू आणि छंकूचं तसं चांगलं जमायचं नाही..मात्र बाबांच्या आग्रहापोटी टंकलू त्याला दररोज मैदानात खेळायला न्यायचा..छंकूला वाटायचं आपणच टंकलूला मैदानात नेतो..

पण त्याला प्रश्न पडायचा की आपल्या गळयात साखळी कां बरं..साखळी तर टंकलूच्या गळयात असायला हवी

या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी त्याने कितिदा अंग खाजवलं. आपली शेपूट नळीत घातली तरी ती वाकडीच कां राहते या प्रश्नाचं उत्तर ज्याप्रमाणं मिळत नाही. तसाच हाही प्रश्न गहन असावा. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर मिळत नसावं असं स्वत: समाधान छंकूनं करुन घेतलं..

    रस्त्यावरुन जाताना स्मार्टनेस दाखवण्याची एकही संधी छंकू दवडत नसे..टंकलूला मात्र हा ओव्हरस्मार्टनेस वाटायचा.तो छंकूला चूप बसवायचा प्रयत्न करु लागला तर छंकू त्याच्यावरच भू भू करुन ,तुला काही कळत नाही,असं काहीस सांगू बघायचा

रस्त्यावरुन जाणारे येणारे लोक ही गंमत बघायचे..टंकलूला लोक हसताहेत असं समजून छंकू खुष व्हायचाटंकलू असाकसा बुध्दू आणि महामूर्खयाचं राहून राहून त्याला आश्चर्य वाटायचं

छंकूने एकदा सकाळी आणि एकदा रात्री आभाळातल्या देवाला सुध्दा याचं कारण विचारलं होतं..पण सकाळच्या आणि रात्रिच्याही देवानं त्याच्या याही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतंआपल्या कोणत्याच प्रश्न उत्तर कां मिळत नाही याचं छंकूला आश्चर्य वाटे

कदाचित आपल्या बुध्दिमान प्रश्नांची उत्तरं कुणाकडेही नसावित म्हणूनच असं होत असावं अशी समजूत घालत तो स्वत:वर बेहद्द खुष व्हायचा.

    एकदा मैदानात गंमतच घडली. क्रिकेटची बॅट आणि बॉल घेउुन टंकलू  मैदानात खेळायला गेलेला. सोबत छंकू होताच. आज टंकलूने घातलेल्या टी शर्टवर लाल रंगाच्या बॉलचं चित्र होतं. टंकलू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळू लागला. दूरवर बॉल गेला की छंकूला बॉल घेउुन येण्यासाठी टंकलू सांगायचा..बॉलच्या पाठलाग करताना छंकूचं लक्ष एकदा टंकलूच्या टीशर्टकडे गेलं. तो आश्चर्यचकित झालाटंकलूच्या टीशर्टवरचा बॉल खरा की मैदानावरचा बॉल खरा..हा गोंधळ त्याच्या मनात उडाला. त्यामुळे बॉलकडे धाव घेताना तो कधी टंकलूच्या टीशर्टवरील बॉलकडे बघायचा तर कधी मैदानातील बॉलकडे..

त्यामुळे इकडे धावयाचं की तिकडे असा प्रश्न त्याला पडायचा.. देान्हीकडे एकच बॉल कसा काय असू शकतोही जादू तर नाही ना..अशी शंका त्याला येउु लागली..तो सावध झाला

ही जादू हाणून पाडायची असा निश्चय त्याने गूपचूप  केलापुढचा बॉल आणण्यासाठी जेव्हा टंकलूने त्याला सांगितलं तेव्हा छंकू बॉलकडे धावता थेट टंकलूकडे धावला. त्याने बॉल पकडण्यासाठी टंकलूच्या टीशर्टवर उडी घेतली..

अरे अरे हे चाललय काय तुझं…”असं टंकलू कसाबसा म्हणू शकला..कारण छंकूनं त्याच्या टीशर्टवर उडी मारल्याने तो धडपडून खाली पडला..

छंकू त्याच्या छातीवर चढून टीशर्टवरील बॉल पकडू लागला..पण तिथे तर बॉल नव्हता..बॉल दिसतो पण आपल्याला सापडत कां नाही..या प्रश्नानं छंकू बेजार झाला.

टीशर्टवरील बॉलकडे पाहून भुंकू लागला..एव्हाना टंकलूच्या मित्रांनी मैदानातील बॉल टंकलूकडे फेकला..तो बॉल बघताच छंकूच्या गोंधळात भरच पडली..तो टंकलूच्या छातीवरुन खाली उतरला..नि हा बॉल बघू लागला..या बॉलला पकडणार तोच त्याने एक पाउुल मागे घेतलं..

त्याने मान वळवून टंकलूच्या टीशर्टवरल बॉलकडे बघितलं..त्याला धक्काच बसला..पुन्हा मान वळवून त्याने खऱ्या बॉलकडे बघितलं..एकच बॉल दोन्हीकडे कसाआता त्याची खात्रीच पटलीकुणीतरी जादू करतोय याची..

जादू..बापरे..या जादूनं आपणही बॉल व्हायचो असं छंकूला वाटलं नि त्याने मैदानातून धूम ठोकलीसगळा प्रकार टंकलूच्या लक्षात आला नि तो पोट धरुन हसू लागला….

 

सुरेशवांदिले

00000