
लॉ : नवे स्मार्ट अभ्यासक्रम
(१)नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद
नॅशनल ॲकॅडेमी ऑफ लिगल स्टडीज ॲण्ड रिसर्च (नाल्सार) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद
या संस्थेच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात- (१) बीबीए- एमबीए (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेट). या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा (नालसार मॅनेजमेंट एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट) अथवा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत घेण्यात येणाऱ्या आयपीएमएटी (इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट) चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.
(२) एमबीए- या अभ्यासक्रमांतर्गत (१) कोर्ट मॅनेजमेंट, (२) इनोव्हेशन ॲण्ड सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट, (३) सप्लाय चेन ॲण्ड ऑपरेशन मॅनेजमेंट, (४) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, (५) बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (६) बिझिनेस रेग्युलेशन्स, (७) कॉर्पोरेट गर्व्हनन्स, (८) मार्केटिंग (९), फायनांशिअल सर्व्हिसेस ॲण्ड कॅपिटल मार्केट्स. या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट या परीक्षेत ७० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज नसते.
संपर्क -https://doms.nalsar.ac.in/
०००
(२)नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूर
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूरने, एमबीए इन इंश्युरंस हा दोन वर्षे कालवधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना १० वी, १२वी आणि कोणत्याही विषयातील पदवी अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेशासाठी ७० टक्के वेटेज हे शैक्षणिक कामगिरीला दिलं जातं. प्रत्येकी १५ टक्के वेटेज हे समुह चर्चा आणि मुलाखतीला दिलं जातं. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.
संपर्क- https://nlujodhpur.ac.in/university/mba-insurance
०००
(३)नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बेंगळुरु
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बेंगळुरु, मार्फत दोन वर्षे कालावधीचा, मास्टर इन पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. इच्छूक उमेदवारांना कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी, नॅशनल लॉ स्कूल ॲडमिशन टेस्ट (एनएलएसएटी) ही परीक्षा द्यावी लागते.
संपर्क-https://www.nls.ac.in/programme/master-of-public-policy/
(४) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औंरगाबदच्या अंतर्गत, स्कूल ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या स्कूलमार्फत व्यवस्थापन व विधी शिक्षणाचे सांगड घालणारे पुढील अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
(१) इंटिग्रेटेड बीबीए-एमबीए इन लॉ ॲण्ड मॅनेजमेंट, कालावधी-पाच वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी क्लॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ६० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यापैकी ३७ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ३० टक्के जागा महिलांसाठी व ५ टक्के जागा दिव्यांग संवर्गासाठी राखीव आहेत. इतर २३ जागा या अखिल भारतीय स्तरावरील आहेत.
(३) एमबीए इन-फायनांशिअल सर्व्हिसेस ॲण्ड कोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन, कालावधी-दोन वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वाटर लॉ, पॉलिसी ॲण्ड गर्व्हनन्स- हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम वॉटर पॉलिसी सेंटरच्या सहकार्यानं सुरु करण्यात आला आहे. पाण्याच्या अनुषंगानं सध्या निर्माण झालेल्या समस्या आणि प्रश्न, भाविष्यातील व्यामिश्र समस्या याविषयी सखोल ज्ञान, देणारा हा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधरास हा अभ्यासक्रम करता येतो. क्लॅट- पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी, पैठण रोड कांचनवाडी, औरंगाबाद-४३१००५, ईमेल- support@mnlua.ac.in संकेतस्थळ https://mnlua.ac.in/contact
०००
०००
सुरेश वांदिले