(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मेरी ब्युटी,मेरा आयुर्वेद

गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडे बरेचजण वळले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही संधी वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेनं अल्पमुदतीचा, सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ सौंदर्य आयुर्वेद मार्फत सुरु करण्यात आला आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ही आयुर्वेदाच्या विविध ज्ञानशाखांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी महत्वाची संस्था. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेस, राष्ट्रीय महत्वाची संस्था (इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी) म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील तंत्राचा वापर करण्याचं ज्ञान प्रदान केलं जातं. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- () त्वचेची संकल्पना आणि पचनक्रिया, () आयुर्वेदिक प्रकृतीवर आधारीत त्वचा प्रकाराचे मूल्यांकन, () आयुर्वेदातील तत्वं वापरुन त्वचेची स्वच्छता आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्याच्या पध्दती, () त्वचेवरील डाग नष्ट करणं, () दररोजची शरीर स्वच्छता, () विविध औषध वनस्पतींचा वापर करण्यात येणाऱ्या आणि सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त ठरतील अशा स्वेदना, अलेपा यासारख्या आयुर्वेदिक प्रक्रिया/पध्दती, () सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक जीवनशैली, () सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक आहार आणि पोषणमूल्यांचे ज्ञान, () विविध मुखलेप (फेसपॅक) निर्मितीचे तंत्र, (१०) मुखअभ्यंग (फेसमसाज) आणि मुखलेपनम (फेसलेप)चा वापर, (११) आयुर्वेद पध्दतीने दंत- डोळे- नख- ओठांची काळजी घेणाऱ्या औषधी वनस्पतीपासूनचे उत्पादन, (१२) हस्तपादप्रसाधनम (आयुर्वेदिक मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर), (१३) केशआयुर्वेदाची संकल्पना – केसांचे प्रकार, वाढ आणि आरोग्यदायी केसांसाठी पोषण आहार, (१४) प्रकृतीनुसार केसांचे मूल्यांकन, (१५) केशप्रकाशलनविधी- आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन केस स्वच्छ करण्याचं/धुण्याचं तंत्र, (१६) दररोज घ्यावयाची केसांची काळजी, (१७) केसगळती थांबवण्याचं, कोंड्यावर नियंत्रण ठेवण्याचं आणि अकाली केस पांढरे होण्यापासून थांबवण्याचं आयुर्वेदिक तंत्र आणि व्यवस्थापन, (१८) आयुर्वेदिक हेअर स्पा, आयुर्वेदिक हेअर डाय, हेअर पॅक, (१८) शिरोलेपमचे प्रात्यक्षिक, (१९) शिरोअभ्यंगमचे प्रात्यक्षिक, (२०) धुपना आणि केसांची काळजी घेण्याचे इतर तंत्र इत्यादी.

प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर दिला जातो. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी मध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमाचं साहित्य उमेदवारांना दिलं जातं.

प्रवेश प्रक्रिया

अर्हता – कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. अर्जाचे शुल्क खुल्या संवर्गासाठी ३०० रुपये. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गासाठी १५० रुपये.

 

संपर्क – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरवार सिंग गेट, अमर रोड जयपूर -३०२००२, दूरध्वनी – ०१४१- २६३५८१६, संकेतस्थळ-nia.nic.in, ईमेल- nic-rj@nic.in