
आयुर्वेद औषधनिर्मिती
करोना काळात आयुर्वेदिक औषधे आणि आयुर्वेदिक आरोग्यविषयक उत्पादनांची (हेल्थ प्रॉडक्ट) मागणी जगभर मोठ्या प्रमाणात वाढली. आयुर्वेद औषधे आणि उत्पादने यांच्या याअनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास केला असून, त्यांच्या निष्कर्षानुसार २०५० पर्यंत हा व्यवसाय जागतिक पातळीवर ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचू शकतो. आयुर्वेदिक औषधी किंवा अन्नपदार्थांचे शरीरावर शून्य दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स), जागतिक दर्जाचे गुवणवत्ता नियंत्रण, आणि गेल्या दशकभरात या औषधांचे जागतिक पातळीवर प्रमाणिकरन किंवा विधिग्राह्यतेची वाढलेली गती यामुळे आयुर्वेदाशी निगडित उद्योगांचा झपाट्याने विकास होताना दिसतो.. ही वाढ लक्षात घेता पुढील काळात या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी निर्माण होऊ शकतात. औषधीनिर्मिती शिवाय, औषधी आणि सुंगधी वनस्पतींची लागवड, आयुर्वेद औषधीनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा व्यापार, औषधीयुक्त वनस्पतीमधील द्रव्य बाहेर काढणे या बाबींनासुध्दा सध्या जागतिक पातळीवर मागणी वाढली आहे. याशिवाय आयुर्वेदिक प्रसाधने, आयुर्वेदिक अन्नपदार्थे यांच्या निर्मितीसही चालना मिळाली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना भारतीय आणि जागतिक पातळीवरील आयुर्वेद औषधे, अन्नपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधने निर्मिती करणाऱ्या कंपन्या/उद्योगांमध्ये, निर्मिती प्रकिया, उत्पादन प्रक्रिया, संशोधन, औषधांचा शोध, गुणवत्ता नियंत्रण, नियामक तत्ज्ञ अशासारख्या संधी मिळू शकतात. स्वत:च्या दुकांनासोबतच संबंधित उमेदवार लघु प्रमाणावरील औषधी निर्मितीचे संयंत्र सुध्दा टाकू शकतो. भारत सरकारने आयुर्वेदिक औषधी आणि इतर उत्पादनाच्या निर्मितीमध्ये असणाऱ्या लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांसाठी अर्थसाहाय्याचे मोठे पॅकेज घोषित केले आहे.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायंसेस ही आपल्या देशातील आयुर्वेद औषध निर्मितीशास्त्राचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था. या क्षेत्रातील महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या संस्थेस, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इर्म्पाटन्सचा गेल्या वर्षी दर्जा दिला असून यापुढे ही संस्था इंस्टिट्यूट ऑफ टिचिंग ॲण्ड रिसर्च इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायंसेस या नावाने ओळखली जाईल.
या संस्थेत आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म), बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म) हे अभ्यासक्रम करता येतात.
डी.फॉर्म- कालावधी दोन वर्षे. १० वीतील गुण आाणि मुलाखतीव्दारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमात रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्वशास्त्र), औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर उमदेवार आयुर्वेदिक औषधालय टाकू शकतो. या उमेदवारास शासकीय रुग्णालयाच्या औषधालयातील तज्ज्ञ वाटपदार (Pharmacist), आयुर्वेद औषधी निर्मिती कंपन्यासाठी मार्केटिंग (विपणन), औषध तयार करणारा तज्ज्ञ (Dispenser) आदी करिअर संधी मिळू शकतात.
बी.फॉर्म- कालावधी चार वर्षे. अर्हता- १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण. १२ वीतील गुण आणि मुलाखतीव्दारे अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. या अभ्यासक्रमात औषधीनिर्मितीचे रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान, औषधीनिर्मितीची अभियांत्रिकी, औषधीनिर्मितीचे जैवरसायनशास्त्र, औषधीनिर्मितीचे सूक्षजीवशास्त्र, गुणवत्ता नियंत्रण, संगणकाचा वापर, औषधालयाच्या संदर्भात कायदे, नियम आणि अधिनियम, पर्यावरणशास्त्र, संस्कृत आाणि इंग्रजी, न्यायवैद्यकीय औषधालये, रसशास्त्र आणि भैशज्य कल्पना, द्रव्यगुण, आयुर्वेद आणि स्वस्थवृत्त, शरीर रचना आणि क्रिया, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स (औषधी निर्माणशास्त्रातील न्यायतत्वशास्त्र) आणि औषध साठा व्यवस्थापन, रुग्णालयातील औषधालये आदी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर आयुर्वेदिक औषधी निर्मिती उद्योगांमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून करिअर संधी मिळू शकते. त्याच बरोबर, गुणवत्ता नियंत्रक अधिकारी, शासकीय प्रयोगशाळांमध्ये विश्लेषक (ॲनॅलिस्ट), ड्रग इन्सपेक्टर, औषधांचे पुरठवदार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह), खरेदी अधिकारी, अशा संधी मिळतात. आयुर्वेदिक औषधालय उघडून स्वंयरोजगाराची पायाभरणी करता येते. प्लेसमेंट- या संस्थेच्या प्लेसमेंट प्रकियेमध्ये इमामी, बैधनाथ, हिमालय, आस्फा, वासू हेल्थकेअर, उंझा आयुर्वेदिक फार्मसी, विर्गो आयुर्वेदिक फार्मा, बेनमून फार्मा रिसर्च, झांडू, बॅन लॅब लिमिटेड, व्हायटल केअर-हेल्थ ॲण्ड हॅप्पिनेस, मुलतानी, आर्युकेअर फार्मास्युटिकल्स, चरक, आदी कंपन्या सहभागी होतात.
संपर्क- ए.के.जमाल बिल्डिंग, गुरु नानक रोड, जामगनर-361009, दूरध्वनी-0288- 2555746, फॅक्स- 2555966, संकेतस्थळ- www.iaps.ac.in, ईमेल- principal@iaps.ac.in
(२) राजस्थानातील माधव युनिव्हर्सिटी (माधव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल )- आयुर्वेद औषधी निर्माणशास्त्रातील डी.फार्म आणि बी.फार्म हा अभ्यासक्रम करता. संपर्क – माधव हिल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७, भारजा, अबु रोड, ता.- पिंडवारा, जिल्हा- सिरोही- राजस्थान- ३०७०२६, दूरध्वनी -8875028991 संकेतस्थळ- https://madhavuniversity.edu.in/aboutus.html, ईमेल-info@ madhavuniversity.edu.in
(३) केरळ हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी (एमव्हीआर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज पारास्सिनिक्कडवू)- बी.फार्म (आयुर्वेद). संपर्क- थ्रिस्सूर- ६८०५९६, दूरध्वनी- ०४८७-२२०७६५०, फॅक्स- २२०६७७०, संकेतस्थळ- khus.ac.in ईमेल-academic@khus.ac.in. याच महाविद्यालयात बीएस्सी नर्सिंग (आयुर्वेद) हा अभ्यासक्रमही करता येतो.
(४) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा इन आयुष नर्सिंग ॲण्ड फार्मसी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- ३ वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. संपर्क- कादवड, जोधपूर- नागौर हायवे रोड, जोधपूर- ३४२०३७, संकेतस्थळ-https://education.rajasthan.gov.in/content/raj/education/dr–sarvepalli-radhakrishnan-rajasthan-ayurved-university–jodhp, ईमेल- rau_jodhpur@yahoo.co.in, दूरध्वनी-०२९१-२७९५३११ (५) अपेक्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- बी.फार्म आणि डी.फॉर्म. संपर्क- अपेक्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एनएच-२२, पासिघाट स्मार्ट सिटी, जिल्हा सियांग (पूर्व) -७९११०२, अरूणाचल प्रदेश. संकेतस्थळ- apexuniversity.edu.in, ईमेल-ask@apexuniversity.edu.in, भ्रमणध्वनी- ८८००८३८८३९-
०००
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायंसेस
अभ्यासक्रम- पंचक्रम साहाय्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम/ अर्हता- १२वी उत्तीर्ण/ कालावधी- १ वर्षं/ हा अभ्यासक्रम संस्थेचा दिल्ली आणि केरळमधील चेरुथुरुथी येथे शिकवला जातो.
संधी– पंचकर्म सेवा-सुविधा पुरवणारे स्पा/आरोग्य केंद्र/ आयुर्वेद केंद्र/ स्वयंरोजगार
संपर्क- अनुसंधान भवन, नंबर ६१-६५, इंस्टिट्यूशनल एरिआ, अपोजिट डी ब्लॉक, जनकपूरी, नवी दिल्ली-११००५८, दूरध्वनी- ०११-२८५८५८५२, फॅक्स-२८५२०७४८, संकेतस्थळ- www.ccras@nic.in,ईमेल-dg-ccras@nic.in